Hair Care Tips : बहुतांश महिला आपल्या सौंदर्याची अधिक काळजी घेतात. पण सध्याच्या घडीला धावपळीच्या आयुष्यात महिला स्वत:साठी काही गोष्टी करण्याकडे दुर्लक्ष करतात. त्यापैकीच एक म्हणजे केसांची काळजी न घेणे. तुम्हाला जर कामामुळे केसांची काळजी घेता येत नसल्यास काही सोप्या टिप्स वापरु शकता. अन्यथा केसांना फाटे फुटणे, केस गळती अशा समस्या उद्भवू शकतात.
केस घट्ट बांधणे टाळा
ऑफिसला जाण्यासाठी धावपळ होत असल्याने बहुतांश महिला पोनीटेल बांधतात. पण सातत्याने पोटीनेटल बांधणे किंवा दीर्घकाळ केस घट्ट बांधून राहिल्याने ते गळण्यास सुरुवात होऊ शकते. खरंतर, एकसमान हेअर स्टाइल करणे टाळावे. याशिवाय नेहमीच केस मोकळे देखील ठेवू नये.
केसांना तेल लावणे किंवा हेअर मास्क
केसांची योग्य काळजी घेण्यासाठी त्यांना तेल लावणे किंवा हेअर मास्क लावणे आवश्यक आहे. अशातच आठवड्यातून एकदा तरी केसांना तेलाने मसाज किंवा हेअर मास्क लावा. जेणेकरुन केस मऊ होतील.
कंडिशनरचा वापर
केस मऊ आणि सिल्की होण्यासाठी कंडिशनरचा वापर केला पाहिजे. केसांना उत्तम ब्रँडचा शँम्पू लावल्यानंकर कंडिशनर लावणे विसरु नका. आठवड्यातून दोनदा किंवा एकदा केस धुतल्यानंतर नक्की कंडिशनर लावा. (Hair Care Tips)
सातात्याने हेअर वॉश करु नका
केसांना दररोज शँम्पू लावून धुणे अयोग्य आहे. यामुळे केसांचे नुकसान होण्यासह त्याची नैसर्गिक चमक कमी होऊ शकते. याशिवाय सातत्याने केस धुतल्याने केसांच्या मूळांजवळ घाण जमा होऊ लागते. अशातच केस तेलकट होऊ शकतात.
अत्याधिक उन्हात केस मोकळे सोडू नका
केसांची काळजी घेण्यासाठी घराबाहेर उन्हात जाण्याआधी स्कार्फ अथवा छत्री घेऊन बाहेर पडा. ज्या प्रकारे यूवी किरणांपासून डोळ्यांचे संरक्षण होण्यासाठी गॉगलचा वापर केला जातो त्याचनुसार तुम्ही उन्हात केसांची काळजी घ्या.