Home » कोण आहे सुप्रिया ताईंच्या आवडता हिरो?

कोण आहे सुप्रिया ताईंच्या आवडता हिरो?

by Correspondent
0 comment
Share

जगातले सर्वोत्कृष्ट आई-वडील कुणाचे? ‘माझेच !’ ही तमाम मुलांची सवय असते. तशीच समजूत खासदार सुप्रिया सुळे यांचीसुद्धा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि सुप्रिया सुळे यांचे वडील शरद पवार हेच आपले खरे हिरो असल्याचे सुप्रिया सुळे सांगतात.

सगळे बारामतीकर पवार आनंदाने आणि एकोप्याने राहतात. याबद्दल सुप्रिया सुळे यांनी भर दिला आहे. सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांचे राजकीय आत्मचरित्र असणाऱ्या ‘लोक माझा सांगाती’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेत बाबांविषयी आपले मत मांडले आहे.

सुरुवातीपासूनच कोणत्याही परिस्थितीमध्ये सकारात्मक राहण्याचा धडा शरद पवार यांनी संपूर्ण कुटुंबियांना दिला आहे. वातावरण प्रतिकूल आहे? त्यात काय ! हेही दिवस जातील अशीच त्यांची शिकवण आहे. प्रसंग कोणताही असो आमच्या कुटुंबातल्या नात्यांमधला ओढीचा आणि एकोप्याचा तेवढा क्षणन् क्षण खरा असं सुप्रिया सुळे आपल्या मनोगतात सांगतात. चांगल्या-वाईट कालानुरूप स्वत:मध्ये बदल घडवत त्या वेगाशी जुळवून घेत पुढे चालत राहायला हवं, या विचारानेच पवार कुटुंबियांचा प्रवास सुरु आहे. याचं सर्व श्रेय त्या आपल्या आई-वडलांना देतात.

शरद पवार यांच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातल्या प्रदीर्घ आणि सुफळ संपूर्ण कारकिर्दीतील त्यांच्या पत्नीची भूमिका तेवढ्याच तोलामोलाची आहे. पवार यांच्या पाठीशी त्या कायम पहाडासारख्या उभ्या राहिल्या. फक्त आईच का? आमची रक्ताची नाती आणि मैत्रीच्या धाग्यानं गुंफलेली नाती – अशी सगळीच बाबांबरोबर कायम आहेत असंही सुप्रिया सुळे सांगतात. उनपावसात, चांगल्या वाईट दिवसांत जीव की प्राण म्हणून सगळ्यांनीच शरद पवार यांना जपलं आहे. म्हणूनच खऱ्या अर्थाने शरद पवार सुप्रिया सुळेंना हिरो असल्यासारखे वाटतात.

शरद पवार यांनी सार्वजनिक आयुष्य त्यांच्या वेळेवर कितीही हुकमत गाजवत असलं, तरी ते खूप कौटुंबिक आहेत आणि विशेषतः कमालीचे प्रेमळ आजोबा आहेत. आजोबा नातवंडांमधल्या त्या अकृत्रिम निखळ-निरपेक्ष प्रेमात मायेची ऊब आहे. ते खरं तर कमी बोलतात. कधीतरी अगदी मोजके, बऱ्याचदा कौतुकाच्या बाबतीत तर त्यांचा हात कायम आखडता असतो. माझ भाषण चांगलं झालं? माझ्या मतदारसंघासाठी मी काही बऱ्या गोष्टी केल्या? ठीक आहे अशी त्यांची भुमिका नेहमीच असते. त्यासाठी कौतुकाचे ढोल नको, प्रत्यक्ष कामाला सुरुवात करा. पुढे चला, नव्या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात करा असे ते नेहमीच म्हणत असल्याचे सुप्रिया सुळे सांगतात.

राजकीय, सामाजिक आणि कौटुंबिक सर्वच पातळीवर शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांना अनेक गोष्टी शिकवलेल्या आहेत. व्यक्तींमधले गुण कसे ओळखावेत, त्यासाठी डोळस वृत्ती कशी असावी, यशअपयश याने विचलित न होता काम कसं करावं त्याचबरोबर आपल्या आवडीनिवडी कशा जपाव्यात यांसारख्या अनेक गोष्टी त्यांनी आपल्या आचरणातून आणि उपदेशातून शिकवलेल्या आहेत. या सगळ्यामुळे बाबाच आपल्यासाठी हिरो असल्याचं सुप्रिया सुळे सांगतात.

क फॅक्टस टीम


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.