आज शीख लोकांचा महत्वाचा सण गुरुनानक जयंती सर्वत्र साजरी केली जात आहे. कार्तिक महिन्यातील पौर्णिमा तिथीला गुरुनानक जयंती साजरी केली जाते. यावर्षी गुरू नानक यांची ५५५ वी जयंती साजरी केली जात आहे. शीख धर्मीय लोकं गुरू नानक यांचा जन्म दिन प्रकाश दिन साजरा केला जातो. शीख धर्मासाठी गुरु नानक जयंती हा मोठा सण आहे.
गुरुनानक जी यांनी ‘कलि महि राम नाम सारु’चा उपदेश गुरू नानकदेव यांनी संपूर्ण जगाला दिला. आजचा दिवस शिख समुदायाकडून गुरू पर्व किंवा प्रकाश पर्व म्हणूनही साजरा केला जातो. या दिवशी शीख समुदायाचे लोक गुरुद्वारामध्ये जातात, सेवा करतात आणि लंगरच्या स्वरूपात गुरूंच्या नावाने प्रसाद ग्रहण करतात.
गुरु नानक यांनी दिलेल्या शिकवणीमध्ये देव, सत्य आणि सेवा या गोष्टींना प्राधान्य दिले. गुरू नानक देवजी मूर्तीपूजेला निरर्थक मानायचे. ते नेहमीच रूढी आणि कर्मकांडाच्या विरोधात होते. त्यांनी आयुष्यभर लोकांमध्ये देव, धर्माबाबत जागृती निर्माण करण्यासोबतच त्यांनी शीख धर्माची शिकवण दिली आणि सोबतच त्यांनी हिंदू – मुस्लिम धर्मियांना एकतेचा संदेश दिला. आज गुरुनानक जयंतीच्या निमित्ताने जाणून घेऊया नानकजी यांच्या विचारांबद्दल आणि शिकवणीबद्दल.
– देवाच्या मर्यादा संपूर्ण मानवजातीच्या कल्पनेपलीकडच्या आहेत.
– सत्य जाणून घेणे हे इतर सर्व गोष्टींपेक्षा मोठे आहे आणि त्याहूनही मोठे सत्यासोबत जगणे.
– भगवंताची प्राप्ती गुरूमुळेच शक्य आहे, म्हणून गुरूंचा आदर आणि उपासना करा.
– दुसऱ्यांचे हक्क हिसकावून घेणार्याला कुठेही मान मिळत नाही. त्यामुळे कोणाचाही हक्क हिरावून घेऊ नये.
– नेहमी एका देवाची उपासना करण्यावर लक्ष केंद्रित करा.
– देव जगात सर्वत्र आणि प्रत्येक जीवात उपस्थित आहे.
– मेहनत आणि प्रामाणिकपणे काम करून त्यातूनही गरजूंना काहीतरी द्यायला हवे.
– कर्माच्या भूमीवर फळ मिळविण्यासाठी प्रत्येकाला काम करावे लागते.
– गुरु नानकांच्या मते, देवाला हजारो डोळे आहेत आणि तरीही एक डोळा नाही. भगवंताची हजारो रूपे असूनही ती निराकार आहे.
– भगवंताच्या भक्तीत लीन झालेले लोक कोणाला घाबरत नाहीत.
– प्रामाणिकपणा आणि मेहनतीने पोट भरले पाहिजे.
– वाईट गोष्टी करण्याचा किंवा कोणालाही त्रास देण्याचा विचार करू नका.
– तुम्ही नेहमी आनंदी राहावे, नेहमी स्वतःसाठी देवाकडे क्षमा मागावी.
– तुमच्या मेहनतीने आणि प्रामाणिक कमाईने गरजूंना मदत करा.
– प्रत्येकाकडे समानतेने पहा, स्त्री आणि पुरुष समान आहेत.
– शरीर जिवंत ठेवण्यासाठी अन्न आवश्यक आहे. पण लोभासाठी साचवण्याची सवय वाईट आहे.
– गुरु नानक देव ज्यांनी एक ओंकारचा नारा दिला आणि सांगितले की सर्वांचा पिता परमेश्वर एकच आहे, म्हणून प्रत्येकाने सर्वांवर प्रेम केले पाहिजे.
– लोकांनी प्रेम, एकता, समता आणि बंधुतेचा संदेश दिला पाहिजे.
– आपण कधीही दुसऱ्याचा हक्क हिरावून घेऊ नये. आपण कठोर परिश्रम करत प्रामाणिकपणे गरीब आणि गरजूंना मदत केली पाहिजे.
– माणसाने नेहमी लोभ सोडून कठोर परिश्रम केले पाहिजे आणि योग्य मार्गाने संपत्ती मिळवली पाहिजे.
– गुरू नानक देव नेहमी स्त्री-पुरुष समान मानत, त्यांच्या मते स्त्रियांचा कधीही अनादर करू नये.
– जेव्हा तुम्ही एखाद्याला मदत करता, तेव्हा देव तुम्हाला मदत करतो. इतरांना मदत करण्यासाठी नेहमी पुढे रहा.
– गुरू नानकजी म्हणतात की तुम्ही जे काही पेराल, त्याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल.
– जेव्हा शरीर घाण होते तेव्हा आपण ते पाण्याने स्वच्छ करतो. त्याचप्रमाणे मन मलिन झाल्यावर भगवंताच्या नामस्मरणाने आणि प्रेमानेच ते शुद्ध होऊ शकते.
– सर्व मानव एक आहेत, ना हिंदू ना मुस्लिम. सर्व समान आहेत.
– नानकजी म्हणतात – फक्त तीच वाणी बोला, जी आपल्याला सन्मान मिळवून देईल.
– हे जग जिंकायचे असेल, तर स्वतःच्या कमतरतेवर, दुर्गुणांवर मात करणे अत्यंत आवश्यक आहे.