जगातील सर्वाधिक लोकप्रिय फळांपैकी एक फळ म्हणजे मोसंबी, यामध्ये भरपूर ‘व्हिटॅमिन-सी’ असते. चवीला आंबट-गोड असणाऱ्या या फळामध्ये भरपूर प्रमाणात अँटी ऑक्सिडंट्स असतात. मोसंबीचा रस केवळ आपल्या आरोग्यासाठी नव्हे, तर त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी देखील लाभदायक आहे.
योग्य पद्धतीने मोसंबीच्या रसाचा वापर केल्यास केस निरोगी आणि चमकदार होण्यास मदत मिळेल. मोसंबीच्या रसामुळे आपले केस काळे घनदाट सुद्धा होऊ शकतात. मोसंबीच्या रसाचा आपल्या केसांना काय फायदा होतो? ते पाहूयात.. (Hair Care Tips)
मोसंबीच्या रसामुळे केस होतात मजबूत
नियमित मोसंबीचा रस प्यायल्यास तुमचे केस मजबूत होतील. तसंच केसगळती, केसांचे तुटणे इत्यादी समस्या दूर होण्यास मदत मिळेल. याव्यतिरिक्त मोसंबीतील व्हिटॅमिन ‘सी’मुळे मुळांसह केस मजबूत होतील. मोसंबीचा रस प्यायल्याने आपल्या शरीराला भरपूर प्रमाणात पोषक घटकांचा पुरवठा होतो. ज्यामुळे केस आणि त्वचा देखील निरोगी राहते. (Hair Care Tips)
केसांचे नुकसान टाळण्यासाठी
लांबसडक आणि काळ्याशार केसांमुळे आपलं व्यक्तिमत्त्व देखील सुंदर दिसतं. व्यक्तिमत्त्व आकर्षक असल्यास आपल्या आत्मविश्वासामध्येही भर पडते. केस सुंदर दिसण्यासाठी मोसंबीच्या रसाचा योग्य प्रमाणात उपयोग करावा. यामुळे खराब झालेल्या केसांचे आरोग्य सुधारण्यास मदत मिळते. तसंच मोसंबीमधील अँटी ऑक्सिडंटमुळे आपले केस चमकदार होतात आणि केसांचे संरक्षण देखील होतं.
कोंड्या समस्या होते दूर
केस सुंदर व घनदाट होण्यासाठी टाळूची त्वचा निरोगी असणं आवश्यक आहे. कोंड्यामुळे खाज येणे, टाळूवर जखमा होणे इत्यादी समस्या निर्माण होऊ शकतात. या समस्या दूर करण्यासाठी नियमित स्वरुपात तुम्ही मोसंबीचा रस पिऊ शकता अथवा या रसापासून शॅम्पू तयार करून हेअर वॉशसाठी उपयोग करू शकता. नियमित स्वरुपात हा उपाय केल्यास टाळूच्या त्वचेला नैसर्गिक स्वरुपात ओलावा मिळेल आणि कोंड्याची समस्या देखील कमी होईल. (Hair Care Tips)
टाळूच्या त्वचेवरील जळजळ आणि सूज होते कमी
कधी- कधी केसांच्या मुळांना स्पर्श केल्यानंतर आपल्याला प्रचंड वेदना होतात. तुम्हाला सुद्धा हा अनुभव आला आहे का? पोषण तत्त्वांच्या अभावामुळे ही समस्या निर्माण होते. मोसंबीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर आहे, हे जीवनसत्त्व आपल्या केसांसह त्वचेसाठीही लाभदायक असते. यामुळे केसांमधील तसंच त्वचेवर सूज येण्याची आणि त्वचेवर जळजळ होण्याची समस्या दूर होण्यास मदत मिळते.(Hair Care Tips)
====
हे देखील वाचा: तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण पेरू खाण्याचे ‘एवढे’ आहेत फायदे!
====
केसांसाठी मोसंबीच्या रसाचे काही अन्य फायदे
-केस मऊ होतात
-दुभंगलेल्या केसांची समस्या दूर होते
-केसांवर नैसर्गिक चमक येते
-केसांची वाढ चांगली होते
-केसांना खोलवर पोषण तत्त्वांचा पुरवठा होतो….
-मोसंबीच्या रसाने कसे करायचे हेअर वॉश?
====
हे देखील वाचा: आला उन्हाळा त्वचा सांभाळा – घरच्या घरी बनवा नैसर्गिक फेसपॅक
====
केसांची खोलवर स्वच्छता करण्यासाठी आणि केस मऊ राहण्यासाठी मोसंबी हेअर वॉशमुळे तुम्हाला भरपूर मदत मिळेल. जाणून घेऊया घरगुती पद्धत…
मोसंबी सोलून रस काढून घ्या. एका पॅनमध्ये थोडेसे पाणी गरम करत ठेवा. पाणी गरम झाल्यानंतर गॅस बंद करा. गरम पाण्यामध्ये रस मिक्स करा आणि मिश्रण ढवळा. या पाण्याने केस धुऊन घ्यावेत. यानंतर केस स्वच्छ धुण्यासाठी ऑर्गेनिक शॅम्पूचा वापर करावा
– वेदश्री ताम्हाणे
टीप: या लेखातील माहिती आणि मते ही सर्वस्वी लेखकाची आहेत. क फॅक्टस टीम याची पुष्टी करत नाही. तसेच लेखकाच्या मतांशी आम्ही सहमत असूच असेही नाही.