Home » liquor : विदेशी दारूच्या बाटल्यांसाठी त्यांनी विकली भारताची गोपनीय माहिती!

liquor : विदेशी दारूच्या बाटल्यांसाठी त्यांनी विकली भारताची गोपनीय माहिती!

by Team Gajawaja
0 comment
liquor
Share

सप्टेंबर १९८४ ची गोष्ट आहे, भारत एकदम सीक्रेटली पाकिस्तानच्या nuclear प्रोग्राम सुरू होण्याआधीच त्यावर हल्ला करून ती संपवण्याची योजना आखली जात असल्याची बातमी अमेरिकन न्यूज पेपर छापून आली होती. तेव्हा पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री साहिबजादा याकूब खान अमेरिकेतच होते. त्यांनी तेव्हा तेव्हाच्या भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांना उद्देशून एक वक्तव्य केलं होतं. ते अशा प्रकारचं होतं कि, “मैडम तुम्ही केव्हाही हा हल्ला करणार असला. पण जर तुम्ही असं केलं तर आमच्याकडे एकच पर्याय असेल, भारताच्या तारपूर ऑटोमीक पॉवर स्टेशनवर हल्ला. जेव्हा एक कोटी लोकांना मुंबईतून बाहेर काढावे लागेल, तेव्हा मॅडम गांधींना समजेल.” आता भारतासाठी प्रश्न हा नव्हता कि भारत हल्ला करणार कि नाही. प्रश्न हा होता कि, एवढी गोपनीय माहिती अमेरिकेपर्यंत पोहचली कशी. याचा अर्थ होता कि भारतातील सुरक्षा यंत्रणेतच कोणीतरी देशद्रोही आहे. जो भारताच्या गोपनीय योजनांची माहिती इतर देशांना पुरवतो आहे. कोण होता हा देशद्रोही? भारताचे डिफेन्स सीक्रेट्स लिक करणारं हे कांड काय होतं? जाणून घ्या…  (liquor)

जास्त सस्पेन्स न ठेवता भारताचे डिफेन्स सीक्रेट्स लिक करणाऱ्या या व्यक्तीचं नाव आपण लीक करून टाकुया. तो व्यक्ती होता चित्तर वेंकट नारायण, ज्याला कूमर नारायण म्हणून सुद्धा ओळखलं जायचं. तो १८ वर्षांच्या वयात आर्मी पोस्टल सर्व्हिसमध्ये हवालदार म्हणून काम करायचा. सहा वर्षांनंतर त्या सर्व्हिसमधून बाहेर पडल्यावर S L M मानेकलाल इंडस्ट्रीजमध्ये रीजनल मॅनेजर म्हणून त्याने काम सुरु केलं. इथेच त्याचं नशीब पालटलं S L M मानेकलाल इंडस्ट्रीज ही प्रमुख मुंबईची कंपनी होती. ज्याची एक ब्रांच दिल्लीच्या हेली रोडवर होतं जे सरकारी कार्यालयांच्या जवळ होतं. आता काही रीपोर्टसनुसार कूमर नारायण हा वाणिज्य मंत्रालयात एका मोठ्या पदावर सिव्हिल सर्वंट सुद्धा राहिला होता. आता त्याच्या कार्यालयाच्या जवळच केंद्र सरकारच्या मंत्र्यांची कार्यालय होती. त्यामुळे काम संपल्यावर त्याचे जूने सहकारी, मित्र आणि ओळखीचे लोकं त्याच्या कार्यालयात जाऊन मद्याचे दोन दोन घोट घ्यायचे. जुन्या आठवणी गप्पा टप्पा व्हायच्या.  (Top Stories)

कधी कधी या चर्चा व्यवसायकी असायच्या, कधी कधी सरकार बद्दल मग या चर्चा खाजगी होऊ लागल्या. सरकारी कार्यालयात काम करणारे ऑफिर्सस कधी कधी टिप्स सुद्धा द्यायचे. जसं की, सरकार कुठे आणि काय खर्च करणार आहे? वगैरे वगैरे.. या माहितीचा फायदा नारायणने त्याच्या कंपनीचा व्यवसाय वाढवण्यात केला. हळू हळू या खाजगी चर्चा भारत सरकारच्या गोपनीय योजनांंबद्दल आणि माहितीबद्दल होऊ लागल्या. आता ते ऑफिर्सस या पार्टीमध्ये गोपनीय सरकारी कागदपत्रंही आणू लागले होते. या बदल्यात कूमर नारायण त्यांना महागड्या ब्रॅंडेड परदेशी दारूच्या बाटल्या देत होता, ज्या त्याकाळी सहजपणे उपलब्ध नव्हत्या. (liquor)

एकीकडे मद्यपान आणि गप्पा सुरू असताना, नारायण त्याच्या ऑफिसमध्ये कामाला असणाऱ्या माणसाला ते कागदपत्र देऊन त्याचे फोटोस्टेट म्हणजेच झेरॉक्स काढून आणायचा. ऑफिर्ससंना माहागडी दारू मिळत होती आणि कूमर नारायणला गोपनीय माहिती. नारायण ही माहिती आणि कागदपत्र युरोपला पाठवायचा, तिथे दोन बिझनेस मॅन हे कागदपत्र पुढे विकायचे. कागदपत्रे सोविएट युनियनच्या प्रभावाखाली असलेल्या ईस्ट ब्लॉकला दिली जात होती. बदल्यात त्यांना सरकारी टेंडर्स मिळत होते. (Top Stories)

हळूहळू ही माहिती पोलिस इंटेलिजेन्सपर्यंत पोहोचली. त्यांनाही या माहितीचा फायद्या घ्यायचा होता. नंतर फ्रान्सला सुद्धा या कागदपत्रांची किंमत कळाली, आणि तेही ही माहिती विकत घेऊ लागले. हे सर्व सुरळीत चालू होतं, पण एक दिवस IB ला या प्रकरणाचा पत्ता लागला. 1984 च्या सप्टेंबरमध्ये या प्रकरणाची माहिती पंतप्रधान इंदिरा गांधींना दिली गेली. पण त्याच महिन्यात त्यांची हत्या झाली. डिसेंबरमध्ये IB ह्या प्रकरणाचा उलगडा करणार होती, पण निवडणुकीवर याचा परिणाम होईल म्हणून त्यांनी हे प्रकरण काही दिवस लांबणीवर ढकलं. (liquor)

======================

हे देखील वाचा :

Maha Khumbh Mela : महाकुंभमेळ्याला हायटेक सुरक्षेचे कवच

Mahakumbha : धार्मिक नाही तर शिक्षणाचेही महाकुंभ

=======================

17 जानेवारी 1985 ला कुमर नारायणच्या ऑफिसवर रेड पडली आणि नारायणला त्याच्या कार्यालयात पकडलं गेलं. त्याने IB ला आणखी ३० सरकारी अधिकाऱ्यांची नाव सांगितली. त्याने हे देखील सांगितलं कि या माहितीच्या बदल्यात त्याच्या कंपनीला पोलंड आणि ईस्ट जर्मनीमध्ये मोठ्या डील्स मिळाल्या होत्या. पाच महिन्यांच्या तपासानंतर 19 लोकांवर FIR दाखल केली गेली. हे प्रकरण १७ वर्ष कोर्टात चाललं. २००२ मध्ये या प्रकरणात १३ लोकांना शिक्षा झाली. मानेकवाल कंपनीच्या मालक योगेशला 14 वर्षांची शिक्षा झाली, आणि 12 सरकारी अधिकारी 12 वर्षांसाठी जेलमध्ये गेले. त्यात 4 PMO आणि 4 संरक्षण मंत्रालयाशी संबंधित अधिकारी होते. पण या प्रकरणाचा मास्टर माइंड नारायणला शिक्षा होण्याआधीच 2000 मध्ये त्याचा मृत्यू झाला. (Top Stories)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.