Home » हेअर ड्रायरचा दररोज केसांसाठी वापर करत असाल तर होईल नुकसान

हेअर ड्रायरचा दररोज केसांसाठी वापर करत असाल तर होईल नुकसान

तुम्ही दररोज केसांसाठी हेअर ड्रायरचा वापर करता का? तर थांबा. कारण हेअर ड्रायरच्या सातत्याच्या वापराने केसांचे कशाप्रकारे नुकसान होते हे जाणून घेऊया....

by Team Gajawaja
0 comment
Hair dryer disadvantages
Share

Hair dryer disadvantages :  बहुतांश महिला केस धुतल्यानंतर ते सुकवण्यासाठी हेअर ड्रायरचा वापर करतात. कारण यामुळे केस लवकर सुकले जातात. पण दररोज हेअर ड्रायरचा केसांसाठी वापर करणे केसांना नुकसान पोहोचवू शकते. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया….

केस गळण्यास सुरुवात
हेअर ड्रायरचा दररोज वापर केल्याने केस गळण्याची समस्या उद्भवू शकते. खरंतर, हेअर ड्रायरमधून निघणाऱ्या गरम हवेमुळे केसांमधील मूळांमध्ये असणारा ओलसरपणा दूर होत केस कोरडे होतात. यामुळेच केस गळण्यास सुरुवात होऊ शकते.

केसांना फाटे फुटण्याची समस्या
दररोज हेअर ड्रायरचा वापर केल्याने केसांना फाटे फुटण्याची समस्या उद्भवू शकते. हेअर ड्रायरमुळे केस कोरडे होतात आणि केसांना फाटे फुटण्यास सुरुवात होते.

केसांत कोंडा होण्याची शक्यता
हेअर ड्रायरच्या वापरामुळे केसांमध्ये कोंडा होण्याची समस्या उद्भवू शकते. खरंतर, हेअर ड्रायरमधून निघणाऱ्या गरम हवेमुळे केस कोरडे झाल्यास केसांत कोंडा होऊ शकतो.

केस पांढरे होण्याची समस्या
हेअर ड्रायरच्या सततच्या वापरामुळे केस पांढरे होण्यास सुरुवात होऊ शकतो. यामुळे केसातील तेलाचा स्तर कमी होते. यामुळेच केस पांढरे होऊ लागतात. (Hair dryer disadvantages)

या गोष्टींची घ्या काळजी
-हेअर ड्रायर वापरताना मध्येमध्ये बंद करा
-हेअर ड्रायरचे तापमान पाहा
-केसांना सीरम लावल्यानंतरच हेअर ड्रायरचा वापर करा
-नैसर्गिक हवेच्या मदतीने केस सुकवा


आणखी वाचा :
जाणून घ्या बनारसी साडीबद्दलच्या ‘या’ खास गोष्टी
तिरुपती बालाजी मंदिराची ‘ही’ रहस्ये माहिती आहेत का?

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.