कोणत्याही महिलेचा स्वयंपाक ज्या गोष्टींशिवाय कधीच पूर्ण होत नाही, ती गोष्ट म्हणजे ‘कोथिंबीर’. प्रत्येक घरामध्ये कोथिंबीर असतेच असते. भलेही भाजी नसेल मात्र कोथिंबीर नाही असे घर शोधूनही सापडणार नाही. घरातील कोथिंबीर संपायच्या आधीच नवीन कोथिंबीर घरात येते. अनेक महिला तर त्यांच्या किचन गार्डनमध्ये कोथिंबीर उगवतात आणि वापरतात. अशी ही कोथिंबीर म्हणजे आपल्या स्वयंपाकाची राणी आहे. जेवणाचा स्वाद वाढवण्यासोबतच त्याला एक सुंदर लूक देखील ही कोथिंबीर देते. अनेक महिलांचा स्वयंपाक हिच्याशिवाय अपूर्णच असतो. अशी ही स्वादिष्ट कोथिंबीर केवळ जेवणाची लज्जतच वाढवत नाही तर आपल्या आरोग्याला देखील लाभदायक ठरते. कोथींबीर खाण्याचे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अनेक उत्तम फायदे आहेत. कोणते हे जाणून घेऊया. (Marathi News)
कोथिंबीर आरोग्यासाठी खुप फायदेशीर असते. कोथिंबीरमध्ये अनेक पोषक तत्व आढळतात. यामध्ये प्रोटीन, फॅट, कार्बोहायड्रेट, मिनरल असे अनेक पोषकतत्त्वे असतात. याव्यतिरिक्त कोथिंबरीमध्ये कॅल्शियम, फॉस्फोरस, आयरन, केरोटीन, थियामीन, पोटोशियम आणि व्हिटॅमीन आहेत. कोथिंबीर पोटाच्या समस्यांसाठी फायदेशीर आहे. पचनक्रिया सुरळीत ठेवते. कोथिंबीर ही भूक वाढते आणि संसर्गाशी लढा देण्यासाठी देखील तिचा उपयोग होतो. कोथिंबिरमध्ये अँटीऑक्सिडंट्स, उच्च रक्तदाब कमी करणारे, तसंच क्षयविरोधी अनेक गुण आढळतात. (Todays Marathi News)
कोथिंबीरचे महत्त्वपूर्ण फायदे
* नियमित रूपात कोथिंबीरचे पाणी पिण्यामुळे शरीराला विटामिन सी मोठ्या प्रमाणावर मिळते. कोथिंबीरच्या पाण्यामुळे प्रतिकाशक्ती वाढते. कोथिंबीरमध्ये असणारे जीवनसत्व, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स हे थायरॉईडच्या समस्येसाठी अधिक गुणकारी ठरते. डिटॉक्सेशन, कोथिंबीर स्मूथ अथवा कोथिंबीरचे पाणी याचे सेवन केल्याने प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते. दोन चमचे कोथिंबीरच्या रसामध्ये 10 ग्राम मिश्री आणि आर्धी वाटी पाणी मिळवा. हे मिश्रण सकाळ संध्याकाळ प्यायल्याने खुप फायदा होतो. (Top Marathi Headline)
* थायरॉईडच्या रुग्णांनीही दररोज सकाळी रिकाम्या पोटी कोथिंबिरीचे पाणी प्यावे. थायरॉईडची कमतरता किंवा जास्ती दोन्हीमध्ये हे फायदेशीर आहे. कोथिंबीरमध्ये आढळणारी खनिजे आणि जीवनसत्त्वे थायरॉईड संप्रेरकांचे नियमन करण्यास मदत करतात. (Marathi Trending News)
* कोथिंबीर श्वासासंबंधी रोगांना दूर करण्यासाठी खुप फायदेशीर असते. खोकला, दमा किंवा श्वास घेण्यास त्रास होत असल्यास कोथिंबीर आणि मिश्री समान प्रमाणात मिक्स करा आणि बारीक करून घ्या. हे मिश्रण एक चमचा भाताच्या पाण्यात मिसळून आजारी व्यक्तीला पाजल्यास त्याला आराम मिळेल.
* जर तुम्हाला किडनीतील घाण आणि विषारी पदार्थ बाहेर काढायचे असतील तर कोथिंबीरचे पाणी तुम्ही नियमित पिऊ शकता. हे पदार्थ बाहेर काढण्यासाठी तुम्ही रोज कोथिंबीर डिटॉक्स वॉटर पिऊ शकता. (Top Marathi News)
* वजन कमी करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत असाल तर कोथिंबीरचे अथवा धण्याचे पाणी यासाठी उपयुक्त आहे. मेटाबॉलिजम बुस्ट होण्यासाठी याची मदत होते आणि शरीरातील चयापचय शक्ती वाढवून चरबी जाळण्यासाठी याचा उपयोग होतो. दिवसातून दोन वेळा धण्याचे पाणी अथवा कोथिंबीरचे पाणी प्यायल्यास वजन झपाट्याने कमी होते.
* पचनक्रिया चांगली राखण्यासाठी कोथिंबीरच्या पाण्याचे सेवन करावे. गॅस, पोट फुगणे आणि चिडचिड होत असेल तर कोथिंबीरच्या पाण्याचे सेवन हे उपयुक्त ठरते. कोथिंबीर, काकडी, नारळाचे दूध असे एकत्र करून तुम्ही स्मूदीही तयार करून यासाठी पिऊ शकता. सकाळी उपाशीपोटी कोथिंबीर पाणी पिण्याने पोटात गॅस निर्माण होत नाही. (Latest Marathi News)
* कोथिंबीरीच्या नियमित सेवनाने शरीरात जमा झालेले अतिरिक्त मीठ निघून जाते. ज्यामुळे रक्तदाब कमी होतो. कोथिंबीर खराब कोलेस्ट्रॉल, LDL कमी करण्यास मदत करते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.
* ज्या महिलांना मासिक पाळीचा त्रास अधिक होतो. त्यांनी कोथिंबीरचे पाणी उकळून प्यावे. कोथिंबीरमध्ये असलेल्या लोहामुळे रक्ताची कमतरता पूर्ण होते आणि शरीरातील क्रॅम्पिंग कमी करून मासिक पाळीच्या दिवसात होणारा त्रास कमी होतो. शिवाय हार्मोन्स नियंत्रित ठेवण्यासाठीही याची मदत मिळते. (Top Stories)
* कोथिंबीर मधुमेहाच्या रूग्णांसाठी देखील उपयुक्त आहे. मधुमेह रूग्णांनी नियमितपणे याचे सेवन केल्यास भरपूर आराम मिळतो. कोथिंबीर रक्तातील इन्सुलिनचे प्रमाण नियंत्रित करते.
=========
हे ही वाचा : Health : पावसाळ्यात सततचा सर्दी खोकला त्रास देतोय? मग करा ‘हे’ सोपे उपाय
Health : पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी कोणता आहार घ्यावा?
=========
* हिरवी कोथिंबीर शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करते आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढते. कोथिंबिरीची पाने पाण्यात उकळून तुम्ही पिऊ शकता. ज्यांची दृष्टी कमकुवत आहे, त्यांनी निश्चितपणे कोथिंबीरचे सेवन केले पाहिजे. हिरव्या कोथिंबीरमध्ये व्हिटामिन ए भरपूर प्रमाणात आहे, जे डोळ्यांसाठी खूप फायदेशीर मानले जाते. (Social Updates)
(टीप : कोणतेही उपाय करताना डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics