Home » पुणे शहरातील ‘हॉंटेड’ जागा; हे पिकनिक स्पॉटही आहेत हॉंटेड

पुणे शहरातील ‘हॉंटेड’ जागा; हे पिकनिक स्पॉटही आहेत हॉंटेड

by Team Gajawaja
0 comment
Haunted places in Pune
Share

पुणे म्हणजेच पुण्यनगरी. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून या शहराची ओळख आहे. ऐतिहासीक वारसा जोपासणाऱ्या या शहरात अनेक वाडे आजही इतिहासातीला घटनांची आठवण आपल्याला देतात. हे शहर मंदिरांचेही आहे. गणेशोत्सव बघावा, मिरवणुका बघाव्यात तर त्या पुण्याच्याच…या पुण्यनगरीनं शिक्षण क्षेत्रातही आपला डंका कायम ठेवला आहे. अनेक आंतराष्ट्रीय ख्यातीची महाविद्यालये आणि विद्यापीठे या पुण्यात आहेत. सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक वारसा जोपासणाऱ्या या शहरात अशीही काही ठिकाणं आहेत, जिथे जाताना सावधानगिरी बाळगा असा इशारा देण्यात येतो. (Haunted places in Pune)

शनिवार वाडा  

पुण्याची ओळख म्हणून पहिले नाव येते ते शनिवार वाड्याचे. एकाकाळी पेशव्यांचे निवासस्थान असलेला हा शनिवारवाडा म्हणजे पुण्याच्या वैभवाचे प्रतिक मानण्यात येते. 22 जानेवारी 1732 रोजी शनिवार वाड्यात पेशव्यांनी गृहप्रवेश केला. हा गृहप्रवेशाचा समारंभ अतिशय शाही झाला होता. अनेक आठवडे त्यासाठी मेजवान्या झाल्या. मात्र शनिवारवाड्याच्या वैभवाला पहिला काळ डाग नारायणराव पेशवे यांच्या हत्येचा लागला. 

30 ऑगस्ट 1773 रोजी नारायणराव पेशवे यांची हत्या झाली. तेव्हा नारायणराव ‘काका मला वाचवा’ असे ओरडत आपला जीव वाचवण्यासाठी त्यांच्या काकांकडे, राघोबादादा यांच्याकडे धावले. पण गारद्यांनी अवघ्या सोळा वर्षांच्या नारायणरावांची अत्यंत निघृण हत्या केली. यानंतर शनिवारवाड्यात ‘काका मला वाचवा…’ हा नारायणरावांचा हंबरडा ऐकू येतो. असे अनेकजण सांगतात.  (Haunted places in Pune)

1824 मध्ये शनिवरावाड्याचा एक मोठा भाग आगीत बेचिराख झाला. शनिवारवाड्यातील मस्तानी दरवाजाबाबतही अनेक अफवा आहेत. या मस्तानी दरवाजाजवळ रात्रीच्या वेळी कोणीतरी गुणगुणत असल्याचे भास होतात अशी चर्चा आहे. असे असले तरी पेशव्यांच्या या भव्य वास्तुला बघण्यासाठी रोज हजारो नागरिक येथे येतात. मात्र संध्याकाळी ठराविक वेळेनंतर ही वास्तु पर्यटकांसाठी बंद करण्यात येते.  (Haunted places in Pune)

होळकर पूल 

पहिले माधवराव पेशवे यांनी 1800 मध्ये मुळा – मुठा  नदीवर बांधलेल्या होळकर पुलाला आता पुणे महानगरपालिकेनं वारसा स्थळाचा श्रेणी 2 दर्जा दिला आहे. आधी हा पूल 160 मिटर लांब आणि 8.8 मिटर रुंदीचा होता. मराठा साम्राज्याचे सरदार यशवंतराव होळकर यांचे नाव या पुलाला दिले गेले. पुढे इंग्रजी राजवटीत खडकीच्या लढाईनंतर इंग्रजांनी लष्करी तळासाठीही या पुलाचा वापर केला. या पुलावर अपघाताच्या अनेक घटना घडल्यामुळे त्यावरुन एकट्याने जाणे धोकादायक असल्याचा समज आहे.  

या पुलाच्या जवळच इंग्रज अधिकाऱ्यांच्या कबरी असून अनेक इंग्रज अधिकाऱ्यांचे दफन या पुलाच्या आसपासच्या जागेत झाले आहे. त्यामुळे या पुलावरुन रात्री एकट्याने गेल्यास काही भास होतात असे सांगण्यात येते. त्या भीतीनं अनेक गाडीचालकांचा अपघाती मृत्यू झाल्याच्या घटना झाल्यानं या होळकर पुलाभोवती गूढ  वातावरण तयार झाले आहे.  

व्हिक्टरी चित्रपटगृह

सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्याच्या इतिहासात व्हिक्टरी चित्रपटगृहाची जागा खास आहे. पुण्याच्या छावणी परिसरात इंग्रजी राजवटीमध्ये 1938 मध्ये या चित्रपटगृहची स्थापना झाली. प्रथम या चित्रपटगृहाचे नाव कॅपिटल असे होते. स्वातंत्र्यापूर्वी येथे ब्रिटीश अधिकाऱ्यांसाठी मनोरंजनाचे विशेष कार्यक्रम होत असत. नाटकाचे प्रयोगही व्हायचे. 24 जानेवारी 1943 रोजी या चित्रपटगृहात बॉम्बस्फोट झाला.  त्यात चार इंग्रजी सैनिक मारले गेले. भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांनी हा स्फोट घडवून आणला होता. (Haunted places in Pune)

पुढे या स्वातंत्र्य सैनिकांना अटक झाली आणि त्यांच्यावर खटला चालवण्यात आला. हा खटला कॅपिटल खटला म्हणून ओळखला गेला. यातील ओरोपींना देहदंडाची शिक्षा झाली. त्यानंतर या जागेत कायम कोणाचा तरी वावर असल्याची जाणीव होत असल्याचे बोलले जाते. चित्रपटगृहात आपल्या बाजूला बसून कोणीतरी कुजबूजत असल्याची जाणीव झाल्याचे काहींनी सांगतिले. इंग्रजांच्या काळात बनवलेल्या या इमारतीचा परिसर खरंतर बघण्यासारखा आहे. मात्र त्याबाबतच्या चर्चांमुळे त्याला गूढ स्वरुप प्राप्त झाले आहे.  (Haunted places in Pune)

====

हे देखील वाचा – स्वप्नात येऊन भगवान शंकरांनी सांगितले होते जमिनीखालील शिवलिंगबद्दल, जाणून घ्या बालेश्वर मंदिराची कथा

====

द हन्टेड हाऊस

पुण्याच्या प्रसिद्ध एमजी रोडवर असलेल्या जुन्या घराला ‘द हन्टेड हाऊस’ म्हणून ओळख मिळाली आहे.  या घरात एका लहानग्या मुलीची हत्या झाली होती. अतिशय क्रूरपणे झालेल्या या हत्येनंतर हे घर कायम भीतीदायक म्हणून ओळखलं गेलं. मोडळकीस आलेल्या या घराजवळून गेल्यास दुर्गंधी येते आणि किंकाळ्याही ऐकू येतात, असे काहीजण सांगतात.  

सिंहगड किल्ला

पुण्यातील सिंहगड किल्ला म्हणजे तमाम पुणेकरांच अभिमान आहे. सुमारे 4400 फूट उंचीचा हा किल्ला ट्रेकर्सचा सर्वात आवडता आहे. सिंहगड किल्ला म्हटलं की, आठवतो तो तानाजी मालुसुरे यांचा पराक्रम. तानाजी मालुसरे यांच्या बलिदानामुळे या किल्ल्याला सिंहगड हे नाव शिवाजी महाराजांनी दिले. पुरंदरच्या तहात हा किल्लाही मुघलांकडे गेला होता. तानाजी मालुसरे यांनी फक्त 500 मावळ्यांसह या किल्ल्यावर चाल केली आणि किल्ला ताब्यात घेतला, मात्र यासाठी तानाजींनी बलिदान दिले. त्यावेळी छत्रपतींनी ‘गड आला पण सिंह गेला’ म्हणत, किल्लाचे नाव सिंहगड केले. 4 फेब्रुवारी 1672 रोजी ही लढाई झाली होती.  (Haunted places in Pune)

सिंहगड किल्ल्याला असणाऱ्या  ऐतिहासीक महत्त्वामुळे अनेक पर्यटक किल्ला बघण्यासाठी येतात.   काही वर्षापूर्वी एका शाळेतील विद्यार्थ्यांचा येथे अपघात झाला होता. त्या विद्यार्थ्यांच्या किंकाळ्या अद्यापही या भागात ऐकू येतात अशी चर्चा होते. मात्र असे असले तरी सिंहगड कायम पर्यटकांनी गजबजलेला असतो. विशेषतः पावसाळ्यात आणि सुट्टीच्या दिवशी, तर येथे पर्यंटकांचा पूर आलेला असतो. (Haunted places in Pune)

– सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.