न्यूझीलंडच्या सर्वात तरुण खासदार असलेल्या हाना-रावहिती करियारिकी मापी-क्लार्क या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. न्यूझीलंडच्या मुळ नागरिकांचे प्रतिनिधित्व करणा-या हाना यांनी न्यूझीलंडची संसद आपल्या पहिल्याच भाषणानं गाजवली होती. आताही त्याच हाना पुन्हा चर्चेत आल्या आहेत, त्या पारंपारिक माओरी हाका नृत्यानं. संसदेत एका बिलाची प्रत फाडून हाना यांनी हे माओरी हाका नृत्य केले. त्यांच्या या कृतीला अन्य सदस्यांनीही साथ दिली. तसेच प्रेषक गृहात असलेल्या त्यांच्या समर्थकांनीही माओरी हाका नृत्य केले. भर संसदेत झालेल्या या प्रकारानं सभापतींनी सभागृह स्थगित केले. न्यूझीलंडच्या संसदेच्या सभागृहात ट्रीटी प्रिन्सिपल्स बिलावर प्रचंड गोंधळ झाला. या विधेयकावर मतदान करण्यासाठी खासदार जमले होते. मात्र त्याचा निषेध करत न्यूझीलंडच्या सर्वात तरुण खासदार हाना-रावहिती करियारिकी मापी-क्लार्क यांनी विधेयकाची प्रतच फाडली. 22 वर्षीय हाना या त्यांच्या जोरदार भाषणासाठी ओळखल्या जातात. विधेयकाची प्रत फाडून आपला या विधेयकाला विरोध का आहे, हेही त्यांनी स्पष्ट केलेच शिवाय त्या ज्या जनजाती समाजाचे नेतृत्व करतात त्यातील माओरी हाका नृत्य सादर करायला सुरुवात केली. हाना यांनी हे नृत्य सादर करायला सुरुवात केल्यावर त्यांच्या समर्थक सदस्यांनीही हाना यांना साथ दिली. (Hana Rawhiti Maipi Clarke)
त्यामुळे सभागृहात एकच गोंधळ निर्माण झाला. हाना यांनी ज्या विधेयकाचा जोरदार विरोध केला ते विधेयक स्वदेशी संधी विधेयक आहे. या स्वदेशी करार विधेयकाच्या निषेधार्थ गेली काही वर्ष हाना आणि त्यांचा पक्ष प्रचार करत आहे. माओरी पक्षाच्या खासदार हाना-राविती आणि त्यांच्या पक्षाच्या सर्वच सदस्यांचा या विधेयकाला विरोध आहे. ब्रिटिश आणि स्वदेशी माओरी यांच्यातील 184 वर्षांच्या जुन्या कराराच्या या नुतनीकरणाला न्यूझीलंडच्या माओरी समाजाचा विरोध आहे. माओरी समाज हा न्यूझीलंडचा मुळ रहिवासी मानला जातो. ब्रिटीशांनी जेव्हा न्यूझीलंडवर वर्चस्व मिळवलं त्यावेळेच्या अटीचा नव्यानं येणा-या विधेयकात समावेश होता. त्यामुळे हाना आणि त्यांच्या माओरी पक्षानं सुरुवातीपासूनच या विधेयकाचा विरोध केला आहे. 1840 मध्ये ब्रिटीश राजवट आणि 500 हून अधिक माओरी प्रमुख यांच्यात प्रथम स्वाक्षरी करण्यात आलेल्या वैतांगीच्या करारामध्ये दोन्ही पक्षांनी त्यावेळच्या न्यूझीलंडवर राज्य करण्याचे कसे मान्य केले होते. या कराराला 184 वर्ष झाली तरीही याच कराराच्या आधाराने न्यूझीलंडमध्ये कायदे आणि धोरणे बनवली जातात. या सर्वाला माओरी पक्षाचा विरोध आहे. हाना यांच्या आधी त्यांचे वडिलही याच विधेयकातील तरतुदींचे विरोधक राहिले आहेत. (International News)
न्यूझीलंडची लोकसंख्या 53 लाख आहे. त्यात 20 टक्के माओरी समाजाचे नागरिक आहेत. या सर्वांनी एकजुटीनं ब्रिटीशांनी आखून दिलेल्या कायद्याचा विरोध केले आहे. त्यामुळे यासंदर्भात विधेयक जेव्हा संसदेत आले तेव्हा या विधेयकावर मतदान करण्यासाठी संसद भरवण्यात आली होती. त्यातील माओरी समाजाच्या नागरिकांनी आपल्या पारंपारिक नृत्यातून ब्रिटीश धार्जिण्या विधेयकाला विरोध सुरु केला. हाना या विरोधामुळे पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. न्यूझीलंडच्या सर्वात तरुण खासदार असलेल्या हाना या 2023 च्या निवडणुकीत निवडून आल्या आहेत. त्यांनी संसदेतील आपल्या पहिल्या भाषणातही पारंपारिक हाका नृत्य सादर केले होते. हाना यांचे वडिलही राजकारणात आहेत. निवडणुकीमध्ये हाना आणि त्यांचे वडील पोटाका मैपीची हेही इच्छूक उमेदवार होते. मात्र हाना यांनाच तिकीट देण्यात आले. हाना यांची भाषणे तरुणांमध्ये प्रसिद्ध आहेत. (Hana Rawhiti Maipi Clarke)
======
हे देखील वाचा : ट्रम्पची सेना
====
माओरी समाजातील बदलासाठी त्या आग्रही आहेत. न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन आणि त्यांच्या पुराणमतवादी सरकारवर त्या तिखट शब्दात टिका करतात. हाना यांचे आजोबा तैतीमू माईपी हे सुद्धा राजकारणत होते. न्यूझीलंडमधील मूळ रहिवासी जमात असलेले माओरी हे मुळचे पॉलिनीशियातील आहेत. आठव्या शतकापासून ते न्यूझीलंडच्या उत्तर किनाऱ्यावर टोळीटोळीने येऊ लागले आणि चौदाव्या शतकापर्यंत न्यूझीलंडमध्ये स्थायिक झाले. ब्रिटिश वसाहत काळात त्यांनी माओरींबरोबर वाइटांगीचा तह केला. त्यानुसार ब्रिटिशांनी माओरींचे सांपत्तिक हक्क मान्य करून त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी स्वीकारली त्यातूनच 1841 मध्ये न्यूझीलंड ही स्वतंत्र वसाहत स्थापन झाली. त्यानंतर माओरींनी ब्रिटिश राजसत्तेस अधिकृत मान्यता दिली. ब्रिटीशांनी माओरींकडून अनेक जमिनी घेतल्या. त्यामुळे ब्रिटीश आणि माओरीत संघर्ष वाढला. यात ब्रिटीशांनी दडपशाहींनी माओरींना आपल्या अंकीत केले. तेव्हापासून माओरी समाज हा ब्रिटीशांचा विरोधक आहे. (International News)
सई बने