Home » ‘बाहुबली’ चित्रपटासारखा धबधबा पाहायचा असेल, तर हंदवाडा धबधब्याला नक्की द्या भेट

‘बाहुबली’ चित्रपटासारखा धबधबा पाहायचा असेल, तर हंदवाडा धबधब्याला नक्की द्या भेट

0 comment
Handawada Waterfall
Share

‘बाहुबली’ हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. चित्रपटाची कथा, प्रभासचा अभिनय आणि इतर कलाकारांचा दमदार अभिनय जितका पसंत केला गेला, तितकेच चित्रपटाचे चित्रीकरण, शूटिंग लोकेशन प्रेक्षकांना भावले. सुंदर दृश्य, जंगल, पर्वत, नद्या आणि धबधबे यांच्यामध्ये चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले होते. ही दृष्ये पाहून तुमच्याही मनात आले असेल की, एवढी सुंदर जागा आपल्यालाही जवळून पाहायला मिळावी.  (Handawada waterfall)

बर्‍याचदा तुम्ही चित्रपटांमध्ये पाहता त्या ठिकाणांचा प्रभाव तुमच्यावर पडतो आणि ट्रिपमध्ये त्या ठिकाणांना भेट देण्याचे प्लॅन बनतात. अशा स्थितीत बाहुबली चित्रपटाच्या सीनमध्ये प्रभासला एका सुंदर आणि विशाल धबधब्याच्या मध्ये पाहून, हा धबधबा जवळून पाहता यावा, असे तुमच्या मनात नक्कीच आले असेल. या सुंदर ठिकाणाला भेट द्यायची असेल, तर छत्तीसगडमध्ये असाच एक धबधबा आहे. तुम्हालाही ‘बाहुबली’सारखा सुंदर धबधबा जवळून पाहायचा असेल, तर जाणून घ्या छत्तीसगडमधील हंदवाडा धबधब्याबद्दल.   (Handawada waterfall)

कोठे आहे हंदवाडा धबधबा?

छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यातील ओरछा ब्लॉकमध्ये हंदवाडा नावाचा धबधबा आहे. हंदवाडा हा येथील सर्वात सुंदर आणि उंच धबधबा आहे, जो अगदी ‘बाहुबली’ चित्रपटातील धबधब्यासारखा आहे. खरं तर, छत्तीसगडमधील अबुझमदच्या मैदानापासून डोंगरीपर्यंत नदी वाहते, जी पुढे धबधब्याचे रूप धारण करते. या धबधब्याची उंची सुमारे ३०० फूट आहे.  (Handawada waterfall)

सभोवतालचे दृश्य 

हंदवाडा धबधब्याच्या अगदी वर आणखी एक धबधबा दिसतो. ज्याचा नजारा अगदी पाहण्यासारखा आहे. या धबधब्याच्या आजूबाजूला घनदाट जंगले आहेत, जिथे पक्ष्यांचा किलबिलाट आणि धबधब्याच्या प्रवाहाचा आवाज गुंजतो. निसर्गसौंदर्याने नटलेले हे ठिकाण कोणालाही भुरळ घालेल असेच आहे!  (Handawada waterfall)

याच ठिकाणी होणार होते शूटिंग

चित्रपट निर्मात्यांना ‘बाहुबली’च्या पर्वतीय दृश्याचे शूटिंग इथेच करायचे होते. परंतु नक्षलग्रस्त भाग असल्याने त्यांना शूटिंगची परवानगी मिळू शकली नाही आणि नंतर लोकेशन बदलावे लागले.  (Handawada waterfall)

हंदवाडा धबधब्यापर्यंत पोहचण्याचा मार्ग

तुम्हाला हा धबधबा पाहण्यासाठी जायचे असेल, तर तुम्ही छत्तीसगडला विमानसेवा, ट्रेन किंवा बसने जाऊ शकता. मात्र याठिकाणी पर्यटन सुविधांचा बराच अभाव आहे, ज्यामुळे हंदवाडा येथे फारसे पर्यटक पोहोचू शकत नाहीत. त्याचबरोबर नक्षल क्षेत्र असल्याने येथील मार्गही सोपा नाही. पण जर तुम्ही साहसी आणि निसर्गप्रेमी असाल, तर तुम्ही हंदवाडा धबधब्यापर्यंत नक्कीच पोहचू शकता. हा धबधबा दंतेवाडा जिल्हा मुख्यालयापासून ६५ किमी अंतरावर आहे. येथे जाण्यासाठी मुचनार इंद्रावती घाटात पोहोचल्यानंतर बोटीने नदी ओलांडून १५ किमी अंतर कापावे लागते. धबधब्यापर्यंत जाण्यासाठी पाच किलोमीटर पायपीटही करावी लागते. मात्र त्यांनंतर दिसणारा मनमोहक नजारा तुमचा सगळा थकवा दूर करेल.  (Handawada waterfall)


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.