Home » लाल गाजर तुम्ही खाल्लेच असेल पण काळ्या रंगाचा गाजर कधी खालंय का?

लाल गाजर तुम्ही खाल्लेच असेल पण काळ्या रंगाचा गाजर कधी खालंय का?

by Team Gajawaja
0 comment
Carrot
Share

हिवाळा सुरु झाली की, बाजारात लालबुंद अशा गाजरांचा ढिग दिसू लागतो. गाजराचे अनेक पदार्थ घरात होऊ लागतात.  गाजरचा हलवा तर झालाच पाहिजे…एरवीही बाजारात बाराही महिने गाजर (Carrot) उपलब्ध असतात. लाल आणि नारंगी रंगाचे हे गाजरही चवदार असतात. पण या गाजरांबरोबरच आणखी एका रंगाचे गाजरही औषधासारखे उपयोगी पडत आहेत.  हे गाजर चक्क काळ्या रंगाचे आहेत. यामध्ये  अँटिऑक्सिडंट्सचा खजिना असल्याचे सांगण्यात येतं. कर्करोगासह अनेक रोगांवर हे काळे गाजर फायदेशीर आहेत. भारतात गाजर लाल, केशरी रंगाच्या गाजरासोबत जांभळ्या रंगाचे गाजरही (Carrot) काही ठिकाणी उपलब्ध असतात. मात्र त्यामध्ये या काळ्या गाजराचाही समावेश झाला आहे. 

गाजराचे (Carrot) क्सिडंट ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन हे डोळ्यांचे आरोग्य सुधारतात. गाजरामध्ये फायबरचे आणि पाण्याचे प्रमाणही चांगले असते, त्यामुळे गाजराचा आहारत नियमीत समावेश केल्यास वाढत्या वजनावरही नियंत्रण रहाते.  गाजरांमध्ये (Carrot) कॅलरीज कमी असतात. गाजरांमध्ये लाइकोपीन नावाचे आणखी एक कॅरोटीनॉइड देखील असते. लाइकोपीनमध्ये पोट, प्रोस्टेट, फुफ्फुस आणि स्तनाचा कर्करोग यांसारख्या कर्करोगाशी लढण्याची क्षमता आहे.  गाजर (Carrot) रक्तदाब नियंत्रणासही मदत करते.  रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाणही नियंत्रीत ठेवण्यासाठी गाजराची मदत होते.  गाजराचा आहारात समावेश असेल तर रोगप्रतिकारक शक्तीही वाढते, असे सांगण्यात येते.  त्यामुळेच गाजराचा (Carrot) नेहमी आहारात समावेश असणे फायदेशीर असते. अर्थात आता यात आपण कुठल्या रंगाचा गाजर खातोय, हे देखिल महत्त्वाचे ठरणार आहे. साधारणपणे लाल आणि नारंगी रंगाचे गाजर उपलब्ध असतात. हिवाळ्याच्या चार महिन्यात लाल रंगाचे आणि आकारानं मोठे असलेले गाजर मिळतात.  हे गाजर (Carrot) रंगानं लाल, आणि पाणीदार असतात. त्यामध्ये पाण्याचे प्रमाण आणि फायबरचे प्रमाण जास्त असते. शिवाय हे गाजर गोडही असतात. या गाजरांचे फायदे बरेच असतात. आता या गाजरांसोबत जांभळ्या आणि काळ्या रंगाचे गाजरही (Carrot) अनेक ठिकाणी दिसू लागले आहेत.  त्यामुळे या काळ्या रंगाच्या गाजराबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. हे काळे गाजर फक्त दिसायला वेगळे आहेत की, त्यामधील गुणधर्मही वेगळे आहेत, हेही जाणून घेणे महत्त्वाचे आहे. काळ्या गाजराचे सेवन करणे आपल्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये फायबर, पोटॅशियम, जीवनसत्त्वे यांसारखी अनेक पोषक घटक तत्वे मोठ्या प्रमाणात आढळतात. या काळ्या गाजराची लागवड भारतात ठराविक ठिकाणी केली जाते.  तुर्कस्तान, भारत, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये याची लागवड होते. मात्र ती अगदी मर्यादित स्वरुपात आहे. भारतात अलिकडे आधुनिक पद्धतीनं जिथे शेती केली जाते, तिथे या काळ्या गाजरांच्या (Carrot) लागवडीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या काळ्या गाजरामुळे पचनक्रिया निरोगी राहते आणि रोगप्रतिकार शक्ती वाढते.  तसेच डोळ्यांच्या आरोग्यासाठीही हे काळे गाजर फार उपयोगी असल्याचे स्पष्ट झाले आहे.  

या काळ्या गाजराचे सेवन केल्यावर पचनसंस्था मजबूत राहते, पचन सुधारते. काळ्या गाजरमध्ये भरपूर फायबर असते. त्यामुळे बद्धकोष्ठता आणि अॅसिडिटी सारख्या समस्या दूर होतात.  संशोधनात असेही आढळून आले आहे की,  काळ्या गाजरमध्ये (Carrot) आढळणारे अँटीऑक्सिडंट कर्करोगाचा प्रतिकार करु शकतात.  यासाठी संशोधकांनी उंदरांवर संशोधन केले आहे. या संशोधनात उंदरांच्या आहारात काळ्या गाजराचा अर्क देण्यात आला तर काही उंदरांना सामान्य आहार देण्यात आला. अभ्यासाच्या परिणामी, असे आढळून आले की ज्या उंदरांना काळे गाजर खायला दिले गेले होते, त्यांच्यात कर्करोगाचा प्रसार करणा-या पेशी रोखण्याची क्षमता वाढली आहे.  

=========

हे देखील वाचा : बचत खात्यात किती रक्कम जमा करु शकतो, जाणून घ्या टॅक्सचे ‘हे’ नियम

========

काळ्या गाजरात (Carrot) कॅलरी कमी असतात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी हे काळे गाजर पुरक मानले जातात. काळ्या गाजरमध्ये विरघळणारे फायबर असतात, जे भूक कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे आपल्या वजनाबाबत जे अत्यंत जागरुक असतात. त्यांना हे काळे गाजर म्हणजे मोठीच देणगी आहे. काळ्या गाजरात व्हिटॅमिन ए आणि बीटा कॅरोटीन सारखे पोषक घटकही आढळतात,  त्यामुळे त्यांनी डोळ्यांचे आरोग्यही जपले जाते. याशिवाय अँटीऑक्सिडंटने समृद्ध असलेले काळे गाजर सांधेदुखीवर खूप फायदेशीर ठरतात. हिवाळ्यात काळे गाजर खाल्ल्याने हृदय निरोगी राहते. यामध्ये पोषक तत्वे मुबलक प्रमाणात आढळतात, जे खराब कोलेस्ट्रॉल कमी करून हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात. काळे गाजर (Carrot) खाल्ल्याने हृदयाशी संबंधित आजारांचा धोकाही कमी होतो. त्यामुळे आता बाजारात गाजर खरेदीसाठी गेल्यावर अशाप्रकारचे काळे गाजर दिसले तर नक्की घ्या. कारण हे काळे गाजर आरोग्यासाठी वरदान ठरत आहेत.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.