Home » Haircare : हेअर केअरमधील या चुका टाळा; डोक्यावर जमत असलेल्या डँड्रफची मोठी कारणं उघड

Haircare : हेअर केअरमधील या चुका टाळा; डोक्यावर जमत असलेल्या डँड्रफची मोठी कारणं उघड

by Team Gajawaja
0 comment
Haircare
Share

Haircare : डँड्रफ वाढण्यामागे हेअर केअरमधील चुका कारणीभूत हिवाळा सुरू होताच डँड्रफची समस्या मोठ्या प्रमाणावर वाढते. परंतु फक्त ऋतू बदलामुळेच तर कोंडा होत नाही ना? अनेकदा आपल्याला न कळत केलेल्या हेअर केअरमधील चुका डोक्यावर कोंड्याची जाड थर तयार होण्यास कारणीभूत ठरतात. तज्ज्ञ सांगतात की चुकीची कंगवा करण्याची पद्धत, जास्त गरम पाण्याने केस धुणे आणि चुकीचे प्रॉडक्ट्स वापरणे यामुळे स्कॅल्पचा नैसर्गिक ऑइल बॅलन्स बिघडतो आणि डँड्रफची समस्या तीव्र होते. (Haircare )

*जास्त गरम पाण्याने केस धुतल्यास स्कॅल्प कोरडा होतो अनेकांना वाटते की केस स्वच्छ ठेवण्यासाठी गरम पाणी सर्वोत्तम आहे. पण हे मोठं गैरसमज आहे. गरम पाण्याने केस धुतल्याने स्कॅल्पमधील नैसर्गिक तेल झपाट्याने कमी होते. परिणामी स्कॅल्प कोरडा पडतो, चुरचुरीत होतो आणि त्यावर कोंडा दाट थरासारखा जमा होऊ लागतो. त्यामुळे तज्ज्ञ सौम्य कोमट किंवा नॉर्मल पाण्यानेच केस धुण्याचा सल्ला देतात. विशेषत: ज्यांचा स्कॅल्प ड्राय आहे त्यांनी गरम पाण्यापासून दूर राहणे अत्यंत गरजेचे आहे.

Haircare

Haircare

जास्त शॅम्पू वापरणे आणि चुकीची प्रॉडक्ट्स सुद्धा घातक केस स्वच्छ राहावेत म्हणून काही जण वारंवार किंवा जास्त प्रमाणात शॅम्पू वापरतात. पण त्यामुळे स्कॅल्प ओव्हर-क्लीन होतो आणि त्यातील आवश्यक मॉइश्चर कमी होते. यामुळे स्कॅल्प आणखी कोरडा होऊन कोंडा वाढतो. शिवाय जास्त केमिकल असलेले हेअर प्रॉडक्ट्स, जेल, स्प्रे किंवा चुकीचा शॅम्पू वापरल्यानेही कोंड्याची समस्या भडकू शकते. म्हणून नेहमी आपल्या केसांच्या प्रकारानुसार (dry, oily, sensitive scalp) शॅम्पू निवडणे महत्त्वाचे आहे. (Haircare )

ओल्या केसांमध्ये कंगवा करणे – डँड्रफचा आणखी एक मोठा धोका ओले केस अतिशय नाजूक असतात. अशा वेळी कंगवा केल्याने स्कॅल्पवर ताण पडतो. हा ताण कधीकधी सूज, खाज आणि त्वचेचे सोलणे वाढवू शकतो. हेच कोंड्याचे कारण बनते. तसेच बेडशीट, टॉवेल किंवा उशी स्वच्छ न वापरल्यास स्कॅल्पवर बॅक्टेरिया वाढू शकतात आणि डँड्रफ अधिक तीव्र होऊ शकतो. त्यामुळे ओले केस नैसर्गिकरित्या वाळू द्या आणि त्यानंतरच कंगवा करा. (Haircare )

====================

हे देखिल वाचा :

Winter Skin Care : हिवाळ्यात त्वचा कोरडी होऊ नये म्हणून वापरा हे 5 घरगुती फेसपॅक, त्वचा राहील मऊ आणि चमकदार!

Hair Fall Control : डॅन्ड्रफ संपेल आणि केस गळतीही कमी! तेलात ‘या’ गोष्टी मिसळून लावा आणि अनुभव घ्या जबरदस्त फरकाचा

Amla Recipe : आवळा नवमी स्पेशल: हेल्दी राहण्यासाठी बनवा आवळ्याच्या ‘या’ खास रेसिपी

========================

डँड्रफ कमी करण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला – योग्य रूटीन पाळा डँड्रफपासून सुटका हवी असेल तर हेअर केअरचा योग्य रूटीन पाळणे अत्यंत गरजेचे आहे. आठवड्यातून दोन ते तीन वेळा सौम्य शॅम्पू वापरा, स्कॅल्पला तेल लावून मसाज करा आणि गरम पाण्याचा वापर टाळा. नियमितपणे उशीचे कव्हर बदलणे, स्वच्छ टॉवेल वापरणे आणि केस खूप काळ बांधून न ठेवणे देखील उपयुक्त ठरते. डँड्रफ अत्यंत जास्त प्रमाणात वाढल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊन मेडिकेटेड शॅम्पू वापरणे आवश्यक आहे.

Latest Marathi News | News in Marathi |  Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.