Home » Israel : हमासनं इस्रायली ओलिसांची सुटका केली !

Israel : हमासनं इस्रायली ओलिसांची सुटका केली !

by Team Gajawaja
0 comment
Israel
Share

७ ऑक्टोबर २०२३ हा दिवस इस्रायलमध्ये कधीही विसरला जाणार नाही. या दिवशी सकाळी, हमासच्या सैनिकांनी इस्रायलच्या नोव्हा संगीत महोत्सवावर भयानक हल्ला केला. हल्ला झाल्यावर या संगीत महोत्सवामधील तरुण वाट दिसेल तिथे धावत होते. त्या तरुणांवर हमासच्या सैनिकांनी गोळ्या चालवल्या. जे जिवंत हातात मिळाले, त्यांचे अपहरण करण्यात आले. यात तरुणींची संख्या अधिक होती, यातील अनेक तरुणींना नग्न करुन त्यांच्या देहाची विटंबना करण्यात आली. दोन वर्षापूर्वी हमासनं केलेला हा हल्ला मानवतेला काळीमा लावणार होता. यात केलेल्या हत्याकांडाव्यतिरिक्त, हमासने २५१ लोकांचे अपहरण केले. त्यातील प्रत्येकाला नरकयातना सहन कराव्या लागल्या. इस्रायल गेले दोन वर्षापासून या ओलीसांची सुटका करण्यासाठी प्रयत्नशील आहे. गाझापट्टी त्यासाठी उद्धवस्त करण्यात आली. मात्र हमासनं या ओलीसांची सुटका केली नाही. (Israel)

आता झालेल्या युद्धबंदीनंतर हमासच्या ताब्यातील ओलीसांची सुटका होत आहे. अर्थात २५१ पैकी फक्त २० ओलीस जीवंत आहेत. त्यातीलच ७ इस्रायली ओलिसांची सुटका झाली आणि त्यांच्या आप्तांसह संपूर्ण इस्रायलमध्ये आनंदोत्सव साजरा झाला. मात्र या ओलिसांनी दोन वर्षात ज्या यातना सहन केल्या आहेत, त्यांच्या कहाण्या ऐकून समस्त इस्रायलचे नागरिक सुन्न झाले आहेत. आपल्या घरापासून, जमिनीपासून दूर शत्रूंच्या सहवासात, खोल भूयारात तब्बल २४ महिने राहिलेल्या ७ इस्रायली नागरिकांना अखेर त्यांच्या स्वतःच्या भूमीमध्ये नेण्यात आले आहे. गाझामध्ये युद्धबंदी झाल्यानंतर आता हमासनं इस्रायली ओलिसांची सुटका सुरु केली आहे. गाझामधून होणा-या ओलिसांच्या सुटकेचा आनंद साजरा करण्यासाठी तेल अवीवच्या होस्टेज स्क्वेअरवर शेकडो इस्रायली जमले होते. ओलिसांचे कुटुंब गाझा सीमेजवळील रीम लष्करी तळावर आले होते, तिथे हमासचे सैनिक एका बंद गाडीमधून आले, बंदुका घेतलेल्या या सैनिकांनी इशारा केल्यावर गाडीतून सात ओलिस बाहेर आले. (International News)

या सात ओलिसांना बघताच, त्यांच्या स्वागतासाठी जमलेल्या हजारो नागरिकांच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागल्या होत्या. आता सात ओलिसांची सुटका झाली असून अन्य १३ ओलिस हमासच्या ताब्यात आहेत, त्यामुळे आता त्यांच्याही नातेवाईकांना आपल्या प्रियजनांना भेटण्याची ओढ लागली आहे. जे पहिले ओलिस हमासनं सोडले, त्यात एटन मोर, गली आणि झिव्ह बर्मन, मातान आंग्रेस्ट, ओमरी मिरन, गाय गिल्बोआ-दलाल आणि अलोन ओहेल यांचा समावेश आहे. उत्तर गाझामधील आंतरराष्ट्रीय रेड क्रॉसकडे प्रथम या ओलिसांचा ताबा दिला, आता १३ बंधकांचा समावेश असलेला दुसरा गट कधी सोडणार याची प्रतीक्षा आहे. या बदल्यात इस्रायल १,९६६ पॅलेस्टिनी कैद्यांना सोडणार आहे. (Israel)

दरम्यान या ऐतिहासिक क्षणासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उपस्थित होते. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि त्यांच्या पत्नी सारा, अध्यक्ष आयझॅक हर्झोग आणि त्यांच्या पत्नी मिचल यांनी बेन-गुरियन आंतरराष्ट्रीय विमानतळावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे स्वागत केले. इस्रायल भेटीपूर्वी तेल अवीव समुद्रकिनाऱ्यावर अमेरिकन दूतावासाच्या शाखेसमोर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी ‘धन्यवाद’ संदेश लिहून त्यांचे या युद्धबंदीसाठी आभारही व्यक्त करण्यात आले. हमासनं ज्या ओलिसांना सोडले आहे, त्यांना तात्काळ वैद्यकीय मदत देण्यात आली आहे. त्यानंतर त्यांची त्यांच्या कुटुंबियांसोबत भेट घडवून देण्यात येणार आहे. या सर्व ओलिसांवर हमासनं अनेक अत्याचार केले आहेत. (International News)

=======

हे देखील वाचा :

Galapagos Affair : दोघे बेटावर गेले पण ती आली आणि भलतंच घडलं…

=======

शिवाय गेली २४ महिने हे ओलिस एका भूयारात रहात होते, त्यांना सूर्यदर्शनही होत नव्हते. या सर्वात त्यांचे मानसिक स्वास्थ कसे आहे, याचा तपास करुन त्यांना योग्य प्रकारे मदत करण्यात येणार आहे. हमासनं ज्या २५१ इस्रायली नागरिकांचे अपहरण केले होते, त्यापैकी २० वगळता अन्य मारण्यात आले, किंवा खजून मृत पावले आहेत. अशा सर्वांच्या अस्थीही परत आणण्यात येणार आहेत. या सर्व मृत ओलिसांची नावेही जाहीर करण्यात आली आहेत. या सर्वात गाझा शहरात आता नव्यानं संघर्ष सुरु झाला आहे. गाझा शहरातील हमास आणि दागुमश जमातीमध्ये झालेल्या संघर्षात २७ जणांचा मृत्यू झाला आहे. इस्रायली लष्करी कारवाई संपल्यानंतर तिथे संघर्ष भडकला आहे. यामुळे ओलिसांची सुटका करण्यासाठी काही तास उशीर झाला, त्यात ओलिसांच्या नातेवाईकांमध्ये चिंता व्यक्त होत होती. आता उर्वरित ओलिसांची सुटका कधी होणार, याकडे लक्ष लागले आहे. (Israel)

सई बने

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.