मध खाल्ल्याने आरोग्याला काही फायदे होतात. गोड पदार्थात साखरेच्या सब्स्टीट्युटच्या रुपात वापरले जाते. त्याचसोबत आयुर्वेदातही मधाचा वापर करण्याचा सांगितले गेले आहे. मधाला एक महत्त्वाचे औषध मानले जाते. याचा वापर विविध आजारांसाठी केला जातो. मधात अँन्टीऑक्सिडेंट्स,अँन्टी इंफ्लामेंटरी आणि अँन्टी माइक्रोबियल गुण असतात.याव्यतिरिक्त यामध्ये अॅमिनो अॅसिड, कॅल्शिअम, मिनिरल्स, व्हिटॅमिन बी,क कॉम्प्लेक्स, व्हिटॅमिन ए आणि पोटॅशिअम सारखे काही खनिज असतात. जे संपूर्ण आरोग्यासाठी फायदेशीर असतात. (Health Advice)
मधाच्या या गुणांमुळेच फिटनेस फ्रिक्ससुद्धा याचे दररोज सेवन करतात. मधापासून तयार केलेले पदार्थही खाल्ले जातात. जर तुम्ही असे करत असाल आणि तुम्हाला वाटत असेल यामुळे आरोग्याला फायदे होतात तर तसे नाही. कारण मध गरम केल्यानंतर त्यामधील पोषक तत्त्वे नष्ट होतात आणि आरोग्यासंबंधित काही समस्या उद्भवू शकतात. एका रिपोर्ट्सनुसार, मध जर ६० ते १४० डिग्री सेल्सियल पर्यंत गरम केले तर मध फिकट होते आणि असे मध आरोग्यासाठी धोकादायक ठरते. त्याचसोबत रिपोर्टमध्ये असे ही समोर आले ६० डिग्री ते १४० डिग्री सेल्सियस गरम मधात हाइड्रोक्सीमिथाइल फरफुराल्डिहाइड नावाचे कंपाऊंड वाढले जाते. जे आरोग्यासाठी हानिकारक तत्त्व असते.
मध आणि तूप कधीच एकत्रित खाऊ नये
मध आणि तूप एकत्रित मिळून खाल्ल्याने एक टॉक्सिक एलिमेंट तयार होते. जे आरोग्यासंबंधित समस्या निर्माण करू शकते. त्याचसोबत यामुळे क्लोस्ट्रीडियम बोटुलिनम नावाचा पदार्थ शरीरात वेगाने फैलावला जातो. याच्या कारणास्तव श्वसनासंबंधित समस्या, पोट दुखी आणि ऐवढेच नव्हे तर कँन्सरचे ही कारण ठरू शकते. खरंतर क्लोस्ट्रीडियम बोटुलिनम एक प्रकारचे बॅक्टेरिया असते. जे कमी ऑक्सिजनच्या स्थितीत धोकादायक विषारी पदार्थ प्रोड्युस करू शकते. (Health Advice)
कसे खाल्ले पाहिजे मध?
आयुर्वेदानुसार मध एक औषध असून त्यामुळे ते जसे आहे तसेच खावे. जर मध गरम करायचे असेल तर 35-40°C (95-104°F) पर्यंत करणे योग्य आहे. मधाला हानिकारक प्रभावापासून दूर ठेवायचे असेल तर याचे तापमान 40°C (104°F) पेक्षा अधिक नसावे.
हेही वाचा- थंडीत आलं आणि गुळ खाण्याचे फायदे