Home » रशिया VS युक्रेन ; युद्धामुळे सुरक्षेसाठी बंकर खरेदीची घाई

रशिया VS युक्रेन ; युद्धामुळे सुरक्षेसाठी बंकर खरेदीची घाई

by Team Gajawaja
0 comment
Russia VS Ukraine
Share

रशिया युक्रेन युद्ध (Russia VS Ukraine) आता सर्व जगासाठी धोकादायक ठरु लागले आहे.  त्यातच रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी अणुयुद्धाची धमकी दिल्यामुळे जागतिक शांतताच धोक्यात आल्यासारखी आहे.   यासर्वांत नाटोच्या सैन्याने आणि रशियन सैन्यानेही अणुयुद्धाचा अभ्यास सुरु केल्यामुळे तणावात भर पडली आहे.  आता पुतिन यांनी ब्रिटनलाही अणुबॉम्बची धमकी दिली आहे.  या धमकीमुळे ब्रिटनमध्ये वेगळीच चढाओढ लागली आहे.  तिथे आता बंकर खरेदी करण्यासाठी किंवा त्यांची निर्मिती करण्यासाठी स्पर्धाच सुरु झाली आहे. अणुयुद्ध सुरु झाल्यास त्यापासून निर्मिण होणारे धोके फक्त बंकरमध्ये राहिल्यावर आपल्याला वाचवू शकतात, अशी समजूत करुन आता ब्रिटीश नागरिक बंकर खरेदीसाठी किंवा आपल्या घराच्या अंगणात त्यांच्या निर्मितीसाठी तयारीला लागले आहेत.  

रशिया आणि युक्रेनच्या (Russia VS Ukraine)युद्धाने अधिक घातक स्वरुप प्राप्त केले आहे.  मध्यंतरी शांत झालेले युद्ध पुन्हा भडकले असून युक्रेनमध्ये केव्हाही बॉम्बचा वर्षाव करण्यात येत आहे.  यापासून वाचण्यासाठी युक्रेनचे नागरिक बंकरचा आधार घेत आहेत.  मात्र जिथे युद्ध सुरु नाही, किंवा भविष्यात होईल असे कोणतेही लक्षण नाही, अशा ब्रिटनमध्येही सुरक्षेसाठी बंकर खरेदीची घाई सुरु झाली आहे.  याला कारण आहे, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची धमकी.  पुतिन यांच्या धमकीनंतर ब्रिटनला अणुबॉम्बची भीती वाटू लागली आहे.  ब्रिटनचे लोक इतके घाबरले आहेत की, ते आता अणुहल्ला झाल्यास त्यापासून होणारे नुकसान टाळण्यासाठी बंकर खरेदी करु लागले आहे.  

लष्करी रचना असलेल्या लपण्याच्या जागेला बंकर म्हणतात. बंकर सहसा सीमा किंवा मोक्याच्या ठिकाणी आढळतात. काही वेळा महत्त्वाच्या नेत्यांच्या आणि राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानी बंकरसारखी व्यवस्था केली जाते. शत्रूंच्या हल्ल्यापासून रक्षण करण्याचे काम या बंकरद्वारे होते.  कधी अचानक हल्ला झाल्यास या बंकरचा आधार घेतल्यास जीव वाचवता येतो.  रशियन युक्रेन (Russia VS Ukraine) युद्धामुळे बंकरचा वापर युक्रेनमध्ये वाढला आहे.  पुतिन यांनी पुन्हा एकदा युक्रेनविरोधातील युद्ध तीव्र केले आहे. एवढेच नाही तर अणुहल्ल्याची धमकीही दिली आहे. त्यामुळे अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशनने (नाटो)ही यापासून बचाव कसा करायचा याची तयारी सुरु केली आहे.  नाटोच्या सैन्यानं वायव्य युरोपमध्ये अण्वस्त्र सराव सुरू केला आहे.  सैन्य संभाव्य अणुयद्धाच्या तयारीला लागले असले तरी, त्याचा नागरिकांवरही परिणाम झाला आहे ब्रिटीश वृत्तपत्र डेली स्टारने दिलेल्या माहितीनुसार, पुतिन यांनी अणुयुद्धाची धमकी दिल्यापासून दिवसांपासून ब्रिटनमधील नागरिक बंकरच्या शोधात गुंतले आहेत.  गावामध्ये रहाणाऱ्या नागरिकांनी अण्वस्त्रविरोधी बंकर खरेदीबाबत चौकशी केली आहे. येथील ब्रुंडले गावाजवळील एका बंकरला 25 हजार पौंड म्हणजेच सुमारे 23 लाख रुपयांची बोलीही लागली आहे.

युनिक प्रॉपर्टी बुलेटिन या प्रॉपर्टी विकण्यास मदत करणाऱ्या वेबसाइटचे मालक रुस मॅक्लीन यांनी सांगितले की, पुतीन यांच्या धमकीनंतर बंकर खरेदी करण्यासाठी नागरिकांचे सतत फोन येत आहेत.   एका दिवसात तीन हजारांहून अधिक फोन आल्याचा दावा त्यांनी केला आहे.  याशिवाय मेल आणि फोनद्वारे मेसेजसुद्धा पाठवण्यात आले आहेत.   प्रत्येकाला आपल्या कुटुंबाला वाचवायचे आहे.  भविष्यात ब्रिटनवर अणुहल्ला झाल्यास आपले कुटुंब आणि जमापुंजी सुरुक्षित राहिल अशी जागा लोकांना हवी आहे.  आणि त्यासाठीच बंकर खरेदीची चौकशी चालू झालीय.  याबरोबरच घराच्या अंगणामध्ये बंकर निर्मिती करण्यावरही काहींनी विचार सुरु केला आहे.  

============

हे देखील वाचा : ‘लिझ ट्रस यांनीच स्वतः राजीनामा द्यावा’ अशी मागणी

===========

इकडे युक्रेनमध्येही सध्या रशियाने (Russia VS Ukraine) बॉम्बहल्ले वाढवल्यामुळे तेथील नागरिकांनी बंकरचा आधार घेतला आहे.  युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की हे देखील बंकरमध्ये लपले असल्याचा दावा केला जात आहे.   तिथेही आता अणुयुद्धापासून बचाव करु शकतील असे बंकर तयार होत असल्याची बातमी आहे.  वास्तविक बंकर म्हणजे एक प्रकारे जमिनीखाली बांधलेले घरच असते.  त्यांची भिंत कित्येक फूट जाडीच्या काँक्रीटने किंवा कित्येक इंच जाडीच्या लोखंडी थराने बनलेली असते.  काहीवेळा अशा बंकरमध्ये रेशन आणि शस्त्रे अनेक दिवस साठवून ठेवली जातात.  भारतातही जम्मू-काश्मीरमधील सांबा, जम्मू, कठुआ, पुंछ आणि राजौरी या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये अनेक बंकर बांधण्यात आले आहेत.  गोळीबार किंवा बॉम्बस्फोटाच्या वेळी लोक त्यात प्रवेश करून स्वतःला सुरक्षित ठेवू शकतात.  आता अशाच सुरक्षित बंकरची मागणी ब्रिटनमध्ये वाढली आहे.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.