वारंवार हात धुतल्यानंतर तुम्ही सुद्धा हँन्ड ड्रायरचा (Hand Dryer) वापर करत असाल तर वेळीच सावध व्हा. कारण तज्ञांनी याच संदर्भात अलर्ट राहण्यास सांगितले आहे. हात धुतल्यानंतर लोकांना असे वाटते की, आपल्या हातांवर किटाणू राहत नाही. परंतु जेव्हा हात धुतल्यानंतर ते हँन्ड ड्रायर खाली पकडतात तेव्हा ते पुन्हा संक्रमित होतात. तज्ञांचे असे म्हणणे आहे की, याच कारणास्तव हँन्ड ड्रायर मशीनच्या माध्यमातून संक्रमण वाढले जाते. अशातच जाणून घेऊयात हँन्ड ड्रायर कशा पद्धतीने संक्रमण वाढवते आणि त्याबद्दलचा रिपोर्ट काय सांगतो.
-असा वाढतो धोका
डेलीमेलच्या एका रिपोर्टनुसार आपल्या आजूबाजूचे वातावरण आणि हवेत लाखो बॅक्टेरिया असतात. हँन्ड ड्रायर या बॅक्टेरियाला खेचतात आणि तुमच्या हातावर सोडतो. हात धुतल्याने त्यावर ओलावा असल्याने ते त्वचेवर चिकटतात. यापू्र्वीच्या रिसर्चमध्ये सुद्धा हे समोर आले होते की, सार्वजनिक वॉशरुममध्ये कोळी, हेपेटाइटिस आणि फीकल बॅक्टेरिया हे मोठ्या प्रमाणात असतात.
-रिसर्चमध्ये दावा
प्रसिद्ध टिकटॉक सायन्स चॅनल द लॅब लाइफने एका प्रयोगाच्या माध्यमातून दाखवून दिले की, हँन्ड ड्रायर स्वच्छ केलेल्या हाताला संक्रमित करत आहे. त्याला २० लाख लाइक्स आणि १२ हजारांहून अधिक कमेंट्स त्यासाठी केल्या आहेत. द लॅब यांनी असा दावा केला आहे की, बाथरुम मध्ये असलेले बॅक्टेरियल एयरोसॉल हँन्ड ड्रायरच्या माध्यमातून हातावर जमा होतात. यामुळे संक्रमण वाढण्याचा धोका वाढतो.
-७७००० प्रकारचे बॅक्टेरिया
रिसर्च रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आलेले नाही की, या अभ्यासादरम्यान कोणते-कोणते बॅक्टेरिया मिळाले आहेत. मात्र या विषयावर झालेल्या रिसर्च मध्ये असे सांगितले गेले आहे की, पब्लिक रेस्टरुमध्ये इंफ्लूएंजा, स्ट्रेप्टोकोकस, साल्मोनेला, शिगेला आणि नोरोवायरस मिळाले आङेत. २०१५ मध्ये करण्यात आलेल्या रिसर्चनुसार रेस्टरुममध्ये ७७००० प्रकारचे बॅक्टेरिया आणि वायरस आढळून आले आहेत.(Hand Dryer)
-कोठून येतात हे बॅक्टेरिया
रिसर्च रिपोर्टनुसार वॉशरुम मध्ये हे बॅक्टेरिया टॉयलेट फ्लश केल्याने पसरले जातात. येथे असलेल्या हवेच्या कारणास्तव ते संपूर्ण वॉशरुममध्ये पसरतात. तज्ञांचे असे म्हणणे आहे की, पब्लिक वॉशरुम मध्ये अशा स्थितीपासून बचाव करण्यासाठी हँन्ड ड्रायर ऐवजी टॉवेलचा वापर करावा.
हे देखील वाचा- तरुणांमध्ये हार्ट अटॅक येण्याचे वाढलेय प्रमाण, वेळीच अशी घ्या काळजी
-पेपर टॉवेल विरुद्ध हँन्ड ड्रायर
२०१५ मध्ये झालेल्या वेस्टमिंटर युनिव्हर्सिटीच्या एका रिसर्चमध्ये जेट एअर ड्रायर आणि पेपर टॉवेलमध्ये तुलना करण्यात आली होती. रिसर्चमध्ये असे समोर आले की, जेट एअर ड्रायरमध्ये यीस्टच्या ५९ चे प्रकार मिळाले. तर पेपर टॉवेलमध्ये हा आकडा केवळ ६.५ होता. वेगाने येणाऱ्या वाऱ्यामुळे ते व्यक्तीच्या चेहऱ्यापर्यंत पोहचतात. तर मुलांमध्ये याचा धोका अधिक वाढतो. अशा स्थितीत पेपर टॉवेल हे ड्रायरच्या तुलनेत अधिक सुरक्षित ऑप्शन असल्याचे बोलले जाऊ शकते.