Home » हमासची असलीयत

हमासची असलीयत

by Team Gajawaja
0 comment
Yahya Sinwar And Samar Abu Jamar
Share

हमास या संघटनेचे वास्तव काय आहे, हे दाखवणारा एक व्हिडिओ गेल्या दोन दिवसात सर्वाधिक व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ आहे, समर अबू मोहम्मद जमार या महिलेचा. ही महिला कोण, तर ही आहे, हमासचा नेता याह्या सिनवार याची पत्नी. याच याह्या सिनवारला इस्रायली सैन्यानं ठार केलं आहे. त्याच्या पत्नीचा व्हिडिओ व्हायरल होण्यामागचे कारणही खास आहे. कारण इस्रायली सैन्याच्या भीतीनं याह्या सिनवार गेले अनेक दिवस भुयारात वास्तव्यास होता. त्याची पत्नी, समर आणि मुलंही भुयारात रहात होती. या सर्व दरम्यान या कुटुंबाकडे असलेल्या वस्तू आणि त्यांची किंमत बघून त्यांच्या पाठिराख्यांना प्रचंड धक्का बसला आहे. कारण एकीकडे गाझामध्ये लोकांना खायला अन्न नाही, पुरेसा निवारा नाही. (Yahya Sinwar And Samar Abu Jamar)

थंडीपासून बचाव कऱण्यासाठी कपडे नाहीत. अशावेळी याह्या सिनवर आणि त्याचे कुटुंबिय ब्रॅन्डेड वस्तू वापरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. तो आणि त्याचे कुटुंबीय ज्या भुयारांचा आसरा घेत होते, त्या भुयारात उच्च दर्जाचे अत्तर, उत्तम सुकामेवा आणि फॅशऩचे उत्तोमोत्तम कपडे आढळून आले आहेत. शिवाय याह्या सिनवरची पत्नी समर अबू मोगम्मज जमार जी पर्स वापरत होती, तिची किंमतच तब्बल 27 लाखांच्या वर असल्याचे स्पष्ट झाले आहे. एकीकडे आपल्या पाठिराख्यांसाठी सर्वस्व अर्पण करणार असल्याची भाषणे करणारा याह्या कशा पद्धतीनं जीवन जगत होता, हे यामुळे स्पष्ट झाले आहे. 7 ऑक्टोबर 2023 रोजी इस्रायलवरील सर्वात मोठ्या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार आणि हमासचा नेता याह्या सिनवारला इस्रायली सैन्याने गेल्या आठवड्यात ठार केले. सिनवारच्या हत्येनंतर इस्रायलने हमास नेत्याचा काही तास आधी काढलेला व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला आहे. यात सिनवार त्याच्या कुटुंबासह भुयारामध्ये जातांना दिसत आहे. यातच याह्या सिनवारची पत्नी समर अबू मोहम्मद जमारही दिसत आहे. (International News)

या समरच्या हाती 27 लाख रुपयांची हँडबॅग दिसून आल्यानं आता त्यांच्या पाठिराख्यांनीच टिका करायला सुरुवात केली आहे. दक्षिणी गाझा येथे इस्रायली कारवाईत याह्या सिनवार ठार झाला. त्या दक्षिणी गाझामध्ये सध्या जीवनावश्यक वस्तूंचा प्रचंड तुटवडा आहे. हमासनं इस्रायलवर केलेल्या हल्ल्यानं संपूर्ण गाझाला त्याची शिक्षा भोगावी लागली. मात्र या हल्ल्याचा मास्टरमाईंड असलेल्या याह्याच्या जीवनशैलीवर त्यामुळे काहीही परिणाम झाला नव्हता. तो त्याचे आयुष्य कुटुंबासह अलिशान पद्धतीनं जगत होता, हे आता स्पष्ट झालं आहे. याह्या सिनवर मेल्यावर इस्रायली सैन्यानं त्याच्या घराची तपासणी केल्यावर याह्याची जीवनशैली किती अलिशान होती, हे आढळून आले आहे. ब्रॅंडेड वस्तू हे कुटुंब वापरत होते. त्यांची किंमत लाखो, करोडो रुपये आहे. मात्र त्याचवेळी गाझामधील सर्वसामान्य नागरिकांना थंडीपासून बचाव करण्यासाठी पुरेसे कपडे मिळत नव्हते. (Yahya Sinwar And Samar Abu Jamar)

याह्याची पत्नी समर ही पळून जाण्यात यशस्वी झाली आहे. समोर आलेल्या व्हिडिओतून समरच्या हातातील बॅग ही 27 लाखांची होती. समरचा आत्तापर्यंतचा कुठलाही फोटो सोशल मिडियावर नव्हता. याह्या सिनवारने 2011 मध्ये इस्रायली तुरुंगातून सुटल्यानंतर एक महिन्यानंतर समर अबू जमारशी लग्न केले. समरचे कुटुंब हे हमास बरोबर निष्ठावान असल्याची माहिती आहे. याह्या आणि समर यांच्यात 18 वर्षांचे अंतर आहे. याह्या सोबत लग्न केल्यापासून समर अज्ञातवासात आहे. गाझा येथे जन्मलेली समर, 44 वर्षांची आहे. ती एका श्रीमंत पॅलेस्टिनी कुटुंबातून आली आहे. तिने गाझा इस्लामिक विद्यापीठातून धार्मिक अभ्यासात पदव्युत्तर पदवी मिळवली असल्याची माहिती आहे. 2011 मध्ये लग्न होईपर्यंत ती त्याच विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम करत होती. याह्याबरोबर लग्न झाले तेव्हा समरचे वय 31 वर्षे होते. पॅलेस्टिनी समाजात मुलींचे 20 व्या वर्षी लग्न होते. (International News)

======

हे देखील वाचा :  अणुहल्ल्याच्या धमकीसह किम जोंगची युद्धात एन्ट्री !

======

मात्र समर तोपर्यंत स्वतंत्र स्त्री म्हणून जगत होती. समर कठोर धार्मिक नियमांचे पालन करते. ती कायम निकाबमध्ये असते. तिचे कुटुंब हमासचे कट्टर समर्थक आहे. तिच्या कुटुंबातील सर्व सदस्य हमासमध्ये सामील झाले आहेत. त्यांच्यापैकी काही नुखबा युनिटमध्ये सामील आहेत. याच नुखबा युनिटनं इस्रायलवर गेल्यावर्षी हल्ला केला होता. लग्न झाल्यापासून समर जनतेच्या नजरेतून गायब झाली. ती ज्या विद्यापीठात शिकवत होती, तिथून तिचा सर्व रेकॉर्ड काढण्यात आला. तसेच तिची छायाचित्रेही गायब झाली. त्यानंतर समर पहिल्यांदा दिसली ती याह्या सिनवर बरोबर भुयारी मार्गातून पळून जातांना. तेव्हा तिच्यासोबत 27 लाखांची हर्मीस बर्किन हँडबॅग आहे. यावरुन हमासच्याच अनेक पाठिरांख्यांनी हमासच्या प्रमुख नेत्यांच्या जीवनशैलीवर टिका केली आहे. (Yahya Sinwar And Samar Abu Jamar)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.