Health Advice : हेल्दी राहण्यासाठी आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणे अत्यंत गरजेचे आहे. यामुळे तुम्ही वेगवेगळ्या आजारांपासून दूर राहता. याशिवाय रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असेल तर तुम्ही हेल्दी लाइफस्टाइल जगता. पण काही गोष्टी अशा असतात ज्याचे अत्याधिक प्रमाणात सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. याबद्दलच जाणून घेऊया अधिक….
कॅफेन
हिवाळा किंवा उन्हाळा, लोकांना वाफाळलेला चहा-कॉफीचे सेवन करणे अत्यंत आवडते. पण यामध्ये असलेले कॅफेन रक्तासह संपूर्ण शरिरास पसरले जाते. याचा अधिक परिणाम खरंतर मेंदूवर होतो. पण याशिवाय तुमची रोगप्रतिकार शक्ती देखील कमी होते. यामुळे मर्यादित प्रमाणात कॅफेनयुक्त पदार्थांचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.
गोड पदार्थ
तुम्ही अत्याधिक प्रमाणात गोड पदार्थ खात असाल तर ही सवय आजच थांबवा. अन्यथा तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीवर याचा मोठा परिणाम होऊ शकतो. चहा आणि कॉफीमध्ये अधिक प्रमाणात साखर मिक्स करून पिऊ नये. याशिवाय दही, केचअप, सॉफ्ट ड्रिंक्सच्या सेवनापासूनही दूर राहावे.
अल्कोहोल
अल्कोहोलमुळे आरोग्याचे नुकसान होते. याशिवाय तुमची रोगप्रतिकारक शक्तीही यामुळे कमी होते. अशातच न्युमोनिया, श्वसनासंबंधित आजार आणि अन्य संक्रमित आजार होण्याचा धोका अधिक वाढला जातो.
हाय सॅच्युरेटेड फॅट्स
बटर आणि रेड मीट व्यतिरिक्त असे फूड्स ज्यामध्ये सॅच्युरेटेड फॅट्सचे प्रमाण अत्याधिक आहे. यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमजोर होते. असे फूड्स तुम्ही इम्यून सिस्टिम आणि व्हाइट ब्लड सेल्सची काम करण्याची गती कमी करतात. यामुळे एखादे संक्रमण होण्याची शक्यता अधिक वाढली जाते. (Health Advice)
रिफाइंड फूड
तुम्ही दररोज मैदा, साखर सारखे फूड्स अधिक प्रमाणात खात असाल तर त्यावर मर्यादा आणा. असे पदार्थ शरिराला पचण्यास फार वेळ लागतो आणि यामुळे आरोग्य बिघडले जाते. याचे अधिक सेवन केल्याने आतड्यांमध्ये कोलेजन बॅक्टेरिया असंतुलित होऊ शकतात, ज्यामुळे इम्युन सिस्टिम कमकुवत करतो.
प्रोसेस्ड फूड
आजकाल मार्केटमध्ये काही प्रकारच्या अशा खाण्यापिण्याच्या गोष्टी मिळतात ज्या पाकिटबंद असतात. पण अशा फूड्सचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. तुम्ही आजारी पडण्याची शक्यता अधिक वाढली जाते. याशिवाय अशा फूड्समध्ये तेलाचे प्रमाण अधिक असते. यामुळे नेहमीच ताजे शिजवलेले पदार्थ खा.