Home » एवढ्याश्या चारोळीची किमया भारी….

एवढ्याश्या चारोळीची किमया भारी….

by Team Gajawaja
0 comment
Benefit Of Chironji
Share

दस-यापासून दिवाळीपर्यंत सर्व दिवस सण समारंभाचे आहेत. या सणांमध्ये प्रत्येक घरात गोडधोडाचे पदार्थ हमखास बनवले जातात.या गोड पदार्थांमध्ये एक छोटीशी मजेदार गोष्ट वापरली जाते, ती म्हणजे चारोळी…अगदी नखभर असलेल्या या चारोळ्या सर्वच गोड पदार्थांत वापरल्या जातात. प्रसादाचा शिरा असो वा दुधाची बासुंदी असो किंवा दिवाळीत घरोघरी होणा-या करंजा, लाडू असोत या चारोळ्या सर्वांत हक्कानं घातल्या जातात.या चारोळ्यांचा आकार छोटा असला तरी त्यांचा उपयोग खूप मोठा आहे.आयुर्वेदात त्यांचे महत्त्व सांगितले आहे. हजारो वर्षापासून चारोळी वापरली जातात.डोकेदुखी, खोकला, बद्धकोष्ठता आणि त्वचेसंबंधीत समस्या दूर करण्यासाठी चारोळीचा वापर केला जातो. पोटाचे आजार दूर करण्यासाठी या छोट्याश्या चारोळ्या खूप फायदेशीर होतात. म्हणूनच की काय सणांच्या दिवसात या छोट्या चारोळ्यांचा वापर हक्कानं केला जातो.(Benefit Of Chironji)

भारतात सण समारंभ म्हटलं की मिठाई आलीच पाहिजे. श्रावण महिन्यापासून ही गोडाची जत्रा प्रत्येक घरात सुरु होते. गणपती-गौरी आल्या की गोडधोडाची सुरुवात होते. मग नवरात्र, दसरा आणि कोजागिरी पौर्णिमेलाही गोडाचे पदार्थ होतात.श्रीखंड, बासुंदीमध्ये वर चारोळी असते.थोडीफार बदामाच्या चवीची ही चारोळी नेमकी का वापरतात याचा प्रश्न पडत असेल तर त्याचे फायदे नक्की जाणून घ्यायला हवेत. अगदी प्रसादाच्या शि-यामध्येही चारोळी टाकण्यात येते. त्यामागे त्यापासून मिळणारे फायदेच लक्षात घेतलेले असावेत.(Benefit Of Chironji)

ॲनाकार्डीयास नावाच्या झाडापासून या चारोळीच्या बिया मिळतात. चारोळीचे झाड कोरड्या डोंगराळ भागात आढळते. दक्षिण भारत, ओरिसा, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, छोटा नागपूर आदी ठिकाणी ही चारोळीची झाडे आहेत. याच्या बिया म्हणजेच चारोळी म्हणून वापण्यात येतात. या चारोळ्यांमध्ये सर्वप्रकारची पोषण तत्वे भरलेली असतात. व्हिटामिन बी, व्हिटामिन सी, यांचे प्रमाण मुबलक असते. गोड पदार्थ खाल्यावर अनेकांना वजन वाढेल की काय याची भीती असते. पण या चारोळीमळे वजन कमी होण्यास मदत होते. तसेच त्यात लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, आणि कॅल्शियम ही पोषण तत्व भरपूर असल्यानं पदार्थातील त्याचे प्रमाण कमी असले तरी त्याचा शरीराला फायदा खूप होतो. (Benefit Of Chironji) या चारोळीच्या बियाच फक्त उपयोगी असतात असे नाही तर याची पानंही खूप फायदेशीर असतात. या चारोळीच्या पानांचा चारा गुरांना देण्यात येतो, त्यातून त्यांचे आरोग्य सुधारते. चारोळीच्या बियांचे तेलही काढतात. या तेलाचा वापर केसांसाठी होतो. या तेलामुळे केसांची गळती तर थांबतेच पण केस काळे होण्यासही मदत होते.

==========

हे देखील वाचा : सणासुदीत खाद्यपदार्थांचा आस्वाद घेताय..? वजन वाढू नये म्हणून अशी घ्या काळजी

==========

पौष्टिक असलेल्या चारोळीला सुक्या मेव्यामध्ये महत्त्वाचे स्थान आहे.मसूराच्या आकाराच्या या चारोळीच्या बियां मात्र इतर सुक्यामेव्याप्रमाणे नुसत्या खाल्या जात नाहीत. त्याची चव थोडी वेगळी लागते. मात्र खिर, बासुंदी, मिठाई यात या बिया टाकून खाल्यावर त्यांची चव वाढते. काही ठिकाणी तर चारोळीच्या बियांची पावडरही केली जाते. ही पावडर पदार्थ घट्ट करण्यासाठी वापरली जाते. थंड हवेच्या ठिकाणी चारोळीचा अतिरिक्त वापर करण्यात येतो.त्यातून शरीराला उष्णता मिळते. त्यामुळे सढळ हातानं चारोळी जेवणात वापरली जाते. थकवा किंवा शारीरिक कमजोरी जावणत असेल तर दुधामध्ये चारोळी टाकून घेतल्यास अशक्तपणा दूर होतो. हृदय निरोगी ठेवण्यासाठीही चारोळीची मदत होते. तसेच शरीरातील हाडे आणि दात यासाठी चारोळी खूप फायदेशीर आहे. चारोळीचा वापर सौदर्यप्रसाधनातही करण्यात येतो. चारोळीच्या तेलाचा हलका मसाज केल्यास चेहरा तजेलदार होतो. नित्यनियमानं चारोळी टाकलेलं दूध घेतल्यास स्मरणशक्ती वाढते. शिवाय चेहरा उजळण्यासही मदत होते. काही आयुर्वेदीय क्लिनिकमध्ये फेसपॅकमध्ये या चारोळीच्या पावडरचा वापर करतात. चारोळीच्या तेलामुळे अंगावर आलेले पुरळ कमी होते. उन्हाळ्यात या चारोळीचा वापर केल्यास घामोळ्याच्या त्रासापासून सुटका होते.(Benefit Of Chironji)एवढ्याश्या चारोळीचे फायदे मात्र हजारो आहेत. त्यामुळे आता दिवाळीमध्ये करंजी, लाडू करतांना या चारोळ्यांचा वापर सढळ हातांनं करा. त्यामुळे पदार्थाची चव वाढेलच पण त्यातून शरीरालाही चांगलाच फायदा मिळेल.

सई बने…


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.