Home » हेअर कलर करण्यापूर्वी ‘या’ गोष्टींची घ्या काळजी

हेअर कलर करण्यापूर्वी ‘या’ गोष्टींची घ्या काळजी

आजकाल हेअरकलर करण्याचा ट्रेंन्ड वाढला आहे. यामुळे केसांना एक वेगळा लूक मिळतो. केवळ महिलाच नव्हे तर पुरुष मंडळी सुद्धा केसांना हेअर कलर किंवा हाइलाइट करण्यात मागे राहत नाहीत.

by Team Gajawaja
0 comment
hair color tips
Share

आजकाल हेअरकलर करण्याचा ट्रेंन्ड वाढला आहे. यामुळे केसांना एक वेगळा लूक मिळतो. केवळ महिलाच नव्हे तर पुरुष मंडळी सुद्धा केसांना हेअर कलर किंवा हाइलाइट करण्यात मागे राहत नाहीत. आजकाल हा ट्रेंन्ड अधिक वाढत चालला आहे. यामुळे तुमचा लूक खुप स्टाइलिशही दिसतो. वेगवेगळ्या रंगांत हेअर कलर केले जातात. पण जर तुम्ही सुद्धा केसांना कलर करायचा विचार करत असाल तर पुढील काही गोष्टी जरुर लक्षात ठेवल्या पाहिजेत.  (Hair color tips)

रंगाची निवड
जर केसांना कलर करणार असाल तर सर्वात प्रथम रंगाची निवड ही आपल्या स्किन टोननुसार करावी. सर्वात आधी हे ठरवा की, कोणता रंग तुमच्या केसांना सूट होईल. खरंतर मार्केटमध्ये विविध रंग उपलब्ध आहेत. पण ब्राउन आणि बेज रंग हा प्रत्येक स्किन टोनसाठी सूट करतो. यामुळे केसांना उत्तम लूक येतो.

ऋतू लक्षात घ्या
केसांना हेअर करताना कोणत्या ऋतूत करतायत हे लक्षात ठेवा. जर उन्हाळ्यात हाइलाइट करत असाल तर हलका रंगाची निवड करा. तसेच थंडीच्या दिवसात करत असाल तर डार्क रंगाची निवड करा.

How to Dye Your Hair Naturally | Be Beautiful India

प्रोडक्ट्सची निवड
केसांना हाइलाइट करताना कोणत्याही प्रोडक्ट्सचा वापर करू नका. केसांसाठी तुम्ही मार्केटमधून नेहमीच ब्रँन्डेड आणि वेल रिव्यूइड प्रोडक्ट्सचा वापर करावा. स्वस्तात मस्तच्या नादात केसांना नुकसान पोहचू शकते. यासाठी तुम्ही प्रोफेशनल हेअर स्टाइलिस्टची मदत घेऊ शकता.केसांना कलर केल्यानंतर उत्तम शँम्पू आणि कंडीशनरचाही वापर करा. यामुळे तो केसांवर दीर्घकाळ टिकून राहिल. (Hair color tips)

पुढील काही ट्रिक्सही लक्षात घ्या
-जर तुम्ही पहिल्यांदाच हेअर कलर किंवा हाइलाइट करणार असाल तर जाड लेअर ऐवजी पातळ लेअर करा
-केसांसाठी हेअर स्ट्रेटनर किंवा कर्लरचा वापर करू नये
-केस धुण्यासाठी गरम पाणी किंवा सल्फेट शॅम्पूचा वापर करू नये. थंड म्हणजेच नॉर्मल पाण्याने धुवावेत. सल्फेट फ्री शँम्पूचा वापर करावा
-काही लोक केसांना एक ऐवजी दोन-तीन रंगांचा वापर करतात. असे असू शकते की, ते केसांना सूट होणार नाही. त्याचसोबत विविध केमिकल्स एकत्रित वापरल्याने केस डॅमेज होऊ शकतात
-कोणत्याही हेअर कलरचा वापर करण्यापूर्वी प्रोफेशनल्सचा सल्ला जरुर घ्या


हेही वाचा-  Make up kit दुसऱ्यांसोबत शेअर केल्याने होईल नुकसान


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.