Health Advice : सध्या ब्लड शुगरच्या रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढताना दिसतोय. अशातच ब्लड शुगर 300 mg/dL च्या वर जाणे हे गंभीर स्थितीचे लक्षण आहे. याला हायपरग्लायसेमिया म्हणतात आणि हे शरीरातील इन्सुलिनची कमतरता किंवा इन्सुलिन नीट कार्य न करण्याचे संकेत असू शकतात. अशा वेळी रक्तातील साखर रक्तवाहिन्यांवर, किडनीवर, नर्व्हवर आणि हृदयावर थेट ताण आणते. शुगर इतकी वाढल्यास Ketoacidosis चा धोका वाढतो. विशेषतः टाईप 1 डायबिटीज रुग्णांमध्ये. त्यामुळे ही केवळ संख्या नाही, तर तातडीचा इशारा आहे की शरीर धोक्यात आहे. त्यामुळे 300 च्या वर शुगर गेल्यावर त्वरित योग्य पावले उचलणे अत्यावश्यक आहे.
सर्वप्रथम पाणी प्या आणि शरीर Hydrate ठेवा
ब्लड शुगर फार वाढल्यावर सर्वात पहिले काम म्हणजे शरीरात पाणी पुरेसे पोहोचणे. जास्त शुगरमुळे रक्त घट्ट होते आणि त्यातील साखर मूत्रावाटे बाहेर टाकण्यासाठी शरीराला अधिक पाणी लागते. त्यामुळे 300 च्या वर गेल्यावर लगेच 2–3 ग्लास कोमट पाणी हळूहळू पिणे फायदेशीर ठरते. पाणी शरीरातील अतिरिक्त ग्लुकोज मूत्रावाटे बाहेर काढण्यास मदत करते. मात्र, पाणी एकदम जास्त प्रमाणात न पिता थोड्या-थोड्या वेळाने प्या. नारळपाणी, लिंबूपाणी किंवा कोणतेही साखरविरहित पेय चालू शकते.
थोडे चाला
शुगर 300 च्या वर असेल आणि कोणतीही गंभीर लक्षणे (उलटी, श्वासोच्छ्वासात त्रास, छातीत दुखणे, जास्त थकवा) नसतील तर सोपे व हलके चालणे अत्यंत उपयुक्त ठरते. साधे 10–15 मिनिटांचे walking शरीरातील ग्लुकोज पेशींमध्ये ऊर्जा म्हणून वापरायला मदत करते, ज्यामुळे शुगर नैसर्गिकरित्या कमी होते. धावणे, जोराचा व्यायाम करू नये. हलकी physical activity हे सर्वोत्तम पहिले पाऊल आहे.’

Health Advice
डॉक्टरांनी सुचवले असल्यास त्वरित Insulin किंवा डोस तपासा
जर आपण इन्सुलिन किंवा डायबिटीजची औषधे घेत असाल, तर शुगर 300 च्या वर गेल्यावर डॉक्टरांनी दिलेली ‘Correction Dose’ किंवा Regular dose तपासणे अत्यंत आवश्यक आहे. इन्सुलिन घेत असाल तर योग्य प्रमाणात घेणेच शुगर कमी करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे. मात्र स्वतःहून डोस वाढवू नये—अति इन्सुलिनने Sugar Crash होऊ शकतो. जर मागील डोस चुकला असेल किंवा उशिरा घेतला असेल, तर तो त्वरित घ्या. चक्कर, उलटी किंवा गोंधळ जाणवत असेल तर त्वरित मेडिकल मदत घ्या. (Health Advice)
साखर वाढवणारे पदार्थ लगेच बंद करा
-शुगर 300 च्या वर असताना लगेच खालील पदार्थ थांबवा:
-भात, पोळी, पाव, नूडल्स, पास्ता
-मिठाई, बिस्कीट, चॉकलेट
-फळांचे रस, साखर असलेले पेय
– बटाटा, मैद्याचे पदार्थ
याऐवजी बेसनाची भाकरी, उकडलेली मूगडाळ, काकडी, टोमॅटो, पालक सूप, प्रोटीनयुक्त हलका आहार घ्यावा. अशा पदार्थांनी शुगर वाढण्याचा धोका कमी होतो.
=========
हे देखील वाचा :
Skin Care : थंडीच्या दिवसात ‘हे’ घरगुती उपाय करून घ्या त्वचेची काळजी
==========
ही लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क करा
जर खालील लक्षणे दिसत असतील तर विलंब न करता डॉक्टर किंवा हॉस्पिटलमध्ये संपर्क आवश्यक आहे:
-मळमळ, उलटी
-श्वास घेताना त्रास
-फळासारखा वास येणारा श्वास
-तीव्र थकवा किंवा झोप येणे
-पोटदुखी
ही लक्षणे Diabetic Ketoacidosis (DKA) ची असू शकतात आणि ही तातडीची गंभीर वैद्यकीय परिस्थिती आहे.
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
