भाद्रपदाच्या शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी हरतालिका व्रत केले जाते. हरतालिकेचे व्रत हे अखंड सौभाग्यासाठी आणि कुटुंबाच्या रक्षणासाठी केले जाते. अनेक ठिकाणी या व्रताला हरतालिका तिज व्रत असे देखील म्हटले जाते. गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी हरतालिका व्रत केले जाते. या दिवशी देवी पार्वतीची भगवान शंकरासह पूजा केली जाते. या व्रताला हिंदू धर्मात मोठे महत्व आहे. यंदा हे व्रत २६ ऑगस्ट २०२५ रोजी मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरे होणार आहे. पंचांगानुसार, २६ ऑगस्ट रोजी सकाळी ५:५६ ते ८:३१ या वेळेत साधारण अडीच तासांचा शुभ मुहूर्त लाभणार आहे. यावेळी पूजन आणि संकल्प करणं विशेष फलदायी ठरेल. (Marathi News)
हरतालिका व्रत हे विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्याची प्राप्ती होण्यासाठी करतात. तर अविवाहित मुली देवी पार्वतीप्रमाणे उत्तम वर मिळावा, या इच्छेने कुमारिका हे व्रत श्रद्धेने करतात. याशिवाय ज्यांना भक्तीभावाने शिव-पार्वतीची पूजा करायची आहे, त्या कुणीही हे व्रत करू शकतात. मात्र हरतालिकेचे व्रत हे काही कडक व्रतांपैकी एक आहे. त्यामुळे हे व्रत गर्भवती महिला, औषधोपचार घेत असलेल्या महिला, आजरी महिला, वयस्कर महिला यांनी करू नये. जाणून घ्या हरतालिका पूजा साहित्य आणि हरतालिका व्रत कसे करावे ते… (Harlaika Vrat)
हरतालिकेच्या पुजेचे साहित्य
हरतालिकेच्या पूजेसाठी रेती, बेल पत्र, शमी पत्र, आंब्याची पानं, पांढरे फुलं, वस्त्र, तसंच १६ प्रकारच्या पत्री (१६ झाडांची १६-१६ पानं), पूजेसाठी फुलं, तसंच सौभाग्याचं साहित्य म्हणजेच बांगड्या, काजळ, कुंकू, श्रीफळ, कलश, चंदन, तूप, तेल, कापूर, साखर, दुध, मध, दही म्हणजेच पंचामृत इत्यादी. चौरंग, रांगोळी, तांदूळ, पाण्याचा कलश, ताम्हण, पळी, पंचपात्र, तसराळ, आसन, निरांजन, शंख, घंटा, समई, कापूरारती, हळदकुंकू, अष्टगंध, गुलाल, बुक्का, चंदन, अक्षता, उदबत्ती, कापूर, तुपाच्या व तेलाच्या वाती, अत्तरफाया, विड्याची पाने, सुपार्या, बदाम, खारका, नारळ, फळे, खडीसाखर, गूळखोबरे, पंचामृत, कापसाचे वस्त्र, कोरे वस्त्र, तसेच फणी,आरसा इत्यादी. (Latest Marathi News)
हरतालिका व्रत पूजाविधी
सर्वप्रथम देवी पार्वती, भगवान शिव आणि गणेशजी यांच्या मूर्ती काळ्या ओल्या मातीपासून तयार करा आणि फुलांनी सजवा. या मूर्ती काही काळ सुकू द्या. मुर्ती नसतील तर वाळूचे शिवलिंग बनवा. चौरंगावर पिवळे कापड घालून पूजेची तयारी करा. पिवळ्या कापडावर तीन मूर्ती किंवा वाळूचे शिवलिंग असावे. त्यानंतर चौरंगावर उजव्या हाताला तांदळापासून अष्टकमल तयार करा आणि त्यावर कलश ठेवा. आता कलश वर स्वस्तिक बनवा आणि कलश मध्ये पाणी भरा आणि त्यात सुपारी, नाणे आणि हळद घाला. मूर्तींचा विधीवत अभिषेक करावा आणि त्यानंतर देवी पार्वतीला सौभाग्याच्या वस्तू अर्पण कराव्यात. (Top Marathi News)
===========
Ganesh Chaturthi : गणेश चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त आणि शुभ वेळ
===========
हरतालिका व्रतादरम्यान १६ श्रृंगाराचे विशेष महत्त्व मानले जाते. या दिवशी स्त्रिया हातावर मेंहेदीही लावतात, जी सौभाग्याची निशाणी मानली जाते. कुमारिकेने इच्छितत वर मिळविण्यासाठी तर सुवासिनीने अखंड सौभाग्य लाभू दे अशी प्रार्थना करावी. दिवसभर कडक उपवास करावा. शक्य नसल्यास फलाहार करावा. अनेक जण बाजारात उपलब्ध असलेले मातीच्या गौरी-पार्वतीची मूर्ती आणून त्याचीही पूजा करतात. प्रत्येक विभागातील एक वेगवेगळी पद्धत असली तरी पूजेची पद्धत मात्र एकच आहे. पूजेत सौभाग्याचं लेणं देवी पार्वती/गौरीला अर्पण करावं आणि देवीकडे आपल्या अखंड सौभाग्याची आणि मुलांच्या रक्षणाचा आशीर्वाद मागावा. (Social Updates)
हरतालिकेची कहाणी
एके दिवशी शंकरपार्वती कैलास पर्वतावर बसली होती. पार्वतीनं शंकराला विचारलं, महाराज सर्व व्रतात चांगलं असं व्रत कोणते? श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असलं तर मला सांगा. मी कोणत्या पुण्याईनं आपले पदरी पडले हेही मला सांगा. तेव्हा शंकर म्हणाले, जसा नक्षत्रांत चंद्र श्रेष्ठ, ग्रहात सूर्य श्रेष्ठ, चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवात विष्णू श्रेष्ठ, नद्यांत गंगा श्रेष्ठ त्याप्रमाणे हरितालिका हे व्रत सर्वांत श्रेष्ठ आहे. ते तुला सांगतो. तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस, ते व्रत ऐक. (Top Trending News)
हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं. ते पूर्वी तू कसं केलंस ते मी तुला आता सांगतो. तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस. चौसष्ट वर्षं तर झाडाची पिकली पानं खाऊन होतीस. थंडी, पाऊस, ऊन ही तिन्ही दु:ख सहन केलीस. हे तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांना फार दु:ख झालं व अशी कन्या कोणाला द्यावी? अशी त्याला चिंता पडली. इतक्यात तिथं नारदमुनी आले. हिमालयानं त्यांची पूजा केली व येण्याचं कारण विचारलं. तेव्हा नारद म्हणाले, तुझी कन्या उपवर झाली आहेत ती विष्णूला द्यावी, तो तिचा योग्य नवरा आहे. त्यांनीच मला तुजकडे मागणी करण्यास पाठविलं आहे म्हणून इथं मी आलो आहे. हिमालयाला मोठा आनंद झाला. त्यांने ही गोष्ट कबूल केली. (Top Marathi Headline)
नंतर नारद तेथून विष्णूकडे गेले. नारद गेल्यावर तुझ्या वडिलांनी ही गोष्ट तुला सांगितली, ती गोष्ट तुला रुचली नाही. तू रागावलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागावण्याचं कारण विचारलं, तेव्हा तू सांगितलंस, महादेवावाचून मला दुसरा पती करायचा नाही, असा माझा निश्चय आहे, असं असून माझ्या बापानं मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे, ह्याला काय उपाय करावा? मग तुला तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात नेलं. तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली. जवळच एक गुहा आढळली. त्या गुहेत जाऊन तू उपास केलास. (Latest Marathi Headline)
तिथं माझं लिंग पार्वतीसह स्थापिलस. त्याची पूजा केलीस. तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतिये चा होता. रात्री जागरण केलंस. त्या पुण्यानं इथलं माझं आसन हाललं. नंतर मी तिथं आलो, तुला दर्शन दिलं. आणि वर मागण्यास सांगितलं तू म्हणाली, तुम्ही माझे पती व्हावं, याशिवाय दुसरी इच्छा नाही! नंतर ती गोष्ट मी मान्य केली. मी गुप्त झालो. पुढे दुसर्या दिवशी ती व्रतपूजा विसर्जन केलीस. मैत्रिणीसह त्याचं पारणं केलंस. इतक्यात तुझे वडिल तिथं आले. त्यांनी तुला इकडं पळून येण्याचं कारण विचारलं. मग तू सर्व हकीकत सांगितलीस. पुढं त्यानं तुला मलाच देण्याचं वचन दिलं. तुला घेऊन घरी गेला. मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केली. (Top Marathi Stories)
अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली. याला हरतालिका व्रत असं म्हणतात. याचा विधी असा आहे. ज्या ठिकाणी हे व्रत करावयाचं असेल, त्या ठिकाणी तोरण बांधावं, केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं. पुढं रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं. षोड शोपचारांनी त्याची पूजा करावी, मनोभावे त्याची प्रार्थना करावी. नंतर ही कहाणी करावी व रात्री जागरण करावं. या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो. साता जन्मांचं पातक नाहीसं होतं. राज्य मिळतं. स्त्रियांचं सौभाग्य वाढतं. कहाणी ऐकल्यावर सुवासिनींना यथाशक्ति वाण द्यावं. दुसरे दिवशी उत्तरपूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं. ही साठ उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवाब्राह्मणांचे द्वारी, गाईचे गोठी, पिंपळाचे पारी सुफळ संपूर्ण. (Social Updates)
==============
हे देखील वाचा : Rishi Panchami 2025 : ऋषीपंचमी का साजरी करतात? जाणून घ्या तारखेसह महत्व
===============
हरतालिकेची आरती
जय देवी हरितालिके। सखी पार्वती अंबिके।
आरती ओवाळीतें। ज्ञानदीपकळिके।। धृ.।।
हरअर्धांगी वससी। जासी यज्ञा माहेरासी।
तेथें अपमान पावसी। यज्ञकुंडींत गुप्त होसी। जय. ।।1।।
रिघसी हिमाद्रीच्या पोटी। कन्या होसी तू गोमटी।
उग्र तपश्चर्या मोठी। आचरसी उठाउठी ।।जय. ।।2।।
तापपंचाग्निसाधनें। धूम्रपानें अधोवदनें।
केली बहु उपोषणें। शंभु भ्रताराकारणें। ।।जय.।।3।।
लीला दाखविसी दृष्टी। हें व्रत करिसी लोकांसाठी।
पुन्हां वरिसी धूर्जटी। मज रक्षावें संकटीं।। जय.।। 4।।
काय वर्ण तव गुण। अल्पमति नारायण।
मातें दाखवीं चरण। चुकवावें जन्म मरण। जय. देवी।।5।।
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics