Home » ज्ञानव्यापी मस्जिदीच्या संदर्भात खास गोष्टी ज्या जुन्या पुस्तकांमध्ये आढळतात

ज्ञानव्यापी मस्जिदीच्या संदर्भात खास गोष्टी ज्या जुन्या पुस्तकांमध्ये आढळतात

by Team Gajawaja
0 comment
Gyanvapi Masjid
Share

वाराणसी मधील ज्ञानव्यापी मस्जिद (Gyanvapi Masjid) संदर्भात नुकतीच सुनावणी झाली. जिल्हा न्यायाशीध ए.के. विश्वेश यांनी अंजुमन इंतजामिया कमेटीची याचिका फेटाळून लावत असे म्हटले की, परिवारात पूजा करण्याची मागणी करणारी याचिका ऐकण्यायोग्य आहे. आता या प्रकरणी पुढील सुनावणी २२ सप्टेंबरला होमार आहे. अंजुमन इंतजामिया कमेटीची याजिका फेटाळून लावल्यानंतर आता मुस्लिम पक्षाने हायकोर्टात धाव घेण्याचा विचार केला आहे. मात्र पुस्तकांत आणि दशक जुन्या कागदपत्रांमध्ये ज्ञानव्यापी मस्जिदीसंदर्भातील काही खास गोष्टी लिहिल्या गेल्या आहेत. त्याच आपण आज अधिक जाणून घेऊयात.

ऐतिहासिक कागदपत्रांच्या मते, १८ एप्रिल, १९६९ मध्ये औरंगजेबाने असे म्हटले होते की, ठट्टा आणि मुल्ताब सूबे मध्ये खासकरुन बनारस मध्ये काही ब्राम्हण आपल्या रद्दी पुस्तकांमधून शिकवतात. दूर-दूरवरुन हिंदू आणि मुस्लिम समुदायातील विद्यार्थी त्यांच्याकडून ज्ञान घेण्यासाठी यायचे. त्याचसोबत ब्राम्हणांसंदर्भात माहिती मिळाल्यानंतर बादशाहने फरमान जारी केले होते की त्यांची तमाम मंदिरी आणि पाठशाळा जमीनदोस्त करा. त्याचसोबत मुर्ती पूजा सुद्धा बंद केली जाईल. २ सप्टेंबर १९६९ मध्ये त्याच्या सेवकांनी बनारस मधील विश्वनाथ मंदिर पाडले. परंतु ते तसे करण्यास पूर्णपणे यशस्वी झाले नाहीत.

Gyanvapi Masjid
Gyanvapi Masjid

या दरम्यान, बनारसच्या गल्ल्यांमध्ये युद्ध झाले. काशी मधील मुलं, तरुण वर्ग आणि वृद्ध सुद्धा युद्धात उतरले. मंदिराचे महंत शहीद झाले. चुनार किल्ल्यापासून तोफ मागून मंदिर पाडण्याचा पूरेपूर प्रयत्न करण्यात आला, मात्र ते पूर्णपणे पडले नाही. मंदिराचा एक हिस्सा राहिला जो आजही दिसतो. पुस्तकांच्या मते, मंदिर जमीनदोस्त केल्यानंतर मस्जिद तयार करण्यात आले. या घटनेनंतरच्या काही काळानंतर दत्ताजी सिंधिया आणि मल्हारराव होळकर यांनी तेथे आक्रमण केले आणि मस्जिदीच्या ठिकाणी मंदिर बनण्याचा निर्धार केला. मात्र मुघलांसोत युद्ध झाल्याने तसे करणे शक्य झाले नाही.(Gyanvapi Masjid)

तर १७५२ ते १७८० दम्यान मराठ्यांकडून काही वेळा आक्रमण करत ते ठिकाण इंग्रजांपासून मुक्त करण्याचा प्रयत्न केला. ७ ऑगस्ट १७९० मध्ये महाद जी सिंधिया यांनी विश्वनाथ मंदिराची पुर्निर्मिती करण्यासाठी शाहआलम कडून फरमान जारी केले. मात्र इंग्रजांनी मुस्लिमांचा विरोध असल्याचे सांगत तसे होऊ दिले नाही.

हे देखील वाचा- स्वामी स्वरुपानंदांना का दिली जाणार भू समाधी? कशा पद्धतीने संतांचे केले जातात अंत्यसंस्कार

हे प्रकरण कोर्टात पोहचले. १८१० मध्ये परिसरात इंग्रजांनी मुस्लिमांना विशेष वेळी नमाद अदा करण्याची परवानगी दिली आणि मस्जिद सोडून अन्य हिस्सा हिंदू पक्षाला दिला. १८५७ मध्ये स्वातंत्र्यता आंदोलनादरम्यान मुस्लिम पक्षाने मंदिरावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला पण तेव्हा ही त्यांना अपयश आले. प्रकरण कोर्टात पोहचल्यानंतर मुस्लिमांनी संपूर्ण ज्ञानव्यापी वर अधिकार हवा असल्याची मागणी केली. मात्र त्यांची ही याचिका फेटाळून लावण्यात आली. त्यानंतर मुस्लिम पक्ष हायकोर्टात पोहचला तेथे सुद्धा ही याचिका फेटाळली. १९९१ मद्ये काशी विश्वनाथ मुक्ति संघर्ष समितीची स्थापना झाली. याच वर्षी प्राचीन मुर्ती स्वयं भू-विश्वेश्वर आणि अन्य विरोधी अंजुमन इंतजामिया मस्जिदचा वाद कोर्टात पोहचला.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.