Home » Hair Transplant करणे खरंच सुरक्षित आहे का?

Hair Transplant करणे खरंच सुरक्षित आहे का?

कंगव्याने केस विंचरताना २-४ केस तुटणे सामान्य आहे. मात्र केसांचा गुच्छा निघत असेल तर ही खरंच एक चिंतेची बाब आहे.

by Team Gajawaja
0 comment
Hair Transplant
Share

कंगव्याने केस विंचरताना २-४ केस तुटणे सामान्य आहे. मात्र केसांचा गुच्छा निघत असेल तर ही खरंच एक चिंतेची बाब आहे. हेअर एक्सपर्ट्च्या मते दररोज जर १०० केसांच्या आसपास केस गळत असतील तर ही एक सामान्य गोष्ट आहे. त्यापेक्षा अधिक केस गळणे चिंताजनक आहे. मधुमेह, हृदयरोग रुग्ण आणि ब्लड प्रेशर प्रमाणे १० पैकी ४ लोक केस गळतीच्या समस्येचा सामना करत आहे. यासाठी इंन्फेक्शन किंवा डँन्ड्रफ जबाबदार आहे. मात्र या व्यतिरिक्त शरिरात व्हिटॅमिन बी आणि डी ची कमतरता असेल तरीही केस गळतीची समस्या उद्भवते. (Hair Transplant)

डर्मेटोलॉजिस्ट असे म्हणतातकी, केस पुन्हा यावीत म्हणून आता लोक हेअर ट्रांसप्लांटचा ऑप्शन निवडत आहेत. मात्र या व्यतिरिक्त प्लाज्मा थेरेपीच्या माध्यमातून ही केस गळतीच्या समस्येवर उपचार केले जातात.

हेअर एक्सपर्ट्स असे म्हणतात की, केस गळणे हे काही फॅक्टर्सवर अवलंबून असते. त्यामध्ये जेनेटिक समस्या, मधुमेह, पोट किंवा यकृतात होणारी समस्या याचा समावेश आहे. अशातच हेअर ट्रांसप्लांट करणे खरंच सुरक्षित आहे का याच बद्दल आपण अधिक जाणून घेऊयात.

हेअर ट्रांसप्लांट ट्रिटमेंट नक्की काय आहे?
खरंतर हेअर ट्रांसप्लांट एक सर्जिकल मेथड आहे. ज्यामध्ये केसाच्या मागील बाजूस किंवा एका बाजूस खुप केस असणाऱ्या भागापासून ते त्या भागापर्यंत हेअर प्लांट केले जातात जेथे केस नाहीत. या संपूर्ण प्रोसेससाठी जवळजवळ ८-१० आठवड्यांचा कालावधी लागतो. मात्र ही ट्रिटमेंट एक्सपर्ट्सच्या सल्ल्यानंतरच करावी असे सांगितले जाते. या ट्रिटमेंटमध्ये काही सिटिंगमध्ये केसांना डोक्यावर ग्राफ्ट केले जाते. येथे लक्ष देण्याची गोष्ट अशी की, जर तुम्ही एखाद्या स्किल्ड आणि एक्सपीरियंस डॉक्टर्सकडून हेअर ट्रांसप्लांट करत असाल तर तुम्हाला प्रति ग्राफ्ट ५० हजार ते ७० हजारांपर्यंत फी द्यावी लागते. प्रत्येक ग्राफ्टमध्ये २-३ रोम होतात त्यामध्ये १-३ केस असतात.

हेअर ट्रांसप्लांटनंतर केस गळतात का?
सर्वसामान्यपणे हेअर ट्रांसप्लांटच्या २-३ महिन्यानंतर काही लोकांमध्ये केस गळतीची समस्या दिसून आली आहे. त्यामध्ये ट्रांसप्लांट करण्यात आलेले केस जवळजवळ १०-३० टक्क्यांनी गळतात. असे शॉक लॉसच्या कारणास्तव होते आणि सर्जरीनंतर हे सामान्य आहे. मात्र एक्सपर्ट्स असे सुद्धा म्हणतात की, ट्रांसप्लांट करण्यात आलेले केस पूर्णपणे पुन्हा येता. मात्र उत्तम रिझल्ट्ससाठी ६-१० महिन्यांची वाट पहावी लागते.

किती सुरक्षित?
डॉक्टर असे म्हणतात की, ट्रिटमेंट नंतर हेअर ट्रांसप्लांट केलेल्या ठिकाणी सूज किंवा रेडनेस सारखी समस्या येऊ शकते. हे समजून घेणे फार महत्त्वाचे आहे की, हा तत्काळ प्रभाव आहे. तसेच सर्वसामान्यपणे काही दिवसांपासून ते आठवड्यांपर्यंत ही समस्या ठिक होते. (Hair Transplant)

हेही वाचा- ब्रोटॉक्स ट्रिटमेंट आणि बोटॉक्स मध्ये ‘हा’ आहे फरक

कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी
सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट अशी की, ट्रांसप्लांट करण्यात आलेल्या ठिकाणी खपली निर्माण होण्यापासून दूर राहण्यासाठी सेलाइन स्प्रे चा वापर करावा. पुढील दोन आठड्यांपर्यंत हैवी वर्कआउट, स्विमिंग, वेगाने चालणे किंवा जिम करू नये. या व्यतिरिक्त स्मोकिंग आणि ड्रिंकिंगपासून ही दूर रहावे. व्यक्तीला १-२ दिवस तरी केसाच्या हिस्स्याच्या येथून जवळजवळ ४५ डिग्री पर्यंत वर झोपावे. बाहेर जाण्यासाठी सूती किंवा सर्जिकल कॅपचा वापर करावा. या व्यतिरिक्त आपल्या डॉक्टरांकडून जरूर फॉलो अप घेतला पाहिजे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.