केस गळणे आजकाल एक सामान्य समस्या झाली आहे. यापूर्वी एका वयानंतर केसगळतीची सुरुवात व्हायची.पण आजकाल तरुणांमध्ये सुद्धा केसगळतीची समस्या अधिक दिसून येते. याला कारणीभूत गोष्ट म्हणजे आपले खाणेपिणे. धावपळीच्या आयुष्यात आपण सर्वकाही गोष्टी घाईघाईत करतो. वेळेच्या कमतरतेमुळे आपण आरोग्याकडेही लक्ष देत नाही. आपल्या शरीराला प्रत्येक प्रकारचे व्हिटॅमिन्स आणि मिनिरल्सची गरज असते. याची कमतरता निर्माण झाल्यास आपले शरीर हळूहळू काही संकेत देऊ लागतो. याकडे कधीच दुर्लक्ष करू नये आणि वेळीच उपचार केले पाहिजेत. तर जाणून घेऊयात कमी वयात केसगळतीची नक्की कारणे काय आहेत. (Hair Fall Problem)
न्युट्रिशन्स न मिळणे
केस अचानक गळणे, ड्राय होणे, फाटे फुटणे अशा सर्व गोष्टी आपल्या केसांना मिळणाऱ्या पोषणासंबंधित आहेत. योग्य न्युट्रिशन्स न मिळाल्यास या समस्या होऊ लागतात. त्याचसोबत आपल्या शरीरात उर्जा निर्माण व्हावी म्हणून न्युट्रिशनयुक्त पदार्थांचे सेवन करावे असा सल्ला दिला जातो. त्याचप्रमाणे आपल्या केसांना सुद्धा न्युट्रिशन मिळणे आवश्यक असते. पण ते मिळाले नाही तर केस वेगाने गळण्यास सुरुवात होते. लक्षात ठेवा शरीर आणि त्वचेची जरी तुम्ही खुप काळजी घेतली तरीही केसांच्या आरोग्यासाठी सुद्धा तुम्हा पुरेशा प्रमाणात न्युट्रिशन घेणे आवश्यक आहे.
रसायनयुक्त पदार्थ
आजकाल तरुण मंडळी सुंदर दिसावे म्हणून रसायनयुक्त क्रिम, शॅम्पूचा वापर करतात. सुरुवातीला असे प्रोडक्ट्स वापरल्याने काही वाटत नाही. पण कालांतराने याचा केसांवर परिणाम होतो. हळूहळू केसांचा नॅच्युरल लूक निघून जात ते ड्राय होतात. केसांवर विविध प्रकारे हेअर कलर लावल्याने सुद्धा तुमचे केस खराब होतात. केसांवर थेट हेअर स्ट्रेटनर अशा काही प्रोडक्ट्सचा वापर केल्यासही तुमचे केस खराब होऊ शकतात. त्यामुळे नॅच्युरल किंवा होममेड प्रोडक्ट्स वापरण्याचा प्रयत्न करा. (Hair Fall Problem)
खुप वेळ केस बांधून राहणे
खुप वेळ केस बांधून राहणे किंवा केस एकाच पॅटर्नमध्ये बांधण्याची महिलांना सवय असते. यामुळे केसांची मूळ कमजोर होतात. केसांच्या मुळांमध्ये दाणे येऊ लागतात. त्यात खुप खाज येण्यास सुरुवात होते. या असहाय्य खाजेमुळे तेथे लाल डाग येण्याची शक्यता असते. अशातच हळूहळू केस गळण्यास सुरुवात होते. एक काळ असा येतो हे इंन्फेक्शन अधिक पसरले जाते. तेव्हा आपण त्याकडे लक्ष देऊ लागतो. त्यामुळे लक्षात ठेवावे जेव्हा आपण केस बांधतो तेव्हा ते अधिक घट्ट बांधून ठेवू नये. थोड्याथोड्यावेळाने केस मोकळे सोडावेत. जेणेकरुन तुम्ही केसगळतीच्या समस्येपासून दूर रहाल.
हेही वाचा- सणासुदीच्या दिवसात केमिकल फ्री उपायांनी उजळवा तुमचे सौंदर्य