Home » Bhogi : भोगीची भाजी खाल्ल्याने शरीराला होतात ‘हे’ मोठे लाभ

Bhogi : भोगीची भाजी खाल्ल्याने शरीराला होतात ‘हे’ मोठे लाभ

by Jyotsna Kulkarni
0 comment
Bhogi
Share

संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीचा सण किंवा दिवस साजरा केला जातो. मकरसंक्राती अगोदर भोगी हा सण साजरा केला जातो. ‘न खाई भोगी तो सदा रोगी’ हे आपण आपल्या घरातील वयस्कर लोकांच्या तोंडून कायम ऐकत आलो आहे. भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून साजरा करण्यात येतो. भोगी शब्दाचा शब्दशः अर्थ आहे आनंद घेणारा वा उपभोगणार. भोगी साजरी करण्याची पद्धत भोगीचा दिवस मकर संक्रांतीच्या एक दिवस आधी येतो. भोगीमागे धार्मिक श्रद्धा आहे आणि ती योग्य पद्धतीने साजरी केल्याने जीवनात सकारात्मकता येते. (Bhogi)

भोगीला भोगीची भाजी बनवली जाते. यात प्रामुख्याने हरभरा, पावटा, घेवडा, वांगे, गाजर, कांद्याची पात, शेंगदाणा, वाटाणा, चाकवत, फ्लॉवर आदी भाज्या वापरल्या जातात. भोगीच्या भाजीसोबत तीळ लावलेली बाजरीची भाकरी, लोणी, पापड, वांग्याचे भरीत, चटणी आणि खमंग खिचडी खाण्याची प्रथा आहे. भोगीच्या दिवशी महाराष्ट्रामध्ये सर्वच घरांमध्ये भोगीची भाजी केली जाते. भोगीची भाजी ही चवीला जेवढी चविष्ट असते तेवढीच ती आरोग्याच्यादृष्टीने फायदेशीर असते. ही भाजी खाल्ल्याने आपल्या शरीराला अनेक लाभ होतात. (Marathi)

भोगीच्या भाजीचे फायदे
* भोगीच्या भाजीमध्ये घेवडा, हरभरा, तरीच्या शेंगा, लाल गाजर, मुळा, पावटे, या भाज्यासारख्या थंडीत उपलब्ध होणाऱ्या भाज्यांचा वापर केला जातो. तसेच, त्या व्यतिरिक्त भाजीत तीळ, शेंगदाणा, खोबरं आणि खसखस या उष्ण पदार्थ देखील टाकले जातात. ज्यामुळे याचे सेवन थंडीत शरीर उबदार ठेवण्यास मदत करते. (Marathi News)

* भोगीच्या भाजीत उच्च विटामिन A, विटामिन C, आणि कॅल्शियम असतात. यामुळे हाडे आणि स्नायू मजबूत होतात आणि हाडांची घनता सुधारते. यामुळे हाडे आणि सांधेदुखी सारखी हिवाळ्यात होणारी दुखापत कमी होते.

* भोगीची भाजी ही आरोग्यवर्धक आहे. संधिवात, हृदयरोग, स्ट्रोक, स्मृतीभ्रंश, कर्करोगासारख्या रोगांवर रामबाण आहे. तसंच, या भाजीत अनेक पोषकतत्वे आहेत. यात बी जीवनसत्वे, फोलेट, ओमेगा-3 फॅट्स, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि ग्लुटाथिओन सारखे गुणधर्म असतात. (Todays Marathi HEadline)

Bhogi

* थंडीच्या दिवसात किंवा हिवाळ्यात भोगीची भाजी खाण्याचे अनेक फायदे शरीराला होतात. मुळातच थंड वातावरण असल्याने आपल्याला थंडीचा आणि याकाळात होणाऱ्या आजारांचा त्रास होत असतो. अशातच ही भोगीची भाजी आपले शरीर उष्ण ठेवण्यास मदत करून आजारांना देखील दूर करते. सोबतच आपल्या शरीरात असणारे अनेक आजार देखील बरे करण्यास मदत करते. (Latest Marathi News)

* भोगीच्या भाजीमध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते. यामुळे पचनशक्ती सुधारते आणि पचन प्रक्रिया सुरळीत होते. थोडा हळद आणि तिखट मसाले असल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढवते: भोगीची भाजी तिखट मसाले आणि हळदीचा वापर करून तयार केली जाते, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवते. हळदीत असलेल्या अँटीऑक्सिडन्ट्समुळे शरीराच्या विविध विषाणू आणि इन्फेक्शनला प्रतिकार करण्याची क्षमता वाढते.

* भोगीच्या भाजीमध्ये कमी glycaemic index असतात, यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. म्हणून, मधुमेह असलेल्या लोकांसाठी भोगीची भाजी एक आदर्श पर्याय असतो.

* भोगीची भाजी प्रामुख्याने प्राकृतिक तेल वापरून तयार केली जाते. यामध्ये असलेले स्वास्थ्यवर्धक फॅट्स शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करून हृदयाच्या आरोग्याचे रक्षण करतात. (Top Trending Headline)

* भोगीच्या भाजीत असलेल्या अँटीऑक्सिडन्ट्समुळे त्वचेला लवचिकता मिळते आणि त्वचेच्या सुरकुत्या कमी होतात.

=======

Makar Sankranti : वर्षातला पहिला सण असलेल्या मकरसंक्रांतीची माहिती आणि महत्त्व

Bhogi : मकर संक्रांतीपूर्वी भोगी का साजरी करतात?

=======

भोगीची भाजी कशी करावी?
साहित्य :
शेंगदाणे, पांढरे तीळ, ओलं खोबरं, जिरं, मोहरी, तेल, धणे पूड, लाल तिखट, गरम मसाला, बटाटा, हिरवे वाटाणे, हरभरा, पापडी, गाजर, वांगे, शेवग्याच्या शेंगा, चिंचेचा कोळ, गुळ, मीठ,

कृती :
नॉन-स्टिक पॅनमध्ये तेल गरम करून त्यात जिरं आणि मोहरी घालून तडतडू द्या. हळद, हिंग आणि कांदे घाला. मिक्स करून १-२ मिनिटे परतावे. नंतर त्यात बीन्स घालून मिक्स करा. १ कप पाणी घालून ढवळून झाकण ठेवून १०-१२ मिनिटे शिजवा. गाजर आणि हिरवे वाटाणे घालून चांगले मिसळा, झाकण ठेवून २ ते ३ मिनिटे शिजवा. वांगी घालून मिक्स करा. आता या भाजीमध्ये गरम मसाला पावडर, तिखट, चवीनुसार मीठ घालून मिक्स करा, झाकण ठेवून ५ ते ७ मिनिटे शिजवा. किसलेले खोबरे, चिंचेची पेस्ट आणि कोथिंबीर घालून सजवा. (Social News)

(टीप – येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. आम्ही या माहितीचे समर्थन करत नाही. कोणतेही उपाय करताना तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.