आपल्या रोजच्या जेवणातील एक महत्वाचा पदार्थ म्हणजे टोमॅटो. टोमॅटो शिवाय कोणत्याही भाज्या निव्वळ अपूर्णच असतात. आपल्या संपूर्ण जेवणाला चव आणणारा हा टोमॅटो किचनचा राजा म्हणून ओळखला जातो. लाल टोमॅटो हा अतिशय चांगला आणि आरोग्यास लाभदायक समजला जातो. हा टोमॅटो खाण्याचे देखील अनेक फायदे आहेत. मात्र तुम्हाला माहित आहे का की, लाल टोमॅटो इतकाच हिरवा टोमॅटो देखील आरोग्यास हितकारक समजला जातो. खूप कमी घरांमध्ये हा हिरवा टोमॅटो वापरला जातो.
बहुतकरून लाल टोमॅटोच सर्व घरांमध्ये जेवणासाठी वापरतात. मात्र लाल टोमॅटो एवढाच कदाचित त्याहून जास्त हिरवा टोमॅटो खाणे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने चांगले समजले जाते. हिरव्या टोमॅटोमध्ये पोटॅशियम, प्रोटीन, कॅल्शियम, फॉस्फरस, व्हिटॅमिन के, बीटा केरोटीन, मॅग्नेशियम, अॅंटिऑक्सिडंट्स सारखे पोषक घटक असतात. या सर्व घटकांमुळे आपल्या शरीरास अनेक फायदे होतात. हिरवा टोमॅटो खाल्ल्यावर कोणते लाभ होतात हे आपण जाणून घेऊया.
इम्युनिटी बुस्ट करते
हिरव्या टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी आणि अॅन्टी-ऑक्सिडेटंचे भरपूर प्रमाण असते. या हिरव्या टोमॅटोच्या सेवनामुळे आपली इम्युनिटी बुस्ट होते. ज्यामुळे लवकर आजार होणे किंवा बाहेरच्या कोणत्याही संक्रमणाचा धोका कमी होतो.
रक्ताच्या गुठळ्यांना दूर करते
हिरव्या टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन क भरपूर प्रमाण असते. हिरवे टोमॅटोचे सेवन केल्यामुळे रक्ताच्या गुठळ्या होत नाही. कारण हिरवे टोमॅटो हे आपल्या शरीरातील रक्त प्रवाह सुरळीत करण्यासाठी नेहमी मदत करतात.
डोळ्यासाठी फायदेशीर
डोळ्याच्या आरोग्यासाठी हिरवे टोमॅटो अतिशय उपयुक्त आहेत. हिरव्या टोमॅटोमध्ये बीटा कॅरोटीन पुरेशा प्रमाणात उपलब्ध असते. त्यामुळे डोळ्याचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. तसेच हिरव्या टोमॅटोच्या नियमित सेवनामुळे दृष्टी दोष दूर होवू शकतो. त्याचबरोबर डोळ्यासंबंधित इतर आजारांवर देखील हिरवे टोमॅटो उत्तम उपाय आहेत.
बद्धकोष्ठतेसाठी फायदेशीर
हिरव्या टोमॅटोमध्ये मुबलक प्रमाणात पाणी असते. जे दीड ग्रॅम फायबर पोषक तत्त्व प्रदान करतात. तसेच हिरव्या टोमॅटोमध्ये अघुलनशील आणि विरघळणार असे दोन्ही संयुगे आढळतात. यामुळे पचनक्रिया सुरळीत होते. परिणामी बद्धकोष्टतेची समस्या दूर होते. सोबतच पचनाशी संबंधित तक्रारी देखील कमी होण्यास मदत होते.
बीपी
हिरव्या टोमॅटोमध्ये पोटॅशियम जास्त आणि सोडीयम कमी प्रमाणात असते. यामुळे रक्तवाहिन्या खुलतात. परिणामी रक्ताभिसरण क्रिया सुरळीत होवून रक्तदाब नियंत्रणात राहते.
उत्तम त्वचेसाठी
वाढत्या प्रदूषणापासून त्वचेचे संरक्षण करायचे असेल तर हिरवे टोमॅटो खूपच उपयुक्त आहेत. यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात आढळते. यामुळे त्वचेसंबंधित समस्या दूर होण्यास नक्कीच फायदा होतो.
=========
हे देखील वाचा : गूढ पद्मनाभस्वामी मंदिराची चकित करणारी रहस्य
=========
रोगप्रतिकार शक्ती
रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करत आहेत. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तुम्ही हिरव्या टोमॅटोची मदत घेऊ शकता. हिरव्या टोमॅटोच्या सेवनाने शरीरातील व्हिटॅमिन सीची कमतरता पूर्ण करून रोगप्रतिकारशक्ती वाढवता येते.
ब्लड प्रेशर
खराब जीवनशैलीमुळे आजकाल बहुतेक लोकांना उच्च रक्तदाबाची समस्या असते. यासाठी ते औषधेही घेतात. अशा परिस्थितीत हिरव्या टोमॅटोच्या सेवनाने रक्तदाब नियंत्रित ठेवता येतो. त्यामध्ये आढळणाऱ्या पोटॅशियममुळे रक्तदाब नियंत्रित ठेवता येतो. हिरव्या टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटी-ऑक्सिडंट असतात जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम करतात. हे खाल्ल्याने सर्दी, फ्लू यांसारख्या संसर्गजन्य आजारांचा धोका दूर राहतो.
(टीप : आम्ही वरील सर्व बाबी केवळ माहिती म्हणून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. कोणतेही उपचार आणि उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)