Hair Transplant Tips : सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात तणाव, चुकीची खाण्यापिण्याची सवय आणि प्रदुषण अशा गोष्टींचा आपल्या आरोग्यासह केसांवरही परिणाम होतो. कमी वयामध्ये केस गळती, टक्कल पणे आणि हेअरलाइन मागे जाणे या समस्या सध्या पहायला मिळत आहेत. अशातच बहुतांशजण हेअर ट्रांसप्लांटचा पर्याय निवडला जातो. यामुळे डोक्यावरील टक्कल झाकले जाते. पण अलीकडल्या काळात हेअर ट्रांसप्लांट करणे दोन जणांचा मृत्यू झाल्याचे प्रकरण समोर आले होते. अशातच हेअर ट्रांसप्लांट करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात.
प्रत्येकासाठी फायदेशीर नाही
हेअर ट्रांसप्लांट करणे प्रत्येकाला फायद्याचे ठरेल असे नाही. जर तुमच्या डोक्याच्या मागे म्हणजेच डोनर एरियामध्ये पुरेशा प्रमाणात हेल्दी केस नसल्यास ट्रान्सप्लांट यशस्वीरित्या होऊ शकत नाही. याशिवाय टक्कल पडणे ही हार्मोनल किंवा वैद्यकिय कारणमुळेही समस्या उद्भवू शकते.
लगेच फरक दिसत नाही
हेअर ट्रांन्सप्लांट केल्यानंतर केस वाढीबद्दल लगेच फरक दिसत नाही. यासाठी सहा ते एक वर्षांचा कालावधी लागू शकतो. काहीजणांमध्ये हेअर ट्रांसप्लांट केल्यानंतर केसगळतीची समस्या उद्भवू शकते.

hair transplant tips
सर्जन आणि योग्य क्लिनिक
कमी खर्चात हेअर ट्रांन्सप्लांट करण्याची चूक अजिबात करू नका. स्वस्त आणि अप्रोफेशनल क्लिनिक्समध्ये करण्यात आलेल्या हेअर ट्रांन्सप्लांटमुळे इन्फेक्शन, स्कार्स अशा समस्या उद्भवू शकतात. यामुळे नेहमीच अधिकृत आणि रजिस्टर्ड सर्जन कडूनच हेअर ट्रांन्सप्लांट करुन घ्यावे.
ट्रांन्सप्लांटनंतर केसांची काळजी
हेअर ट्रांन्सप्लांट केल्यानंतर केसांची काळजी घ्यावी लागते. धूप, धूळ, घाम या काही गोष्टींपासून दूर रहावे. याशिवाय डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, औषधे, शॅम्पू आणि स्कॅल्प ट्रिटमेंटही करावी. हेअर ट्रांन्सप्लांट केल्यानंतर बेजबाबदारपणा केल्यास त्याचे वाईट परिणाम दिसू शकतात.(Hair Transplant Tips)
=======================================================================================================
हेही वाचा :
नवीन कपडे धुताच जुने वाटू लागतात, तर करतायत या चूका
ओव्हरथिंकच्या सवयीवर नियंत्रण ठेवण्यासाठी 5 उपाय
=======================================================================================================
या स्थितीत करू नका हेअर ट्रांन्सप्लांट
हेअर ट्रांन्सप्लांट कॅन्सरवर उपचार, सर्जरी किंवा एखादी दुखापत झाल्यास करू नये. याशिवाय अत्याधिक प्रमाणात केस गळती होत असल्यासही हेअर ट्रांन्सप्लांट करू नये.