Home » Hanuman Mandir : पाकिस्तानमध्ये आहे तब्बल १५०० वर्ष जुने हनुमान मंदिर

Hanuman Mandir : पाकिस्तानमध्ये आहे तब्बल १५०० वर्ष जुने हनुमान मंदिर

by Jyotsna Kulkarni
0 comment
Hanuman Mandir
Share

येत्या १२ एप्रिल रोजी सर्वत्र मोठ्या उत्साहाने हनुमानाचा जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे. त्यासाठी सगळीकडे मोठी जय्यत तयारी देखील चालू आहे. शक्तीची आणि बुद्धीची देवता असलेला हनुमान श्रीरामांचा सर्वात मोठा भक्त आहे. हनुमानाबद्दल आणि त्यांच्या कार्याबद्दल आपण अनेकदा विविध पद्धतीने ऐकले, वाचले आणि पाहिले असेल त्यामुळे आपल्यासाठी हनुमान अजिबातच नवीन नाही. आपल्या देशात हनुमानाची असंख्य मंदिरं आहेत. मात्र आज आम्ही तुम्हाला हनुमानाच्या एका अशा मंदिराबद्दल सांगणार आहोत, ज्याबद्दल खूपच कमी लोकांना माहिती असेल. (Hanuman Mandir)

हनुमानाचे भक्त तर भारतासोबतच भारताबाहेरील देशांमध्ये देखील आहेत. त्यामुळे भारताबाहेर देखील काही ठिकाणी हनुमानाची पूजा केली जाते, मंदिरं देखील आहेत. असेच एक हनुमानाचे प्रसिद्ध मंदिर आहे, पाकिस्तानमध्ये. ऐकून नवल वाटले ना…? मात्र हे खरे आहे. पाकिस्तानमध्ये असलेले हे हनुमानाचे मंदिर खूपच जुने आणि जाज्वल्य आहे. हनुमान जयंतीच्या निमित्ताने जाणून घेऊया याच मंदिराबद्दल. (Hanuman Jayanti)

Hanuman Mandir

पाकिस्तान मधील कराची या शहरामध्ये हे हनुमानाचे मंदिर स्थित आहे. या ऐतिहासिक अशा हिंदू मंदिराचे नाव पंचमुखी हनुमान मंदिर असे असून, हे मंदिर सिंध सांस्कृतिक संरक्षण अधिनियम १९९४ अंतर्गत राष्ट्रीय वारसा स्थळ म्हणून घोषित केले गेले आहे. हे मंदिर पाकिस्तानमधील अशा काही मंदिरांपैकी एक आहे; जे हिंदू धार्मिक स्थळं उद्ध्वस्त केली जात असताना वाचलं होतं. सिंध प्रांतातील ऐतिहासिक आणि प्राचीन वास्तू किंवा ठिकाणांचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी हा कायदा लागू करण्यात आला आहे. (Marathi Latest News)

कराची येथे सोल्जर बाजारमध्ये हे मंदिर स्थित आहे. हनुमानाची ही मूर्ती १५०० वर्षं जुनी आहे. अठराव्या शतकात या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला होता. हनुमानाची ही स्वयंभू मूर्ती असल्यानं लोकांची त्यावर खूप श्रद्धा आहे. अनेक भक्त हनुमानाला ११ प्रदक्षिणा घालतात. असं केल्यानं भाविकांच्या आयुष्यातील अडचणी दूर होतात आणि सर्व इच्छा पूर्ण होतात अशी लोकांची श्रद्धा आहे. मंदिर हिंदूंसाठी एक महत्त्वाचे मंदिर समजले जाते. कारण जगातील हे एकमेव मंदिर असे आहे ज्या ठिकाणी हनुमानाची मूर्ती ही मानवनिर्मित नसून स्वयंभू आहे. मूर्तीची उंची आठ फूट इतकी आहे. मूर्ती त्रेता युगातली असल्याचे दिले जाते. (Top Trending News)

=========

हे देखील वाचा : Pamban Bridge : जाणून घ्या भारतातील पहिल्या व्हर्टिकल लिफ्ट सी ब्रिजची वैशिष्ट्ये

Donald Trump : रक्ताचा बदला घेणार ट्रम्प यांना धोका वाढला !

==========

हनुमानाने एका भक्ताला या ठिकाणी दर्शन दिले होते त्या ठिकाणी हे मंदिर बांधण्यात आल्याचे म्हटले जाते. १४ वर्षांच्या वनवासामध्ये भगवान श्रीरामांनी देखील या ठिकाणी भेट दिल्याचे म्हटले जाते. कराचीच्या या हनुमान मंदिरात भारतातूनही मोठ्या संख्येनं भक्त दर्शनासाठी जात असतात.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.