दक्षिणेची द्वारका म्हणून प्रसिद्ध असलेले केरळमधील त्रिशूर येथील गुरुवायूर श्री कृष्ण मंदिराच्या भाविकांमध्ये सध्या प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्याला कारण ठरली आहे, ती युटूबर जस्मिन जाफर. जस्मिन जाफरने केरळमधील प्रसिद्ध अशा गुरुवायूर श्री कृष्ण मंदिराच्या तळ्यात पाय धुतल्याचा व्हिडिओ तयार केला, आणि हा व्हिडिओ शेअरही केला. हे मंदिर भगवान श्रीकृष्णाचे निवासस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. मंदिराच्या तलावाचे पाणी हे हिंदू धर्मियांसाठी पवित्र मानले जाते. जसे मानसरोवरच्या पाण्याचे महत्त्व आहे, तसेच या गुरुवायूर श्री कृष्ण मंदिराच्या समोर असलेल्या तळ्यातील पाण्याला महत्त्वाचे स्थान हिंदूंच्या ह्दयात आहे. याच तळ्यात पाय धूत असलेल्या जस्मिन जाफरचा व्हिडिओ आला, आणि सर्वत्र एकच खळबळ उडाली. (Guruvayoor Shri Krishna Mandir)
मंदिर प्रशासनाने जस्मिन विरुद्ध तक्रार दाखल केली. शिवाय जस्मिनने नियमांचे उल्लंघन केल्याचे सांगून मंदिर प्रशासनानं मंदिराचे शुद्धीकरण सुरु केले आहे. दरम्यान या प्रकरणी वाद वाढल्यावर जस्मिनने या प्रकरणाबद्दल माफी मागितली आणि तलावात बनवलेला व्हिडिओ सोशल मिडिआवरुन काढून टाकला. मात्र जस्मिन या पवित्र तलावापर्यंत गेली कशी, आणि येथील आख्यायिका माहित असूनही तिनं या तलावाबाबत अक्षेपार्ह व्हिडिओ केलाच कसा, हा प्रश्न विचारण्यात येत आहे. केरळ राज्याच्या त्रिशूर येथील गुरुवायूर श्री कृष्ण मंदिर हे दक्षिणेची द्वारका म्हणून प्रसिद्ध आहे. याच मंदिराबाबत आलेल्या एका व्हिडिओमुळे तमाम हिंदू धर्मियांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यात बिग बॉस मल्याळम सीझन 6 ची माजी स्पर्धक आणि युटूबर असलेली जस्मिन जाफरनं या मंदिराच्या पवित्र तळ्यात पाय धुतले आहेत. (Social News)
यानंतर जस्मिन वादात सापडली असून तिच्यावर कारवाई करण्याची मागणी वाढली आहे. अत्यंत पुरातन असलेल्या या मंदिरात आतापर्यंत स्थापनेपासून अनेक परंपरा पाळल्या जात आहेत. त्यापैकी येथील पवित्र तळ्याचे पावित्र्यही आहे. याच परंपरेचे उल्लंघन करत तलाव अपवित्र केल्याबद्दल जस्मिनविरोधात मोठे जनमत तयार झाले आहे. आता या मंदिराचे शुद्धिकरण सुरु असून मंदिर भाविकांसाठी काही वेळ बंद करण्यात आले आहे. जस्मिननं जिथे व्हिडिओ शूट केला तिथे व्हिडिओ करण्यास थेट उच्च न्यायालयानं बंदी घातलेली आहे. याच तलावात आरट्टूसारखे पवित्र विधी केले जातात. त्यामुळे मंदिर प्रशासन आता सकाळी 5 ते दुपारी 12 वाजेपर्यंत मंदिर शुद्धिकरण विधी करत आहे. हे विधी एक आठवडा करण्यात येणार आहेत. (Guruvayoor Shri Krishna Mandir)
यामध्ये 18 पूजा आणि 18 शैलींचा समावेश आहे. केरळमधील हे गुरुवायूर मंदिर पृथ्वीवरील श्रीहरी विष्णूचे निवासस्थान म्हणूनही प्रसिद्ध आहे. या मंदिरात दर्शनास येणा-या भाविकांसाठी कडक नियम पाळावे लागतात. अशावेळी जस्मिन या मंदिर परिसरात कशी आली, हा प्रश्नही विचारण्यात येत आहे. रहस्यमय आख्यायिकांनी प्रसिद्ध असलेले गुरुवायूर मंदिर केरळमधील तिरुचूरपासून सुमारे 32 किमी अंतरावर आहे. येथे भगवान गुरुवायूरप्पा यांची अनेक कुटुंबांचे कुलदैवत म्हणून पूजा केली जाते. या मंदिराबाबत सांगण्यात येणा-या आख्यायिकेनुसार भगवान विष्णूने सृष्टीच्या सुरुवातीपूर्वी ब्रह्माला भेट म्हणून एक प्रतिमा निर्माण केली होती. ब्रह्माने ती राजा सुतपास आणि त्यांची पत्नी प्रसन्ननी यांना दिली. त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन विष्णूने त्यांना वरदान दिले की, ते त्यांच्या कुटुंबात सलग चार जन्म अवतार घेतील. (Social News)
भगवान विष्णूच्या आशीर्वादामुळे, या सर्व जन्मांमध्ये, या मूर्तीची भक्तीभावानं पूजा करण्यात आली. त्यानंतर कृष्णाच्या जन्मानंतर, या जोडप्याला वासुदेव आणि देवकी म्हणून मोक्ष मिळाला. त्यानंतर कृष्णाकडे ही मूर्ती वारशाने आली. त्यांनी ती द्वारकेत नेली, आणि तिची पूजा सुरु झाली. पुढे देहत्याग करण्यापूर्वी, श्रीकृष्णाने आपल्या मित्र उद्धवाला द्वारका शहर सात दिवसांत समुद्र गिळंकृत करणार असल्याचे सांगितले, शिवाय येथील भागवान विष्णूची मूर्ती सुरक्षित ठिकाणी नेण्याची कामगिरी मित्र उद्धवाकडे दिली. याच पवित्र मूर्तीची स्थापना गुरुवायूर मंदिरात केल्याचे सांगण्यात येते. गुरुवायूर मंदिर 1638 मध्ये बांधण्यात आले. हे मंदिर एवढे भव्य होते की, उपखंडातील एक प्रसिद्ध तीर्थस्थान झाले. मात्र त्याच्या या भव्यतेकडे डच लुटारुंचे लक्ष गेले. 1716 मध्ये डच लुटारुंनी मंदिर फक्त लुटलेच नाही, तर त्याला आगही लावली. त्यानंतर पुन्हा या मंदिराची उभारणी करण्यात आली. (Guruvayoor Shri Krishna Mandir)
=======
Khlong Khuan Ganesha : या देशात आहे, सर्वात उंच गणेशमूर्ती !
=======
वैष्णव परंपरेतील 108 अभिमन क्षेत्रांपैकी एक म्हणून या मंदिराची ओळख आहे. पंचजन्य शंख, सुदर्शन चक्र, कौमोदकी गदा आणि तुळशीची माळ असलेले कमळ धारण केलेले चार हात असलेली भगवान विष्णूंची मूर्ती भाविकांनी मोहित करते. या मूर्तीची पूजा करण्याचा विधी हा आदि शंकरानी घालून दिलेल्या पद्धती आणि नियमांनुसार अजूनही केला जातो. या पवित्र मंदिराच्या उत्तरेकडील भागात असलेल्या मंदिराच्या तळ्याला रुद्रतीर्थम म्हणतात. आख्यायिकेनुसार, भगवान शिव हजारो वर्षांपासून या तळ्याच्या दक्षिण तीरावर स्नान करत असत. शिवाला ‘रुद्र’ या नावाने देखील ओळखले जात असल्याने, या टाकीला रुद्रतीर्थम असे म्हटले जाऊ लागले. याच पवित्र तळ्यात आता जस्मिन जाफर नावाच्या महिलेनं पाय धुतले आणि त्याचा व्हिडिओ शेअर केला, त्यावरुन केरळमध्ये वाद सुरु आहे. (Social News)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics