Home » हार्दिकचं आयुष्य तळ्यात-मळ्यात !

हार्दिकचं आयुष्य तळ्यात-मळ्यात !

by Team Gajawaja
0 comment
Hardik Pandya
Share

गेल्या आठ महिन्यांपासून क्रिकेटर हार्दिक पांड्या हा सर्वात जास्त चर्चेचा विषय ठरला आहे. त्याला कारणंही तशीच आहेत. आधी वनडे वर्ल्ड कपमध्ये इनजर्ड होणं, त्यानंतर आयपीएलमध्ये गुजरातचा संघ सोडून मुंबई इंडियन्समध्ये परतणं आणि थेट कॅप्टनशिपवर ताव मारणं, पांड्याच्या नेतृत्वात मुंबईचा पराभव, सोशल मीडिया आणि मैदानावर ट्रोल, रोहित-हार्दिक बेबनाव चर्चा, पत्नी नताशा स्टॅनकोविकसोबत ताणलेले संबंध आणि आता त्यानंतर थेट घटस्फोट अशी दुखाची मालिकाच त्याच्या आयुष्यात आली. या सर्वांमध्ये एकच चांगली गोष्ट घडली, ती म्हणजे भारताचं वर्ल्ड कप जिंकणं ! आणि या जिंकण्यात पांड्याचा सिंहाचा वाटा होता.

नुकताच हार्दिक आणि नताशा दोघांनीही आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन विभक्त होत असल्याचं जाहीर केलं. याशिवाय त्यांचा मुलगा Agastya च्या संगोपनासाठी आम्ही मात्र एकत्र असू, असं त्यांनी म्हटलय. यावरून सोशल मिडियावर हार्दिकच्या बाजूने उभं राहणाऱ्यांची संख्या खूप होती, मात्र नताशा स्टॅनकोविकला Trolling चा सामना करावा लागला. पण गेल्या आठ महिन्यात असं काय काय घडलं ज्यामुळे हार्दिकचं आयुष्यच तळ्यात-मळ्यात होतं. (Hardik Pandya)

गेल्या वर्षी वनडे वर्ल्डकप स्पर्धेत बांगलादेशविरुद्ध पुण्यात झालेल्या मॅचमध्ये बॉलिंग करताना एक स्ट्रेट ड्राईव्ह थांबवण्याच्या प्रयत्नात हार्दिक इनजर्ड झाला. इंजरी गंभीर असल्यामुळे पुढची एकही मॅच खेळू शकला नाही. भारतीय संघासाठी तो मोठा धक्का होता. कारण हार्दिकच्यामुळे टीम मॅनेजमेंटला एक्स्ट्रा बॉलर किंवा Batsmen खेळवता येत होता. मात्र त्याला वर्ल्ड कपलाच मुकावं लागलं. यानंतर आयपीएल जवळ आलं. त्यातच हार्दिकच्या गुजरातमधून ट्रेड ऑफची चर्चा रंगू लागली. याच गुजरातने हार्दिकच्या कॅप्टनसीमध्ये एकदा विजेतेपद पटकावलं तर एकदा फायनलपर्यंत मजल मारली.

पाण आता गुजरातलाच सोडून थेट मुंबईने हार्दिक पुन्हा आपल्या संघात घेण्याचा निर्णय घेतला. मात्र हार्दिकने मुंबई इंडियन्स मॅनेजमेंटकडे थेट कॅप्टनसीची मागणी केली, ज्यामुळे रोहित शर्मा फॅन्स चांगलेच चवताळले. पुढे हार्दिक पांड्या मुंबईचा कॅप्टन झाला सुद्धा यामुळे हार्दिक आणि रोहितमध्येही फाटाफुट झाल्याचं सांगितलं जात होतं. आयपीएलच्या प्रत्येक मॅचमध्ये त्याला Trolling चा सामना करावा लागत होता. त्यातच सोशल मिडियावर तर Trolling चा महापूरच आला होता. या सर्वांचं प्रेशर असल्यामुळेच मुंबईचं आव्हान आयपीएलमध्ये टिकू शकलं नाही, अशा चर्चा सुरू झाल्या. (Hardik Pandya)

====================

हे देखील वाचा : ‘क्रिकेटच्या आवाज’ हर्षा भोगले

====================

याच दरम्यान हार्दिकच्या पत्नी नताशा स्टॅनकोविकसोबत घटस्फोटाच्या बातम्या सुरू झाल्या. आयपीएलपासून हार्दिक आणि नताशा यांच्यात सारं आलबेल नसल्याच्या गोष्टी समोर येत होत्या. नताशाने सोशल मीडिया पोस्टद्वारे ते दाखवून दिलच होतं. कारण दोघांनी एकमेकांसोबतचा फोटो पोस्ट करणंसुद्धा टळलं होतं. यानंतर टी२० वर्ल्ड कप आला. इतके महीने प्रेशर झेलत खच्चीकरण झालेल्या हार्दिकने मात्र टी२० वर्ल्ड कपमध्ये जबरदस्त परफॉरमन्स दाखवला. भारताने वर्ल्ड कप जिंकला मात्र नताशाने अभिनंदनपर पोस्ट सुद्धा केली नव्हती, ज्यामुळे तिला आणखी ट्रोल करण्यात आलं. दुसरीकडे हार्दिकवर कौतुकाचा पाऊस पडला, जी लोकं त्याला तीन-चार महिन्यापूर्वी ट्रोल करत होती, तीच आता त्याचा उदो उदो करू लागली.

यानंतर आता हार्दिक आणि नताशा दोघांनीही घटस्फोट जाहीर केला आहे. चार वर्ष एकत्र राहिल्यानंतर आता विभक्त होण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. वर्ल्ड जिंकल्याच्या आनंदानंतर पुन्हा दोन डोंगर हार्दिकवर कोसळले. ते म्हणजे एक पत्नीसोबत घटस्फोट आणि दुसरं म्हणजे टी२० वर्ल्ड कपची कॅप्टनसी गेली आणि ती सूर्यकुमार यादवच्या खिशात पडली. सततच्या Injury मुळे त्याला कॅप्टनसी न देण्यात यावी, असा बीसीसीआयचा निर्णय होता. त्यामुळे गेल्या आठ महिन्यात हार्दिक पांड्याने बरच काही झेललं आणि आता त्यांच्यासमोर क्रिकेटच्या मैदानसोबत वैयक्तिक मैदानातसुद्धा सांभाळावा लागणार आहे.  (Hardik Pandya)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.