Hall Booking Tips : लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अनोखा क्षण असतो. हा क्षण नेहमीच आठवणीत रहावा यासाठी वेगवेगळ्या आयडियाज वापरल्या जातात. अशातच काहींना वेडिंग डेस्टिनेशन ते लॉनमध्ये लग्न करण्याची इच्छा असते. पण वेडिंगचे ठिकाण निवडताना काय काळजी घेतली पाहिजे याबद्दल फार कमी जणांना माहिती असते.
लग्न सोहळ्याची प्रत्येकालाच उत्सुकरता अशते. यावेळी सर्वप्रथम लग्न कोणत्या ठिकाणी करायचे हा प्रश्न सोडवला जातो. यासाठी वेगवेगळे हॉल, हॉटेल्स पाहिले जातात. पण आपल्यासाठी बेस्ट हॉल कोणता आहे हे निवडणे काहींना कठीण होत. यासाठी आपल्या बजेटनुसार हॉलचे बुकिंग करावे. यामुळे लग्नसोहळ्याचा आनंद मनभरून लुटता येईल. जाणून घेऊया लग्नासाठी हॉल निवडताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत याबद्दल अधिक….
योग्य ठिकाण
असे हॉटेल किंवा हॉलची निवड करा, जेथे तुमच्या नातेवाईकांना लग्नसोहळ्यासाठी पोहोचणे सोपे असेल. याशिवाय घरापासून ते हॉलपर्यंत जाण्यासाठी प्रवासातच अधिक वेळ जाणार नाही याचीही काळजी घ्यावी.
खाण्यापिण्याची सोय
हॉटेल किंवा हॉल निवडताना अशा ठिकाणाची निवड करा जेथे तुमच्या पाहुण्यांसाठी उत्तम सुविधा असेलच. पण तेथील फूडही चविष्ट असेल. यावेळी एक गोष्ट लक्षात ठेवा की, तेथील फूडची गुणवत्ता कशी आहे हे देखील पाहा.
ऋतूची काळजी
हॉल निवडताना तुम्ही ऋतूचीही काळजी घ्या. उन्हाळा असेल तर पंखा, एसीची सोय आहे का हे पाहा. याशिवाय हिवाळ्यातही खुल्या ठिकाणी लग्नाचा प्लॅन करत असाल्यास तेथेही तुमच्या आरोग्याची जरूर काळजी घ्या.
बजेट
प्रत्येकाचे बजेट वेगवेगळे असते. पण हॉटेल बुकिंग करताना हॉटेलच्या खोल्या, डेकोरेशन आणि प्रत्येक प्रकारच्या शुल्काबद्दल हॉटेल मॅनेजरचा सल्ला घ्या. (Hall Booking Tips)
राहण्याची सुविधा
तुमचे पाहुणे एखाद्या ठिकाणाहून राहण्यासाठी येणार असतील तर हॉटेलमध्ये राहण्याची त्यांची सुविधा करणे अत्यंत गरेजेचे असते. यामुळे पाहुण्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून तुम्ही आधीच पाहुण्यांची सुविधा करा.
हॉलचा रिव्हू पाहा
आजकाल प्रत्येक गोष्टीचा ऑनलाइन रिव्हू अगदी सहज उपलब्ध असतो. यामुळे एखादा हॉल लग्नासाठी निवडताना त्याचा रिव्हू वाचूनच बुकिंग करा. याशिवाय प्रत्यक्षात त्या हॉलला भेट देऊनही काही गोष्टींची माहिती घ्या.