हनुमान जयंतीचा सण अगदी तोंडावर आला आहे. शक्ती आणि बुद्धीचे प्रतीक म्हणजे श्रीराम भक्त हनुमान. हनुमानाने आपल्या सामर्थ्याने मोठमोठे पराक्रम केले. एक शिष्य, भक्त कसा असावा याचे अतिशय उत्तम उदाहरण म्हणजे हनुमान. चिरंजीव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हनुमानाचा जन्मोत्सव आपण आता साजरा करणार आहोत. अगदी बालपणापासूनच त्यांनी त्यांच्या लीला दाखवायला सुरुवात केली होती. (Hanuman)
जो हनुमान स्वयं शिव शंकराचा अंश होता, ज्याला तेजस्वी अशा सूर्यदेवाने ज्ञान दिले, तर पवन देवाने त्यांना पुत्र मानले होते. हनुमान शक्तिशाली असण्यासोबतच, बुद्धिवान, तेजस्वी आणि सामर्थ्यवान देखील होते. शक्तीची देवता म्हणून त्यांची एक खास ओळख आहे. उत्तम शरीर असल्यास कोणतेही काम, संकट कधीच आपल्यावर हावी होऊ शकत नाही. म्हणूनच समर्थ रामदासांनी देखील श्रीरामांसोबतच हनुमानाला आपले आराध्य दैवत मानले होते.(Hanuman Jayanti)
समर्थ रामदासांनी कायमच मनःसामर्थ्यासाठी बलोपसना खूप महत्त्वाची असल्याचे सांगितले. समर्थ रामदास हे भगवान श्रीराम आणि रामभक्त हनुमानाचे निस्सीम भक्त होते. शरीर बलशाली असेल तर माणूस कोणत्याही संकटाचा, नकारात्मकतेचा विलक्षण ताकदीने सामना करू शकतो, अशी शिकवण समर्थ रामदासांनी दिली. तरुणांना बलोपासना करण्याची प्रेरणा मिळावी यासाठी त्यांनी शक्तीची देवता असलेल्या हनुमानाची मंदिरं महाराष्ट्रातील विविध गावांमध्ये स्थापन केली. त्यापैकी महाराष्ट्रातली ११ मारुती मंदिरं विशेष प्रसिद्ध आहेत.(11 Maruti)
बलोपासना आणि समर्थ संप्रदायाची सुरुवात करताना रामदास स्वामींनी तरुणांसमोर शक्तीचे प्रतीक असलेल्या मारुतीची स्थापना केली. साताऱ्याजवळ असलेल्या जरंडेश्वर इथल्या हनुमंताचे दर्शन घेऊन समर्थांनी आपले कार्य सुरू केले. सातारा, कराड आणि कोल्हापूर परिसरात समर्थांनी हे ११ मारुती स्थापन केले. इ.स. १६४५ ते १६५५ या दहा वर्षांत समर्थांनी या ११ मारुतींची स्थापना केली. हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने जाणून घेऊया या ११ मारुतींबद्दल. (Marathi Top News)
=========
हे देखील वाचा : Donald Trump : अमेरिकेतील स्टोर्समध्ये ग्राहकांची गर्दीच गर्दी !
==========
वीर मारुती, प्रताप मारुती चाफळ (Veer Maruti)
सातारा, चाफळ आणि सज्जनगड परिसरात समर्थ रामदासांनी दीर्घ काळ वास्तव्य केलं. इ. स. १६४८ मध्ये अंगापूरच्या डोहात सापडलेल्या श्रीराम मूर्तीची स्थापना समर्थ रामदासांनी चाफळला केली. या मंदिरासमोर दास मारुती, तर मंदिरामागे प्रताप मारुतीची मूर्ती समर्थांनी स्थापन केली. श्रीरामासमोर हात जोडून उभा असलेला दास मारुती आणि मंदिरामागचा प्रताप मारुती यांच्या मूर्ती अतिशय सुंदर आणि आकर्षक आहेत. सातारा-कराड रस्त्यावर उंब्रज गावातून चिपळूणकडे जाणारा रस्ता आहे. तिथून उजवीकडे वळून पुढे एक रस्ता चाफळला जातो. तिथे श्रीरामाचं हे सुंदर मंदिर आहे. (Marathi Latest News)
माजगावचा मारुती (Majgaoncha Maruti)
चाफळपासून तीन किलोमीटर अंतरावर माजगावला समर्थांनी एका पाषाणाला मारुतीचं रूप देऊन मूर्ती घडवली. पाच फूट उंचीची ही मूर्ती पश्चिमेला चाफळच्या श्रीराम मंदिराकडे तोंड करून उभी आहे.
शिंगणवाडीचा मारुती, खडीचा मारुती (Shingwadicha Maruti)
चाफळपासून एक किलोमीटर अंतरावर शिंगणवाडीची टेकडी आहे. तिथे समर्थांनी मारुतीची छोटीशी मूर्ती स्थापन केली. याला चाफळचा तिसरा मारुती, खडीचा मारुती किंवा बाल मारुती असं म्हटलं जातं. या ठिकाणी समर्थांचं रामघळ नावाचं ध्यानस्थळ आहे. तिथे ही चार फुटांची मूर्ती समर्थांनी स्थापन केली. मूर्तीचं तोंड उत्तरेकडे असून, तिच्या डाव्या हातात ध्वजासारखी वस्तू दिसते.
उंब्रजचा मारुती (Umbrajcha Maruti)
१६५० मध्ये समर्थांनी उंब्रजला एक मारुती मंदिर बांधलं आणि एका मठाची स्थापना केली. या मंदिरातल्या मूर्तीची उंची दोन फूट असून, ती अत्यंत देखणी आहे. समर्थांना उंब्रजमधली काही जमीन बक्षीस मिळाली होती. तिथे त्यांनी हे मंदिर उभारलं आहे.
मसूरचा मारुती (Masurcha Maruti)
उंब्रजपासून दहा किलोमीटरवरच्या मसूर गावात समर्थांनी १६४६ मध्ये मारुतीच्या मूर्तीची स्थापना केली. ही पूर्वाभिमुख मूर्ती पाच फूट उंचीची असून, चुन्यापासून तयार केलेली आहे. मारुतीच्या पायाखाली जंबुमाळी नावाचा राक्षस दबलेला दिसतो.
शिराळ्याचा मारुती (Shiralyacha Maruti)
नागपंचमी उत्सवासाठी प्रसिद्ध असलेल्या सांगली जिल्ह्यातील शिराळा या गावात देखील समर्थांनी १६५५ मध्ये या मारुतीची स्थापना केली. शिराळा एसटी स्टँडजवळ हे मंदिर आहे. ही मूर्ती सात फूट उंच असून, चुन्यापासून तयार केलेली आहे. मंदिर आणि मूर्ती उत्तराभिमुख आहे. मूर्तीच्या उजव्या-डाव्या बाजूला झरोके असल्याने सूर्योदय आणि सूर्यास्तावेळी सूर्यकिरणं थेट मूर्तीच्या तोंडावर येतात.
=========
हे देखील वाचा : America : इस्रायल विरोधात लिहिल्यास खबरदार !
==========
शहापूरचा मारुती (Shahapurcha Maruti)
११ मारुतींपैकी सर्वांत प्रथम स्थापन झालेला मारुती म्हणजे शहापूरचा मारुती. १६४५ मध्ये समर्थांनी त्याची स्थापना केली. त्याला चुन्याचा मारुती असंही म्हणतात. सात फूट उंचीची ही मूर्ती पूर्वाभिमुख असून, काहीशी उग्र आहे. कराड-मसूर रस्त्यावर १५ किलोमीटर आणि मसूरपासून तीन किलोमीटर अंतरावर शहापूर फाटा आहे. तिथून एक किलोमीटरवर शहापूरच्या एका टोकाला नदीकाठी हे मंदिर आहे.
बहे बोरगावचा मारुती (Bahe Borgaoncha Maruti)
सांगलीतल्या बहे गावाजवळच बोरगाव आहे. त्यामुळे याला बहे बोरगाव असं म्हणतात. कराड-कोल्हापूर रस्त्यावर पेठपासून १२ किलोमीटर अंतरावर हे तीर्थक्षेत्र आहे. रामदासांनी १६५२ मध्ये तिथे मारुतीची स्थापना केली.
मनपाडळेचा मारुती (Manpadlecha Maruti)
कोल्हापूर ते वडगाव वाठारपासून पुढे १४ किलोमीटर अंतरावर मनपाडळे गाव आहे. तिथे समर्थांनी ५ फूट उंचीची साधी, सुबकशी मारुतीची मूर्ती स्थापन केली. ही मूर्ती आणि देऊळ उत्तराभिमुख आहे. मूर्तीजवळ दीड फूट उंचीची कुबडी पाहायला मिळते. (Marathi)
=========
हे देखील वाचा : Hanuman Mandir : पाकिस्तानमध्ये आहे तब्बल १५०० वर्ष जुने हनुमान मंदिर
==========
पारगावचा मारुती (Pargaoncha Maruti)
कराड-कोल्हापूर रस्त्यावर वाठार गाव आहे. तिथून वारणा साखर कारखान्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर कोल्हापूर जिल्ह्यात नवे पारगाव आहे. तिथे समर्थ रामदासांनी स्थापन केलेल्या मारुतीचं मंदिर आहे. ११ पैकी या मारुतीची स्थापना सर्वांत शेवटी करण्यात आली. इथली मूर्ती दीड फूट उंचीची असून, मनपाडळेपासून पारगाव पाच किलोमीटरवर आहे. (Top Stories)