मध्य प्रदेशातील उज्जैन मध्ये असलेल्या हरसिद्धी मातेला मांगल-चाण्डिणीच्या नावाने ओळखले जाते. असे म्हटले जाते की, हरसिद्धीची साधना केल्याने सर्व प्रकारच्या दिव्य सिद्धि प्राप्त होतात. राजा विक्रमादित्यने आपल्या बुद्धि, पराक्रम आणि उदारदतेसाठी ओळखले जातात. ऐवढेच नव्हे तर ते देवीचे उपासक होते. यामुळे त्यांना प्रत्येक प्रकारच्या दिव्य सिद्धि प्राप्त झाल्या होत्या. असे सांगितले जाते की, राजा विक्रमादित्यने ११ वेळा आपले शीर कापून देवीच्या चरणावर समर्पित केले होते. मात्र प्रत्येक वेळी देवीने त्याला जिवंत केले होते. (Harsiddhi temple)
याच ठिकाणच्या अशा मान्यतेनुसार काही गुप्त साधक येथे विशेष रुपात नवरात्रीच्या वेळी गुप्त साधना करण्यासाठी येतात. यासाठी अतिरिक्त तंत्र साधकांसाठी हे स्थान विशेष महत्वाचे आहे. उज्जैनच्या आध्यात्मिक आणि पौराणिक इतिहासाच्या कथेत याबद्दल विशेष वर्णन सुद्धा मिळते. देवीच्या ५१ शक्तिपीठांपैकी असे हे एक चमत्कारी शक्तिपीठ आहे. येथे अशी मान्यता आहे की, येथील स्तंभावर दिवा लावल्याने प्रत्येक इच्छा पूर्ण होतात.
२ हजार वर्ष जुना आहे मंदिराचा इतिहास
या मंदिरात दीप स्तंभाची स्थापना राजा विक्रमादित्यने केली होती. जर अनुमान लावल्यास दीप स्तंब २ हजार वर्षांपेक्षा अधिक जुना आहे. कारण राजा विक्रमादित्यचा इतिहास जवळजवळ २ हजार वर्ष जुना आहे. मंदिरात लोकांचे आकर्षण म्हणजे मंदिराचे प्रांगण. येथे २ दीपस्तंभ असून ते जवळजवळ ५१ फूट उंच आहेत. हे दोन्ही दीपस्तंभ मिळून जवळजवळ १ हजार ११ दीवे आहेत. असे म्हटले जाते की, या स्तंभांवर दिवा लावणे खुप कठीण आहे. (Harsiddhi temple)
हे देखील वाचा- भगवान शिवाचे जगातील सर्वात उंच मंदिर; हे मंदिर पांडवांनी बांधले आहे…
नवरात्रौत्सावेळी असे विशेष आयोजन
खरंतर येथे प्रत्येकवेळी भक्तांची गर्दी असतेच. पण नवरात्रौत्सवावेळी आणि खासकरुन येथे अश्विन नवरात्रीच्या वेळी अनेक धार्मिक आयोजन केले जाते. रात्रीच्या आरतीवेळी एक अद्भूत वातावरण असते. त्यामुले नवरात्रीच्या वेळी येथे खास उत्साह दिसून येतो. हे मदिर महाकाल मंदिरापासून काही अंतरावर आहे. रात्रीच्यावेळी हरसिद्धी मंदिराचे दरवाजे बंद असल्याने गर्भगृहात विशेष वेळी पूजा सुद्धा केली जाते. श्रीसूक्त आणि वेदोक्त मंत्रांसह होणाऱ्या या पूजेला अधिक महत्व आहे. भक्तांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी येथे विशेष तिथींच्या वेळी पूजन सुद्धा केले जाते.