Happy Diwali 2025:दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह आणि प्रकाशाचा सण. या सणात घराघरांत दिव्यांची रोषणाई, मिठाईचा सुगंध आणि फटाक्यांचा आत्तीशबाजी सर्वत्र असते. मात्र या आनंदसोहळ्यात अनेकदा निष्काळजीपणामुळे अपघात घडतात. फटाके फोडताना छोट्या चुका मोठे नुकसान करू शकतात. त्यामुळे दिवाळीत सुरक्षित आणि आनंदी राहावा यासाठी काही महत्वाचे सुरक्षा नियम पाळणे गरजेचे आहेत. सुरक्षिततेसोबतच पर्यावरणाची काळजी घेणेही तितकेच आवश्यक आहे. फटाके फोडताना सर्वप्रथम लक्षात ठेवावे की फटाके नेहमी मोकळ्या मैदानात, इमारतीपासून दूर आणि कोरड्या जागी फोडावेत. लहान मुलांनी मोठ्यांच्या देखरेखीखालीच फटाके फोडावेत. पेटवण्यासाठी नेहमी लांब काठी किंवा अगरबत्तीचा वापर करा हातात धरून फटाका फोडू नका. फटाके पेटवल्यानंतर लगेच मागे जावा आणि इतरांना सावध करावे. ( Happy Diwali 2025)
फटाके फोडताना अंगावर सूती किंवा कापसाचे कपडे घालावेत, कारण हे कपडे लगेच आग पकडत नाही. सिल्क, नायलॉन किंवा सिंथेटिक कपडे वापरणे टाळा. लहान मुलांना फटाके देताना त्यांना योग्य प्रकारे समजाऊन सांगा आणि धोकादायक रॉकेट्स किंवा मोठे फटाके देणे टाळा. नेहमी एक पाण्याची बादली किंवा वाळू जवळ ठेवा, जेणेकरून काही अपघात झाल्यास तत्काळ नियंत्रण मिळवता येईल.

Friercrackers family diwali celebration
फटाके फोडल्यानंतर जागा स्वच्छ ठेवणेही महत्त्वाचे आहे. अनेकदा अपघात जुने, न विझलेले फटाके पुन्हा पेटल्यामुळे होतात. त्यामुळे फटाके फोडून झाल्यानंतर ती जागा नीट तपासा. कचरा योग्य पद्धतीने गोळा करा आणि पुन्हा पेटाउ नका कारण त्यातून हानिकारक धूर निर्माण होतो. पर्यावरणपूरक फटाक्यांना प्राधान्य द्या जे कमी आवाज आणि प्रदूषण निर्माण करतात. यामुळे वायू प्रदूषण आणि धावनी प्रदूषण दोन्ही नियंत्रणात राहतील. ( Happy Diwali 2025)
=================
हे देखील वाचा :
Gambling : दिवाळीच्या रात्री नशिब आजमवण्याची परंपरा! जाणून घ्या दिवाळीत जुगार खेळण्यामागचं रहस्य
Gold Buying on Dhanteras : धनत्रयोदशीला सोनं खरेदी का करतात? वाचा पौराणिक कथेसह धार्मिक महत्व
Samudra Manthan : दिवाळीचा संबंध समुद्र मंथनाशी कसा जोडला गेला आहे? जाणून घ्या पौराणिक रहस्य
=================
दिवाळीचा खरा आनंद सुरक्षिततेत आणि जबाबदारीत आहे लक्षात ठेवा, एक चुकीचा निर्णय आनंदाचे अश्रू दुःखात बदलू शकतो. त्यामुळे फटाक्यांचा आनंद घेताना स्वतःची, कुटुंबाची आणि पर्यावरणाची काळजी घ्या. समाज म्हणून आपण सर्वांनी मिळून सुरक्षित, शांत आणि प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करा तरच या सणाचा खरा अर्थ पूर्ण होईल. या वर्षीची दिवाळी सुरक्षिततेच्या आणि जागरूकतेच्या प्रकाशात उजळवूया. फटाक्यांचा आनंद घ्या, पण नियमांचे पालन करूनच कारण सुरक्षित दिवाळीहीच आनंदाची दिवाळी आहे. ( Happy Diwali 2025)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
