Hair Care Tips : पावसाळ्याच्या काळात वातावरणात अत्याधिक दमट आणि ओलसरपणा असतो. यामुळेच त्वचा चिकट होण्याची समस्या बहुतांशजणांना उद्भवते. याशिवाय केसात घाम आल्याने डोक्यात सतत खाज येण्याचीही समस्या निर्माण होऊ शकते. या समस्येपासून दूर राहण्यासाठी काही घरगुती उपाय करू शकता. जाणून घेऊया याबद्दलच सविस्तर…
दह्याचा हेअर मास्क
ब्युटी एक्सपर्ट्सनुसार, दह्याच्या मदतीने डोक्यात खाज येण्याची समस्या कमी होऊ शकते. खरंतर, दह्यात कॅल्शिअम, प्रोटीन आणि व्हिटॅमिन्स असतात, जे आरोग्यासह त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर असतात. दह्याच्या मदतीने त्वचा आणि केसांच्या समस्या कमी होऊ शकतात. याशिवाय केस हेल्दी राहण्यासही मदत होऊ शकते.
असा तयार करा दही आणि मधाचा हेअर मास्क
सामग्री
-दोन चमचे दही
-एक चमचा मध
असा करा वापर
-एका वाटीत दही आणि मध मिक्स करा. याची घट्ट पेस्ट तयार केल्यानंतर केसांना लावा. ही पेस्ट केसांना एक तास लावून ठेवल्यानंतर शॅम्पूच्या मदतीने केस धुवा. हा उपाय आठवड्यातून दोनदा करू शकता.
दही, मुल्तानी माती आणि कच्च्या दूधाचा हेअर मास्क
सामग्री
-दोन चमचे दही
-एक चमचा मुल्तानी माती
-चार चमचे कच्चे दूध (Hair Care Tips)
असा करा वापर
-एका वाटीत दही घेऊन त्यामध्ये मुल्तानी माती, कच्चे दूध मिक्स करा
-आता पेस्ट केसांना एक तास लावून ठेवा
-एका तासानंतर केस स्वच्छ पाण्याने धुवा आणि शॅम्पूनेही धुवा.
-हा उपाय आठवड्यातून दोनदा करू शकता.