आपण काही वेळेस पाहतो की, कधी कधी लहान स्तरावरुन सुरु करण्यात आलेले काम पुढे जाऊन एका व्यवसायाचे रुप घेते. अशातच आपण सर्वांनी हल्दीरामचे नाव ऐकलेच आहे. याच्या यशाची कथा सुद्धा तितकीच रंजक ही आहे. या कंपनीने अगदी लहान स्तरावर आपले काम सुरु केले होते. पण आज प्रत्येकाच्या तोंडातून हल्दीरामच्या ब्रँन्डचे नाव जरुर निघते. कंपनीने आजच्या काळात आपल्या ब्रँन्डची एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. पण त्याची सुरुवात बिकानेरच्या लहान दुकानापासून झाली होती.(Haldiram Success Story)
कशी सुरु झाली स्नॅक बनवणारी कंपनी?
हल्दीराम ब्रँन्डचा पाया आज पासून जवळजवळ ७९ वर्ष आधी म्हणजेच १९३७ मध्ये बिकानेर मध्ये रचला गेला. त्यानंतर त्यांनी १९७० मध्ये पहिले स्टोर नागपुरात सुरु केले आणि नंतर १९८२ रोजी दिल्लीत. गंगाविषण अग्रवाल या व्यक्तीने बिकानेर मध्ये लहान अशा नाश्ताच्या दुकानापासून याची सुरुवात केली होती. त्यांच्या दुकानात विक्री केले जाणारे स्नॅक्स ऐवढे स्वादिष्ट होते की, हळूहळू दुकान लोकांमध्ये भुजियावालेच्या नावाने लोकप्रिय होऊ लागले.
कसे पडले हल्दीराम नाव?
काही लोक गंगाविषण अग्रवाल यांना हल्दीराम अशा नावाने संबोधित करायचे. त्यानंतर लोकांनी गंगाविषण अग्रवाल यांनी या दुकानाला हल्दीराम अशा नावाने बोलू लागले. काही काळानंतर संपूर्ण बिकानेर मध्ये हल्दीराम भुजियासह काही स्नॅक्स ही अधिक प्रसिद्ध झाले.
त्यानंतर हल्दीराम ब्रँन्ड संपूर्ण देशभरात प्रसिद्ध होऊ लागला होता. हा व्यवसाय वाढवण्यासाठी केवळ बिकानेरच नव्हे तर देशातील काही राज्यांमध्ये त्याची प्रसिद्ध अधिक वाढली गेली. गंगाविषण यांच्या काही पिढ्यांनी हा व्यवसाय सांभाळला आणि देशभरात आपली ओळख निर्माण केली.(Haldiram Success Story)
हे देखील वाचा- हैदराबाद मधील आठव्या निजामाकडे ऐवढी आहे संपत्ती, मृत्यूनंतर आता काय होणार?
करोडो रुपयांचा ब्रँन्ड आहे हल्दीराम
हल्दीरामने पेप्सिकोला मागे टाकत देशात सर्वाधिक मोठ्या स्नॅक कंपनीचा दर्जा मिळवला आहे. आजच्या काळात प्रत्येक घरात हल्दीराम खुप प्रसिद्ध झाला आहे. लहान स्तरावर सुरु झालेली कंपनीच्या रेवेन्यू रिपोर्ट पाहिल्यास वर्ष २०१६ मध्ये २९८ कोटी रुपये झाला होता. तसेच सध्या हल्दीरामची कमाई हिंदूस्तान युनिलिवरच्या फूड डिविजन आणि नेस्ले मॅगीच्या दुप्पटीसह अमेरिकन फास्ट फूड चैन डॉमिनोज आणि मॅकडॉनल्डच्या एकूण इंडियन बिझनेस रेवेन्यू समान आहे.