Home » झोपताना फोन तुमच्यापासून किती अंतरावर असावा?

झोपताना फोन तुमच्यापासून किती अंतरावर असावा?

आजकाल आपल्या सर्वांच्याच आयुष्यात मोबाइल फोन एक महत्त्वाचा भाग झाला आहे. कुठेही जायचे झाल्यास सर्वप्रथम आपल्याला फोनची आठवण होते.

by Team Gajawaja
0 comment
Mobile Use Causes
Share

Health Advice : आजकाल आपल्या सर्वांच्याच आयुष्यात मोबाइल फोन एक महत्त्वाचा भाग झाला आहे. कुठेही जायचे झाल्यास सर्वप्रथम आपल्याला फोनची आठवण होते. मोबाइल एवढा महत्वाचा झालाय की, वॉशरुमला जायचे झाले तरीही काहीजण सोबत घेऊन जातात. प्रत्येक ठिकाणी मोबाइलचा वापर करण्याची सवय सामान्य वाटत असली तरीही याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो. याशिवाय मोबाइल फोनमध्ये व्यक्ती तणावाखालीही जाऊ लागल्याची काही प्रकरणे समोर आली आहेत. तर बहुतांशजण रात्री उशी शेजारीच मोबाइल फोन ठेवून झोपातत. खरंतर, असे करणे आरोग्याासाठी नुकसानदायक ठरू शकते. जाणून घेऊया याबद्दलच सविस्तर…

किती दूर अंतरावर असावा मोबाइल फोन?
तुम्ही ज्या खोलीत झोपता तेथेच फोन ठेवू नये. तुमच्यापासून काही अंतरावर फोन ठेवणे अत्यावश्यक आहे. जरी तुम्हाला फोन तुमच्यासोबत ठेवून झोपायचे असल्यास एअरोप्लेन मोडवर ठेवू शकता. खरंतर, उशीच्या अथवा बेडच्या शेजारी फोन ठेवल्याने आरोग्यावर काय परिणाम होतात याबद्दल जाणून घेऊया….

तणाव वाढला जातो
फोन उशीच्या शेजारी ठेवून झोपल्याने तणावाची स्थिती वाढली जाऊ शकते. याशिवाय सकाळी उठल्यानंतर डोकेदुखीची समस्या होऊ शकते. खरंतर फोनमधून निघणारे रेडिएशनचा तुमच्या मेंदूवर परिणाम होऊ शकतो.

तुमचा फोन एअरोप्लेन मोडवर नसल्यास मोबाइलवर येणाऱ्या मेसेजमुळे झोप मोड होऊ शकते. अशातच झोप पूर्ण न झाल्याने तुम्हाला सकाळी थकवा जाणवू शकतो. (Health Advice)

माइग्रेनची समस्या
रात्री उशीच्या जवळ फोन ठेवून झोपल्यास माइग्रेनची समस्या उद्भवू शकते. याव्यतिरिक्त संपूर्ण आरोग्यवरही परिणाम होऊ शकतो. अशातच फोन तुमच्या झोपण्याच्या ठिकाणापासून काही अंतरावर असावा.


आणखी वाचा :

मानसिक तणाव ‘ या ‘ आजारांचे ठरते कारण, असे राहा दूर

सकाळ ते संध्याकाळपर्यंत या 4 हेल्दी सवयी अंगी बाळगा, आजारपणापासून रहाल दूर


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.