Home » Orange Benefits जाणून घ्या हिवाळ्यामध्ये संत्री खाण्याचे फायदे

Orange Benefits जाणून घ्या हिवाळ्यामध्ये संत्री खाण्याचे फायदे

by Jyotsna Kulkarni
0 comment
Orange Benefits
Share

हिवाळ्यात नेहमीच ताज्या भाज्या आणि ताजी फळे मिळतात. जसे हिवाळ्यात भाज्या खाणे आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असते तसेच या दिवसांमध्ये सिझनची येणारी फळे खाणे देखील महत्वाचे असते. त्यामुळे या दिवसांमध्ये भाज्यांसोबतच फळे देखील आपल्या आहारात असलीच पाहिजे. (Winter Health)

थंडीच्या दिवसात येणारे गोड, रसाळ फळ म्हणजे संत्री. कधी खूप आंबट तर कधी अतिशय गोड असणारे हे फळ सगळ्यांच्याच आवडीचे असते. नारंगी रंगाची गोल संत्री बाजारात नेहमीच आपले लक्ष वेधून घेतात. हिवाळा सुरु झाला की संपूर्ण बाजारात संत्रीच संत्री दिसायला लागतात. (Orange Benefits)

मात्र अनेक लोकं थंडीच्या दिवसात आंबट, गोड खाणे टाळण्यासाठी संत्री खातच नाही. कारण अनेकांची अशी धारणा असते की, हे फळ खाल्ले की सर्दी खोकला होऊन तब्येत खराब होईल. मात्र असे अजिबातच नाही हे सर्व मिथ्य आहे. याउलट जर आपण हिवाळयात संत्री खाल्ली तर आपल्याला याचे खूपच फायदे होतात. (Marathi News)

Orange Benefits

हिवाळ्यात आपल्या शरीरात रोगप्रतिकारशक्ती खूपच कमी असते. ज्यामुळे ताप, सर्दी, खोकला, घशात खवखव वाटणे अश्या समस्या खूप लवकर होत असतात. संत्री हे हिवाळ्यात येणाऱ्या हंगामी फळांपैकी एक आहे, या ऋतूमध्ये संत्री खाणे खूप चांगले असते. हे हिवाळ्यातील सुपरफूड आहे, संत्रीमध्ये व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडेंट, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-व्हायरल गुणधर्म असतात. (Winter Health)

– संत्रीमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. हे विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास आणि मुक्त रॅडिकल्सपासून होणारे नुकसान टाळण्यास मदत करते. हे रोज खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. (Top Marathi News)

– संत्री आणि द्राक्ष ही फळ खाल्ल्याने स्ट्रोकचा धोका कमी होण्यास मदत होते. संत्र्यात असलेले फ्लेव्होनॉइड्स हृदयाशी संबंधित आजारांपासून संरक्षण करतात.

– कोरड्या हिवाळ्यात संत्र्यांपासून हायड्रेशनमुळे तुमच्या त्वचेलाही फायदा होतो. संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते जे त्वचेमध्ये कोलेजन उत्पादनास प्रोत्साहन देते.

– मेंदूसाठी संत्री हे वरदान मानले जाते. एका संशोधनानुसार जे लोक आठवड्यातून चार ते आठ ग्लास संत्र्याचा रस पितात त्यांना स्ट्रोकचा धोका २४% कमी होतो.

Orange Benefits

– संत्रीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे हिवाळ्यात संत्री खाल्ल्याने सर्दीपासून बचाव होतो.

– संत्र्यांमध्ये असलेले फायबर तुमचे वजन कमी करण्यास मदत करते. कारण संत्र्यातील फायबर आपल्या भूकेवर नियंत्रण मिळवण्यास मदत करते किंवा जास्त खाण्यापासून प्रतिबंधित करते. यामुळे बद्धकोष्ठतेचा आजार देखील दूर होण्यास मदत होते.

– संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी असतं, जे त्वचेसाठी चांगलं मानलं जातं. हे दररोज खाल्ल्याने त्वचा मुलायम आणि गुळगुळीत राहण्यास मदत होते.

– संत्र्यामुळे लठ्ठपणाही कमी होतो हे फार कमी लोकांना माहिती आहे. होय, संत्र्यामध्ये कॅलरीज कमी असतात, जे भरपूर पोषक असतात. संत्र्यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स चयापचय सुधारतात. संत्री खाल्ल्याने शरीरातील चरबी लवकर बर्न होते.

========

हे देखील वाचा : Ramgiri Maharaj : टागोरांनी जन-गण-मन ब्रिटिश राजासाठी लिहिलं होतं ?

OYO ने अचानक नियम का बदलले ? कपल्सचं की ओयोचं नुकसान ?

======

– संत्रींमध्ये फ्लेव्होनॉइड्स आणि कॅरोटीनोइड्ससह विविध प्रकारच्या अँटिऑक्सिडंट्सची असतात. हे तणावापासून संरक्षण करतात. अँटिऑक्सिडंट-समृद्ध संत्री पेशींच्या आरोग्यासाठी लाभदायक आहे. त्या जुनाट आजारांना प्रतिबंध करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.

– संत्री खाल्ल्याने डोळे निरोगी राहतात. संत्री खाल्ल्याने डोळ्यांचे आरोग्य सुधारते. आहारात संत्र्याचा समावेश केल्यास मॅक्युलर डिजनरेशन नावाची स्थिती टाळता येते. मॅक्युलर डिजेनेरेशनमुळे डोळ्यांची दृष्टी कमी होऊ लागते आणि अंधत्वाची समस्या उद्भवू शकते.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.