Haunted Place in Pakistan : जगामध्ये अशा काही गोष्टी आहेत ज्याबद्दल आपल्याला माहिती आहे. पण त्याबद्दल काही फारसे कळत नाही. त्यापैकीच एक गोष्ट म्हणजे भूत-प्रेतांचे अस्तित्व. काही लोक ही गोष्ट मानत नाहीत. पण आजही काही ठिकाणी भूताटकी ठिकाणे असल्याचे मानले जाते.
भूतांवर विश्वास ठेवणाऱ्या व्यक्ती जगात आजही हॉन्टेट ठिकाण असल्याचे म्हणतात. त्या ठिकाणी विचित्र घटना घडल्याच्याही कथा सांगितल्या जातात. असेच एक ठिकाण पाकिस्तानातील कराची येथे आहे. कराचीमधील 39 के घर हे भूताटकी असल्याचे सांगितले जाते. याबद्दल वैज्ञानिक पुष्टी करण्यात आलेली नाही. पण अशा ठिकाणांबद्दल नेहमीच अफवा जरुर पसरवल्या जातात. काही लोक या अफवांवर विश्वासही ठेवतात.
घराच्या आतमधून दिसतो प्रकाश
कराचीमधील पीईसीएचएस परिसरातील ब्लॉक क्रमांक सहा येथील गल्ली क्रमांक 39 के बद्दल नेहमीच बोलले जाते. या ठिकाणी एक प्रकाश दिसतो. तुम्हाला वाटेल त्या घरात एखादा व्यक्ती किंवा परिवार राहात असेल. पण खरंतर हे घर गेल्या काही दशकांपासून रिकामे आहे. हैराण करणारी गोष्ट अशी की, बहुतांश लोकांनी त्या घरातून प्रकाश येत असल्याचे पाहिले आहे. याशिवाय दावाही केला जातो की, पांढऱ्या पोषाखातील एक महिलेला देखील पाहिले आहे. ती महिला तेथून निघून गल्लीत जाते आणि काही वेळाने ती गायब होते. (Haunted Place in Pakistan)
पांढऱ्या रंगातील कपड्यामध्ये दिसते महिला
पाकिस्तानातील जर्नलच्या मते, काही वर्षांपूर्वी कराची सोसाइटीमध्ये 39-के घर होते. ही सोसायटी खासकरुन कंपनीच्या कामगारांसाठी बांधण्यात आली होती. तेथे काही घर उभारली गेली आणि आनंदाने राहू लागले. पण 39-के असणारे घर रिकामे राहिले. पण एका रात्री त्या घरातून अचानक प्रकाशाचा झोत दिसून येऊ लागला. रात्रीच्या वेळी घरातील प्रकाश पाहून सोसायटीमधील लोक घाबरली. थोड्यावेळानंतर काही लोकांनी पांढऱ्या रंगातील कपड्यातील एक महिला त्या घरात दिसली. ही बातमी वेगाने पसरली गेली आणि पाहता-पाहता त्या सोसायटीमधील लोक घाबरून पळून गेले. सर्वांना वाटू लागले होते की, 39-के घरात एखादे भूत राहत आहे.