आजकाल इअरफोन्स आणि हेडफोन्स खुप वेळ कानात लावून व्हिडिओ, सिनेमा पाहणे किंवा गाणी ऐकली जातात. बहुतांश लोक मल्टीमिया कंटेट पाहण्यासाठी याचा वापर करतात. या व्यतिरिक्त प्रवासादरम्यान ही हेडफोन्स कानाला लावलेले दिसतात. हेडफोनमुळे तुम्हाला उत्तम ऑडिओ ऐकता येतो खरं. पण याचा अधिक वापर करणे ही अधिक नुकसानदायी ठरु शकते. हेडफोनच्या अधिक वापरामुळे तुमचे कान खराब होऊ शकतात. (Headphone Use Tips)
खरंतर हेडफोन्स मधून येणारा आवाज हा आपल्या कानाच्या पड्यापर्यंत पोहचतो. मात्र दीर्घकाळ तुम्ही इअरफोन्स वापरत असाल तर त्यावर परिणाम होतो. सर्वसामान्यपणे, तुम्ही एका दिवसात कमीत कमी २-२३ तासांसाठी इअरफोन्सचा वापर करु शकतात. पण त्यापेक्षा अधिक वेळ तुम्ही ऐकल्यास कानात बॅक्टेरिया २०-३० टक्क्यांनी वाढू शकतात. जे तुमच्या कानासाठी उत्तम नाही. कानाच्या पडद्याला जर इजा झाली तर त्याचे फार गंभीर परिणाम होतात. अशातच पाहूयात हेडफोन्समुळे होणारे नुकसान.
-चक्कर येणे
जर तुम्ही हेडफोन्स लावून गाणी ऐकत असाल किंवा चालत-फिरत दीर्घकाळ एखाद्याशी बोलत असाल तर हे तुमच्यासाठी घातक ठरु शकते. खरंतर हेडफोन्समुळे कानात अधिक जोरात येतो. यामुळे कानाच्या पडद्यावर दबाव पडतोय अशातच तुम्हाला चक्कर येण्याची समस्या उद्भवू शकते.
-कानात इंन्फेक्शन
काही वेळेस आपण हेडफोन्स अन्य लोकांसोबत शेअर करतो. त्यामुळे इअरफोन्सच्या स्पंजच्या माध्यमातून बॅक्टेरिया एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जाऊ शकतो. या कारणास्तव तुम्हाला कानात इंन्फेक्शन होऊ शकते.
-बहिरेपण
हेडफोन खुप वेळ वापरल्यानंतर तुम्हाला बहिरेपण येऊ शकते. हेडफोनच्या वायब्रेशनमुळे हेअर सेल्सची सेंसिटीव्हिटी बंद होते. यामुळेच तुम्हाला कमी ऐकू किंवा अगदीच ऐकू येत नाही. (Headphone Use Tips)
-मेंदूवर होतो परिणाम
हेडफोन इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स निर्माण करतात. यामुळे ते अधिक वेळ वापरण्यापासून दूर रहावे. मात्र तसे न केल्यास तुमच्या मेंदूवर ही परिणाम होऊ शकतो.
हे देखील वाचा- Meta ची मोठी घोषणा, फेसबुक-इंस्टाग्राम सुद्धा ब्लू टीकसाठी शुल्क घेणार
-हेडफोन्सला कसे ठेवाल सुरक्षित?
हेडफोनचा अधिक वेळ वापर करु नये. या व्यतिरिक्त सातत्याने गाणी जोरात ऐकू नये. जेवढा आवाज कमी असेल तेवढेच तुमच्यासाठी उत्तम. तुमचे हेडफोन्स एखाद्यासोबत शेअर करु नका. जर तुम्ही हेडफोन्स वापरत असाल तर उत्तम कंपन्यांचे हेडफोन्स वापरा. लोकल हेडफोन्स वापरण्यापासून दूर रहा.