चैत्र महिना सुरु झाला की एकापाठोपाठ एक सतत सणवार चालू होतात. गुढीपाडवा, रामनवमी झाली की वेध लागतात ते हनुमान जयंतीचे. प्रभू श्रीरामांचा जन्म झाल्यानंतर अवघ्या आठच दिवसात त्यांच्या सर्वात प्रिय शिष्याचा अर्थात हनुमानाचा जन्म झाला आहे. ६ एप्रिल रोजी राम नवमी झाली त्यानंतर आता हनुमान जयंती येईल, या हनुमान जयंतीबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.(Hanuman Jayanti)
हनुमानाचा जन्म चैत्र महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी आई अंजनी आणि राजा केसरी यांच्या पोटी झाला होता. हिंदू कॅलेंडरनुसार, हनुमान जयंती चैत्र महिन्यातील पौर्णिमा तारीख १२ एप्रिल रोजी पहाटे ३:२१ वाजता सुरू होईल. तसेच, तारीख दुसऱ्या दिवशी १३ एप्रिल रोजी सकाळी ५:५१ वाजता संपेल. उदय तिथीनुसार, १२ एप्रिल रोजी हनुमान जयंती साजरी केली जाईल.(Lord Hanuman)
हनुमान जयंती शुभ मुहूर्त
हनुमान पूजेची वेळ (सकाळी) – सकाळी ०७ वाजून ३५ मिनिटांनी सुरु होणार असून, हा मुहूर्त ०९ वाजून ११ मिनिटांनी संपेल.
हनुमान जयंती पूजा
हनुमान जयंतीच्या दिवशी प्रातःकाळी उठून स्नान करावं. हनुमानाच्या प्रतिमेसमोर उपवासाचा संकल्प करा. या दिवशी पिवळ्या किंवा लाल रंगाचे कपडे परिधान करण्याला प्राधान्य दिले जाते. हनुमान जयंतीच्या दिवशी चमेलीच्या तेलात सिंदूर मिसळून हनुमानाला अर्पण करावा. चमेलीच्या तेलाचा दिवा लावा आणि गुलाबाच्या फुलांची माळ अर्पण करा. (Marathi Top News)
=========
हे देखील वाचा : China : भूकंपाच्या छायेत चीन !
==========
प्रसाद म्हणून गुळ आणि हरभरा ठेवावा. हनुमानाला बुंदीचे लाडू देखील आवडत असल्याने ते देखील प्रसाद म्हणून ठेवता येतात. यानंतर ७ वेळा हनुमान चालिसा पठण करावे. नंतर शेवटी आरती करावी. या दिवशी दान करण्याला खूपच महत्व आहे. त्यामुळे आपल्या क्षमतेनुसार जमेल ते गरजूंना दान करावे. अनेक ठिकाणी या दिवशी घरी रामायण पठण देखील केले जाते.(Top Trending News)
मान्यतेनुसार हनुमान जयंतीच्या दिवशी व्रत केल्यामुळे तुम्हाला हनुमानाची कृपा प्राप्त होते आणि आयुष्यामध्ये सुख, शांति आणि समृद्धी नांदते. संतान प्राप्तीसाठी हनुमान जयंतीला व्रत करणे फायदेशीर ठरते. या दिवशी हनुमान चालीसा आणि सुंदरकांड पठण केल्याने देखील फायदा होतो. मंगळवारच्या दिवशी हनुमानाची पूजा आणि त्यांना सिंदूर अर्पण केल्यामुळे तुमच्या कुंडलीतील मंगल दोष कमी होतो.(Social News)
हनुमान जयंतीची कथा
हनुमान जयंती वर्षांतून देन साजरी केली जाते. वाल्मिकी रामायणानुसार, हनुमानाचा जन्म कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्ष चतुर्दशीला झाला. मग शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला हनुमान जयंती का साजरी केली जाते? यावर आधारित एक पौराणिक कथा देखील सांगितले जाते. या कथेनुसार, एकदा हनुमान लहान असताना त्यांना भुक लागली तेव्हा त्यांना आकाशात सूर्य दिसला, त्यांना वाटलं की ते फळ आहे. तेव्हा हनुमान सूर्याला गिळायला निघाले होते.(Marathi Latest NEws)
=========
हे देखील वाचा : Donald Trump : रक्ताचा बदला घेणार ट्रम्प यांना धोका वाढला !
==========
तेवढ्यात, संपूर्ण पृथ्वीवर अंधार झाला. ही गोष्ट इंद्रदेवाला समजल्यावर त्यांनी हनुमानाला थांबविण्यासाठी वज्राने प्रहार केला, त्याचा परिणाम हनुमानावर झाला आणि ते बेशुद्ध झाले. जेव्हा ही गोष्ट पवनदेवाला कळली तेव्हा संपूर्ण ब्रह्मांडातील हवा त्यांनी थांबवली. त्यामुळे पृथ्वीवरील जीव हे कासावीस होऊ लागले. तेव्हा ब्रह्म देव यांनी पवनदेवाला शांत करण्यासाठी हनुमान यांना जीवनदान दिले. ज्यादिवशी हनुमान यांना जीवनदान मिळाले तो दिवस हा चैत्र महिन्यातील पौर्णिमेचा होता. त्यामुळेच चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्ष पौर्णिमेला हनुमान जन्मोत्सव साजरा केला जातो.(Top Stories)