Home » आणि हातमाग दिवस साजरा होऊ लागला

आणि हातमाग दिवस साजरा होऊ लागला

by Correspondent
0 comment
Share

७ ऑगस्ट हा दिवस आपण हातमाग दिन म्हणजेच नॅशनल हँडलूम डे म्हणून देशभरात साजरा करतो. पण फ्रेन्डशिप डे किंवा व्हॅलेंटाईन डे सारखा मोठ्या प्रमाणात या दिवसाचं सेलिब्रेशन करताना आपण कधी पाहिलं नसल्याने हा दिवस आपल्या सहसा लक्षात राहत नाही, पण या दिवसच ऐतिहासिक महत्व सुद्धा मोठं आहे..

१९०५ साली कलकत्ता टाउन हाॅल मध्ये बंगालच्या फाळणी विरुध्द आंदोलन करताना ‘स्वदेशी चळवळ’ सुरु करण्यात आली.. ७ ऑगस्ट १९०५ साली स्वदेशी चळवळीच्या मुख्य उद्दिष्टानुसार, आपल्या देशाच स्वतःच उत्पन्न वाढवायचं आणि परदेशी मालावर बहिष्कार टाकायचा हे होतं.

गेल्या काही दिवसातील भारत चीन आणि इतर अंतरराष्ट्रीय वाद आणि तणावाची परिस्थिती बघता, पूर्वी केलेल्या ‘स्वदेशी आंदोलना’ची प्रत्येक देश्प्रेमी नागरिकाला आठवण झाल्यावाचून राहिली नाही.
७ ऑगस्ट २०१५ रोजी भारताचे प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा मद्रास युनिव्हरसिटीच्या सेंटेनरी हॉल (चेन्नई) इथे ‘हातमाग दिनाची’ घोषणा केली. भारताला स्वतंत्र मिळवून देण्यात स्वदेशी चळवळीचा किती मोठा वाटा होता हे आपण जाणतोच, पण भारत स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा भरतची अर्थव्यवस्था मजबूत असावी म्हणून हा ‘स्वदेशी’चा प्रपंच त्या काळात क्रांतिकारकांनी घडवून आणला. हातमाग उद्योगाचं देशाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासात मोठं योगदान आहे. भारत हा शेतीप्रधान देश म्हणून ओळखला जातो, पण शेती नंतर सगळ्यात मोठ्या प्रमाणात कार्यरत असणारा उद्योग हा हातमागाचा आहे. म्हणूनच हातमाग कामगारांना योग्य दर्जा, योग्य उत्पन्न आणि विकासाची संधी मिळावी या हेतूने हातमाग दिनाची सुरवात करण्यात आली. हातमाग दिनाला ३ वर्ष झाली असताना, स्मृती इराणी यांनी सुद्धा “चला, आपल्या विविध हातमाग क्षेत्राचा प्रचार करू आणि आपल्या दैनंदिन जीवनात त्याचा अवलंब करून विणकऱ्यांना समर्थ बनवू” अशा आशयाच्या भाषणाने सगळ्यांना प्रोत्साहन दिले होते.

या वर्षी हातमाग दिवसाचे ५वे वर्ष आहे. स्वदेशी पासून सुरु झालेली ही चळवळ, आज प्रत्येक विणकऱ्याच्या कष्टाने इतकी पुढे गेली आहे कि, भारतात बनवलेल्या हातमागासाठी आता विदेशातून सुद्धा मागणी येते. चला तर मग आपणही हा दिवस सजगतेने साजरा करू यात, आणि भारताचा नागरिक असल्याचा अभिमान बाळगूया.

-कांचन


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.