Home » Hamas organization : भारताच्या सीमेवर हमास !

Hamas organization : भारताच्या सीमेवर हमास !

by Team Gajawaja
0 comment
Hamas organization
Share

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वादामध्ये आता हमास ही संघटनाही पुढे आली आहे. आतापर्यंत पॅलेस्टाईनमध्ये असलेल्या हमास संघटनेनं पाकव्याप्त काश्मिरमध्ये आपलं जाळं विणायला सुरुवात केल्याची माहिती आहे. ही संघटना आता काश्मिरला भारतापासून वेगळं करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची बातमी पुढे आल्यानं खळबळ उडाली आहे. काश्मिरचा मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेत यावा यासाठी जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटना पाकव्याप्त काश्मीर म्हणजेच, पीओके मध्ये एक बैठक करत आहेत. (Hamas organization)

या बैठकीच्या आयोजनामध्ये हमासचा पुढाकार आहे, ही भारतासाठी डोकेदुखीची भाग आहे. हमास या संघटनेला इस्रायलनं दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. तसेच भारतानेही या संघटनेला दशतवादी म्हणून घोषित करावे, असा आग्रह केला आहे. मात्र भारतानं अद्याप हमासबाबत कुठलीही भूमिका व्यक्त केलेली नाही. पण याच हमासनं काश्मीरबाबत पाकिस्तानकडून बोलायला सुरुवात केली आहे. पीओकेमधील साबीर शहीद स्टेडियममध्ये ‘काश्मीर एकता आणि अल अक्सा पूर’ नावाची बैठक हमासच्या पुढाकरानं होत आहे. गुप्तचर विभागाच्या अहवालांनुसार, जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनांना सोबत घेत हमासचे प्रवक्ते खालिद कदुमी आणि अन्य प्रमुख या बैठकीत सहभागी होत आहेत. यामध्ये काश्मीरला भारतापासून वेगळं करण्यासंदर्भात रणनीति आखण्यात येणार आहे. (International News)

हमास म्हणजेच हरकत अल-मुकावामा अल-इस्लामिया या संघटनेनं काश्मीरमध्ये उत्सुकता दाखवायला सुरुवात केली आहे. पॅलेस्टिनी सुन्नी मुस्लिमांची एक लष्करी आणि राजकीय संघटना असलेल्या हमासला इस्रायल देशांनं पुरतं नामोहरण केलं आहे. यात संघटनेची एक फळी पूणेपणे नष्ट झाल्याचा समज होता. मात्र भारतातील काश्मीरवर हमासनं नुकतीच आपली भूमिका स्पष्ट केली आहे. काश्मीर हा पाकिस्तानचा भाग असल्याचे सांगत या हमासनं पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी संघटनांना एक करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. भारताच्या सीमेवर आलेले हे हमासचे संकट भविष्यात तापदायक ठरण्याची शक्यता आहे. माहितीनुसार जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबा या दोन अतिरेकी संघटनांनासोबत हमासची बैठक होत आहे. यात अधिक चिंतेची गोष्ट म्हणजे, जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख दहशतवादी मसूद अझहर आहे. (Hamas organization)

मसूद हा मुंबईमध्ये 2008 मध्ये झालेल्या हल्ल्याचा प्रमुख आरोपी आहे. याशिवाय भारतीय संसदेवर 2001 मध्ये झालेल्या हल्यातही याच मसूदच्या जैश ए मोहम्मद संघटनेचा हात असल्याची माहिती आहे. मसूद गेल्या काही वर्षपासून पाकिस्तानात राहून भारताविरोधी अतिरेकी कारवाया करत आहेत. 1 मे 2019 मध्ये याच मसूदाला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. हाच मसूदला सोबत घेत हमास भारताविरोधी मोठा कट रचत असल्याची माहिती आहे. यासाठी ‘काश्मीर एकता आणि अल अक्सा पूर’ नावाची बैठक होणार आहे. हमास आणि जैश ए मोहम्मद या दोन्ही संघटना कमकुवत झाल्या आहेत. मात्र या दोन्ही संघटना सोबत आल्यास त्यांची ताकत वाढू शकते, आणि ही भारतासाठी नवीन डोकेदुखी ठरणार आहे. मसूदनं या बैठकीसाठी रावलकोट परिसरात हमासच्या नेत्यांचे स्वागत करणारे फलक लावले आहेत. यावरुन मसूद हा हमासला पुढे करुन भारतात पुन्हा दहशतवादी हल्ला करण्याची तयारी करत असल्याचा संशय आहे. इस्रायल हमास वादात भारतानं पॅलेस्टाईनला पाठिंबा दिला आहे. (International News)

==============

हे देखील वाचा : Donald Trump : ऑर्डर टू डिपोर्ट

Narendra Modi : चर्चा फक्त JFK’s Forgotten Crisis पुस्तकाचीच

===============

यावरुन इस्रायलनं भारताकडे हमासला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करावे, अशी मागणी केली आहे. मात्र आता हमासनं भारताच्या काश्मीरबाबत विरोधी भूमिका घेतली, तर भारत, हमासची गंभीरपणे दखल घेऊ शकतो. पाकव्याप्त काश्मीरमध्ये मसूद आणि हमासच्या उपस्थितीत होणा-या बैठकीचा हेतू हा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर जम्मू आणि काश्मीरच्या मुद्द्याला अधिक महत्त्व देणे आहे. यातून काश्मीर आणि पॅलेस्टाईनची परिस्थिती सारखीच असल्याचे पाकिस्तान दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. या परिषदेबाबत भारतीय गुप्तचर विभाग सतर्क आहे. यात पाकव्याप्त काश्मीरमधील जनतेची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे. हमासच्या उपस्थितीला येथील जनतेनं आक्षेप घ्यायला सुरुवात केली आहे. या भागात पाकिस्तानी सरकारविरोधात मोठा राग आहे. त्यामुळे गेले अनेक दिवस येथे आंदोलन सुरु आहे. त्यामुळे ही बैठक होतांना या जनतेची काय भूमिका असेल याकडे लक्ष लागले आहे. (International News)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.