Home » Guru Nanak Jayanti : जाणून घ्या शिख धर्माचे संस्थापक गुरुनानक देव कोण होते?

Guru Nanak Jayanti : जाणून घ्या शिख धर्माचे संस्थापक गुरुनानक देव कोण होते?

by Jyotsna Kulkarni
0 comment
Guru Nanak Jayanti | Top Marathi Headlines
Share

भारत हा ‘सर्वधर्म समभाव’ या तत्त्ववर चालणार देश आहे. भारतात अनेक धर्माची लोकं गुण्यागोविंदाने राहतात आणि आपले सर्व सणवार आनंदाने साजरे करतात. भारतातील मुख्य धर्मांपैकी एक धर्म म्हणजे शीख धर्म. शीख धर्माचा उगम १५ व्या शतकात पंजाबमध्ये झाला. आज भारतात शीख धर्माचे बहुसंख्य लोकं पाहायला मिळतात. अगदी राजकारणापासून ते मनोरंजन, खेळ, व्यवसाय आदी सर्वच क्षेत्रामध्ये शीख धर्मीय लोकांनी आपले प्रस्थ निर्माण केले आहे. याच शीख लोकांचा महत्त्वाचा आणि मोठा सण म्हणजे ‘गुरुनानक जयंती’. शीख धर्माचे संस्थापक असलेल्या गुरुनानक यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. शीख धर्माची स्थापना गुरू नानक देव यांनी १५ व्या शतकात केली. आज आपण याच सणाबद्दल आणि गुरुनानक यांच्याबद्दल माहिती जाणून घेऊया. (Marathi)

गुरुनानक जयंती हा शीख धर्माचे संस्थापक गुरुनानक देव यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. गुरुनानक जयंतीच्या दिवशी शीख समुदयातील लोक गुरुद्वारांमध्ये जातात आणि गुरुनानक देव यांच्या शिकवणीचे स्मरण करतात. म्हणून या दिवसाला गुरु पर्व आणि गुरु नानक प्रकाश उत्सव म्हणूनही ओळखले जाते. यावर्षी गुरु नानक देव यांची ५५६ वी जयंती साजरी केली जाणार आहे. या दिवशी शीख धर्मियांकडून मोठ्या उत्साहाने अनेक कार्यक्रम आणि नगर कीर्तन आयोजित केले जातात. या खास दिवसाची तयारी खूप आधीपासून सुरू होते. या दिवशी प्रभातफेरी काढल्या जातात. या काऴात लोक गुरुद्वारांमध्ये सेवा करतात. (Guru Nanak Jayanti)

गुरु नानक देवजींना शीख धर्माचे पहिले गुरु मानले जाते. त्यांना नानक देव, बाबा नानक आणि नानक शाह या नावानेही ओळखले जाते. लडाख आणि तिबेटच्या प्रदेशात त्यांना नानक लामा म्हणतात. गुरुनानक देव यांचा जन्म १५ एप्रिल १४६९ मध्ये तलवंडी येथे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी झाला. गुरुनानक यांच्या वडिलांचे नाव मेहता काळू जी, आईचे नाव तृप्त देवी. त्याच्या बहिणीचे नाव नानकी होते. (Top Stories)

Guru Nanak Jayanti

गुरुनानक यांचे वयाच्या १६ व्या वर्षीच सुलखानीसोबत त्यांचे लग्न झाले. त्यांना श्रीचंद आणि लखमीदास असे दोन पुत्र झाले. मात्र त्यांचे मन संसारात कधीच रमले नाही. म्हणून त्यांनी वयाच्या ३० व्या वर्षी घर सोडले. गुरूनानक त्यांचे फारसी, अरबी आणि संस्कृत भाषांवर प्रभुत्व मिळवले होते. त्यांच्या शिकवणीमध्ये देव, सत्य आणि सेवा या गोष्टींवर जोर दिला गेला. गुरुनानक जयंती हा दिवस दिव्यांचा सण म्हणून साजरा केला जातो. (Top Marathi News)

नानकांचा लहानपणापासूनच अध्यात्म आणि भक्तीकडे ओढा होता. वयाच्या ११ व्या वर्षी जनेऊ घालण्याची प्रथा पाळली जात होती. मात्र त्यांनी या पुराणमतवादा विरोधात मोठा संघर्ष सुरू केला. गुरू नानक यांनी देशभर प्रवास केला. सन १५२१ पर्यंत त्यांनी भारत, अफगाणिस्तान, इराण आणि अरब देशांतील प्रमुख ठिकाणांना भेटी दिल्या. गुरू नानक हे सर्वेश्वरवादी होते. त्यांनी त्यांच्या उदारमतवादी दृष्टिकोनाने सर्व धर्मातील चांगुलपणा आत्मसात केला. देव एक आहे, हिंदू मुस्लिम सर्व एकाच देवाची मुले आहेत अशी त्यांची शिकवण होती. देवाच्या समोर सर्व लोक समान आहेत असं ते म्हणायचे. गुरू नानक यांनी रचलेल्या कविता नंतर शिखांचा पवित्र ग्रंथ ‘गुरू ग्रंथ साहिब’मध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत. (Todays Marathi Headline)

गुरु नानकजींनी मनुष्याच्या जीवनाशी संबंधित अनेक शिकवणी दिल्या आहेत, ज्याचे लोक आजही पालन करतात. गुरु नानक देव यांचा जन्म भोईची तलवंडी येथे झाला. या ठिकाणाला रायभोईची तलवंडी असेही म्हणतात. आता हे ठिकाण पाकिस्तानच्या नानकाना साहिबमध्ये आहे. या ठिकाणाला गुरु नानक देव यांचे नाव देण्यात आले. ‘ननकाना साहीब’ गुरुद्वाराची निर्मिती राजा महाराजा रणजितसिंह यांनी केली होती. गुरु नानक देव यांनी एक ओंकार म्हणजेच एक देव असा संदेश दिला होता. (Marathi News)

गुरू नानक यांची मानवतावादावर दृढ श्रद्धा होती. त्यांचे चिंतन धर्माच्या सत्य व शाश्वत मुल्यांचे मूळ होते. म्हणूनच जात-धर्म या पलीकडे जाऊन सर्वांनी एकत्र यावे अशी त्यांची इच्छा होती. एकदा बेई नदीतून स्नान केल्यानंतर बाहेर आल्यावर त्यांनी ‘कुणीही हिंदू नाही आणि कुणीही मुसलमान नाही, सर्व जण मानव आहोत’, असा नारा दिला होता. हे जग बनविणारा एकच इश्वर आहे, असे त्यांचे म्हणणे होते. धर्म हे दर्शन आहे, दिखावा नाही, अशी त्यांची धारणा होती. (Top Marathi News)

Guru Nanak Jayanti

गुरु नानक जयंती हा सण शीख धर्मातील लोक दीपोत्सव म्हणून साजरा करतात. गुरु नानक जयंतीचा उत्सवपर्व तीन दिवस साजरा केला जाततो. त्याला प्रकाश पर्व असेही म्हणतात. कारण गुरु नानकजींनीही ‘इक ओंकार’चा नारा दिला होता. देव एकच आहे यावर त्यांचा विश्वास होता. गुरु नानकजींनी समाजात ज्ञानाचा प्रकाश पसरवला होता. त्यांनी सर्वांना ज्ञान आणि एकात्मतेच्या मार्गावर चालण्याची शिकवण दिली होती. त्यामुळे या उत्सवाला प्रकाशपर्व देखील म्हणतात. (Latest Marathi Headline)

या उत्सवात शीख समुदायाचे लोक गुरुद्वारामध्ये तीनही दिवस अखंड पाठाचे आयोजन करतात. यासोबतच या उत्सवात गुरु ग्रंथसाहिबचे पठण केले जाते. भजन आणि कीर्तन केले जातात आणि लोकांना सेवा दिली जाते. गुरूच्या उत्सवात शोभा यात्रा आणि लंगरही आयोजित केले जाते. गुरू नानक देवजी मूर्तीपूजेला निरर्थक मानत होते आणि ते नेहमी रूढी आणि कर्मकांडाच्या विरोधात होते. यामुळेच गुरू नानकजींनी शीख समाजाचा पाया घातला असे म्हटले जाते. शीख समाजाचे पहिले गुरू गुरु नानक देव जी यांचीही विशेष पूजा याच कारणासाठी केली जाते. नानकजींचा मृत्यू २२ सप्टेंबर १५३९ रोजी झाला. त्यांनी त्यांच्या मृत्यूपूर्वी त्यांचे शिष्य भाई लहना यांना उत्तराधिकारी बनवले, जे नंतर गुरु अंगद देव म्हणून ओळखले जाऊ लागले. (Top Trending News)

=======

Dev Diwali : जाणून घ्या कार्तिक पौर्णिमेला साजऱ्या होणाऱ्या देव दिवाळीची माहिती

Uttarakhand : येथे दिवाळी नंतर साजरी होते, बुधी दिवाळी !

=======

गुरु नानकजींनी तीन महत्त्वाच्या शिकवणी दिल्या. ज्याचे अनुसरण प्रत्येक शीखसाठी आवश्यक मानले जाते. यातली पहिली शिकवण म्हणजे नामस्मरण, भगवंताचे नामस्मरण खऱ्या मनाने केले पाहिजे असे ते कायम सांगायचे. दुसरी शिकवण म्हणजे, परिश्रम अर्थात तुम्ही तुमचे काम प्रामाणिकपणे आणि कठोर परिश्रमाने करावे. तिसरी आणि शेवटची शिकवण म्हणजे सिक्स ऑफ वँड्स, म्हणजेच तुम्ही जे काही कमावले आहे ते तुम्ही इतरांना वाटून घ्या आणि गरजूंना मदत करा. गुरु नानकजींच्या या शिकवणी प्रत्येक व्यक्तीला प्रेम, एकता, सेवा आणि सत्याच्या मार्गावर चालण्यासाठी प्रेरित करतात. (Social News)

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

 

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics

 


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.