दही एक सुपरफूड आहे. ज्याचे आपण नेहमीच सेवन करु शकतो आणि त्याचा आरोग्यासाठी फार मोठा फायदा सुद्धा होतो. दह्यात प्रोटीन, कॅल्शियम, फोलिक अॅसिड, लोह, बी विटामिन सारखी पोषक तत्व असतात. जे तुमच्या आतड्यांसाठी उत्तम बॅक्टेरिया वाढवतात. दह्याच्या सेवन हे सकाळच्या वेळेत करणे उत्तम मानले जाते. काही वेळस तुम्ही ऐकले असेल की, रात्रीच्या वेळेस दही खाणे टाळावे. अन्यथा सर्दी, खोकला, पोट खराब, अॅसिडीटी सारख्या समस्या उद्भवू शकता. अशातच सकाळी आणि दुपार नंतर दह्याचे सेवन करु नये? जर तुम्ही दुपारी दही खाऊ शकत नाही तर तो संध्याकाळी खाऊ शकता. संध्याकाळी दही खाल्ल्याने सकाळच्या वेळेसारखाच फायदा तुम्हाला होतो. तर जाणून घेऊयात दही खाण्याचे कोणते फायदे आहेत. (Health Benefits of Curd)
रोगप्रतिकारक शक्ती वाढते
दह्यात भरपूर प्रमाणात पोषक तत्व असतात. त्यामुळे शरिरातील रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत मिळते. दररोज दही खाल्ल्याने तुम्हाला वायरल आणि सर्दी-खोकल्यासारख्या समस्या लगेच होत नाहीत.
पाचनक्रिया सुरळीत होते
दह्यात प्रोबायोटिक असल्याने पाचन क्रिया उत्तम होते. या व्यतिरिक्त दही भोजन योग्य पद्धतीने पचन करण्यास ही मदत करते. पोटासंबंधित समस्या ही दह्यामुळे दूर राहण्यास फायदा होतो.

वजन कमी करण्यास फायदेशीर
दह्याच्या सेवनामुळे वजन कमी होण्यास मदत होते. हे स्टेरॉइड हार्मोन किंवा कोर्टिसोलच्या विकासाला थांबवते. त्यामुळे लठ्ठपणाचा धोका नियंत्रणात राहतो. या व्यतिरिक्त बीएमआय स्तर नियंत्रित करते. एक चमचा मधासह तुम्ही दही खाल्ल्यास तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. मात्र अधिक प्रमाणात दही खाल्ल्यास त्यामुळे तुमचेच नुकसान सुद्धा होऊ शकते. (Health Benefits of Curd)
हे देखील वाचा- तुम्हाला सुद्धा नखं खाण्याची सवय आहे? वेळीच लक्ष द्या अन्यथा…
त्वचा हेल्थी आणि चमकार होते
दह्याचा वापर त्वेचेची काळजी घेण्यासाठी केला जातो. यामध्ये असलेले मिनिरल्स त्वचेवर ग्लो करतात आणि हेल्थी ठेवण्यास मदत करतात. दह्यात असलेले कंपोनंट्स जसे की, विटामिन ई, झिंक आणि अन्य त्वचेसाठी फार फायदेशीर ठरतात.
या लोकांनी संध्याकाळच्या वेळेस दह्याचे सेवन करु नये
अशा लोकांनी ज्यांना दूधापासून बनवण्यात आलेल्या पदार्थांपासून एलर्जी आहे. त्यांनी संध्याकाळी दह्याचे सेवन करु नये. जर तुम्हाला आधीच सर्दी, खोकला झाला असेल तर दही खाऊ नका. फॅट असणारे दही खाण्यापासून दूर रहा. अशातच तु्म्ही घरी तयार करण्यात आलेल्या दह्याचे सेवन करण्याचा प्रयत्न करा.