हनुमानाला संटकहर्ता असे म्हटले जाते. हनुमानाची पूजा केल्याने आयुष्यातील सर्व संकट दूर होतात. काही लोक घरात हनुमानाचा फोटो सुद्धा लावतात. घरात हनुमानाचा फोटो लावणे शुभ ही मानले जाते. मात्र या फोटोंसंदर्भात काही नियम आहेत. जर हनुमानाचा फोटो चुकीच्या ठिकाणी लावल्यास तर आयुष्यात समस्या उद्भवू शकतात. हनुमानाचा फोटो योग्य दिशेला असेल तर वाईट शक्ती तुमच्यापासून दूर राहतील आणि तुमच्या आयुष्यात आनंद येईल. (Hanuman Photo)
पंचमुखी हनुमानाचा फोटो
पंचमुखी हनुमानाचा फोटो घरात लावणे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे सुख-समृद्धी येते. अशा प्रकारचे फोटो वास्तू दोष ही दूर करतात. पंचमुखी हनुमानाचा फोटो घराच्या मुख्य दरवाजावर लावला पाहिजे. त्या ठिकाणी हा फोटो लावणे शुभ मानले जाते. दरवाज्यावर लावण्यात आलेल्या पंचमुखी हनुमानाचा फोटो वाईट शक्तींना आणि वाईट नजरेपासून दूर ठेवतो.

पर्वत उचलणाऱ्या हनुमानाचा फोटो
जर तुम्हाला अधिक भीती वाटत असेल, तुमच्यामध्ये आत्मविश्वास कमी असले तर घरात पर्वत उचलणाऱ्या हनुमानाचा फोटो लावणे शुभ ठरेल. असा फोटो तुम्हाला धाडस आणि मनोबळ वाढवण्यास मदत करेल.
उडणारा हनुमान
उडणारा हनुमानाचा फोटो घरात लावल्याने यशाचे मार्ग मोकळे होतात. जर तुम्हाला करियरमध्ये काहीतरी करायचे असेल तर घरात अशा पद्धतीचा फोटो लावावा. यश मिळण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. यशाच्या मार्गात येणारे सर्व अडथळे दूर होतील. (Hanuman Photo)
सफेद रंगाच्या हनुमानाचा फोटो
सफेद रंगाच्या हनुमानाचा फोटो सुद्धा यश मिळण्यास मदत करते. नोकरीत प्रमोशन मिळण्यासाठी घरात अशा प्रकारचा फोटो लावावा.
हे देखील वाचा- नाणी, दागिने, मुर्त्या…पाकिस्तानात मिळाले जगातील सर्वाधिक जुने बौद्ध मंदिर
दक्षिण दिशेला हनुमानाचा फोटो
हनुमानाचा बसलेल्या मुद्रेतील फोटो दक्षिण दिशेला लावावा. त्याचा चेहरा दक्षिण दिशेला असेल तर शुभ मानले जाते. या दिशेला हनुमानाचा फोटो लावल्यास त्याची कृपा आपल्यावर कायम राहते. आयुष्यातील सर्व समस्या दूर होतात. परिवारातील सदस्यांना आजारपणापासून दूर ठेवतो.
उत्तर दिशेला हनुमानाचा फोटो
ज्या फोटोत हनुमान उत्तर दिशेला पाहत असेल असा फोटो लावाला. यामुळे भगवान प्रसन्न होतो. त्याचसोबत पैशांसंदर्भातील समस्या ही दूर होतात.
रामदरबारातील फोटो
रामदरबारातील फोटो घराच्या मुख्य हॉलमध्ये लावावा. यामुळे घरातील समस्या दूर होतातच. पण घरात आनंदाचे वातावरण ही राहते.