जगभरात असे काही देश आहेत जेथे मुस्लिमांसाठी कठोर कायदे लागू करण्यात आलेले आहेत. मात्र वेळेनुसार बदलत्या जीवनशैलीमुळे आणि नव्या तंत्रज्ञानामुळे मुस्लिमांचे नियम आणि परंपरा यामध्ये बदल होऊ लागला आहे. आता आधुनिक सोई-सुविधांसह कशा प्रकारे मुस्लिमांचे कायदे जोडले जातील यावर विचार केला जात आहे. अशातच एक नवा शब्द चर्चेत आला आहे तो म्हणजे हलाल हॉलिडेज. (halal holidays)
जगभरातील काही देश, ऐवढेच नव्हे तर मध्य पूर्वेत सुद्धा मुस्लिम सुद्धा आता आधुनिक काळासोबत जगत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे हलाल हॉलिडेच असून तो एका खास प्रकारच्या सुट्ट्यांशी संबंधित आहे. त्यामध्ये सुट्ट्यांदरम्यान घेतल्या जाणाऱ्या सुविधांचा लाभ घेताना मुस्लिमांचे नियम आणि परंपरा याची विशेष काळजी घेतली जाते. त्यासाठी काही विशेष व्यवस्था सुद्धा केली जाते.
हलाल म्हणजे काय?
हलाल हा एक अरबी शब्द आहे, त्याचा अर्थ असा होतो की, स्विकार्य. म्हणजेच इस्लाम धर्म मानणाऱ्यांसाठी काय स्विकार्य आहे. ते आपल्या धार्मिक मान्यता, नियम आणि परंपरांच्या चौकटीत राहून काय काय करू शकतात. या सर्व गोष्टी ते करू शकतात तेच हलाल आहे. आजकाल या शब्दाचा वापर सुट्ट्यांशी जोडला जात आहे. म्हणजेच आपल्या धार्मिक परंपारांच्या चौकटीत राहून सुट्ट्यांचा आनंद घेणे. (halal holidays)
हलाल हॉलिडेज म्हणजे अशा ठिकाणी सुट्ट्या घालवणे जेथे मुस्लिम समजातील लोक आपल्या धार्मिक परंपरा, रीती-रिवाज आणि प्रथांना न डावलता सुट्ट्यांचा आनंद घेऊ शकतात. अशातच मुस्लिम महिलांसाठी सिंगल सेक्स बीच सर्वाधिक प्रमुख रुपात चर्चेत आहे. येथे त्या व्हिटॅमिन डी घेऊ शकतात आणि बीच सुविधांचा आनंद सुद्धा. हॉटेलमध्ये प्रायव्हेसीची काळजी घेत त्या तेथे राहू शकतात.
या व्यतिरिक्त हॉटेल सुद्धा मुस्लिमांच्या गरजेची खास काळजी घेतात. खाण्यापिण्यासाठीचे ठिकाण, नमाजासाठी चटई ऐवढेच नव्हे तर नॉन अल्कोहोल कॉकटेल सारखी सुद्धा त्यांना दिली जाते. प्रवेशासाठी व्यक्तीगत गेट, थेट खोली पर्यंत जाणारी लिफ्ट जेणेकरुन प्रायव्हेसीची काळजी घेतली जाईल. हॉटेलमध्ये नाच-गाण्यासाठी एक वेगळी रुम. त्यामध्ये महिला आणि पुरुष पाहुण्यांना वेगवेगळे ठेवले जाऊ शकता. अशा काही सुविधा त्यांच्यासाठी उपलब्ध करून दिल्या जातात.
हेही वाचा- जगातील एकमेव सोन्याचे हॉटेल
२०२३ च्या ग्लोबल मुस्लिम ट्रॅव्हल इंडेक्समध्ये बहुतांश मुस्लिम देशांचा दबदबा आहे आणि सर्वात वरत्या स्तरावर इंडोनेशिया आणि मुस्लिम देशांचे स्थान आहे. यामध्ये नॉन इस्लामिक देश ११ व्या स्तरावर सिंगापूर तर २० व्या स्थानावर ब्रिटेन आहे. हलाल हॉलिडेज पॅकेज देणारी हॉटेल्स आपल्या कर्मचाऱ्यांना मध्यपूर्व आणि अन्य मुस्लिम संस्कृतींचे खास ट्रेनिंग देतात.