Home » ‘या’ गोष्टींचे करा गुप्तदान

‘या’ गोष्टींचे करा गुप्तदान

सनातन धर्मात दानाचे अधिक महत्त्व आहे. हिंदू धर्मात अशा काही मान्यता आहेत ज्यामध्ये असे म्हटले आहे की, दान केल्याने पुण्य मिळते. धार्मिक शास्रानुसार दान केल्याने देव प्रसन्न होते आणि त्याचे आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहतात.

by Team Gajawaja
0 comment
Gupta Daan
Share

सनातन धर्मात दानाचे अधिक महत्त्व आहे. हिंदू धर्मात अशा काही मान्यता आहेत ज्यामध्ये असे म्हटले आहे की, दान केल्याने पुण्य मिळते. धार्मिक शास्रानुसार दान केल्याने देव प्रसन्न होते आणि त्याचे आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहतात. दानासारखे पुण्य केल्याने व्यक्तीला वर्तमानातच नव्हे तर त्याच्या येणाऱ्या पिढ्यांना सुद्धा त्याचे काही लाभ होतात. त्याचसोबत आयुष्यात आनंद येतो. या व्यतिरिक्त मृत्यूनंतर मोक्ष ही मिळतो. मात्र काही लोक जे दान करतात त्याबद्दल सर्वांना सांगतात. सांगून केलेल्या दानाचे फळ मिळत नाही. जेवढे गुप्त दानाऐवढे मिळते. त्यामुळे हिंदू धर्मात गुप्त दानाचे अधिक महत्त्व सांगितले आहे. (Gupta Daan)

शास्रात असे सांगितले गेले आहे की, आपण आपल्या उत्पन्नातील काही रक्केमेचे दान केले पाहिजे. दान केल्याने खुप लाभ होतात. दान केल्याने मन शांत आणि हृदय आनंदित राहते. जो व्यक्ती गुप्त दान करतो त्याला शुभ फळं ही मिळतात.

गुप्तदान म्हणजे काय?
जेव्हा आपण एखाद्याला न सांगता दान करतो किंवा आपले नाव न सांगता दान करतो त्याला गुप्तदान असे म्हटले जाते. गुप्त दान केल्याने व्यक्तीला साधारण दान केल्याने दुप्पट फळ मिळते. तुम्ही बहुतांश वृद्ध लोकांना असे सांगताना ऐकले असेल की, अशा प्रकारे दान करा डाव्या हाताचे उजव्या हाताला कळणार नाही.

-पाण्याचे दान
आयुष्य जगण्यासाठी पाणी पिणे अत्यंत गरजेचे आहे. कारण एखाद्याला तहान लागल्यानंतर पाणी पाजल्याने अत्यंत पुण्य मिळते. तुम्ही उन्हाळ्यात रस्त्याच्या किनाऱ्याला बसलेल्या लोकांना पाहिले असेल की, ते अन्न-पाण्यासाठी ते एखाद्याची वाट पाहत असतात. अशातच तुम्ही त्यावेळी जरुर पाण्याचे दान करा. एखाद्या धार्मिक स्थळी किंवा सार्वजनिक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय करा.असे केल्याने देवाचे आशीर्वाद सदैव पाठीशी राहतात.

-फळांचे दान
गुप्त दानात फळांचे दान करावे. व्यक्तीने वेळोवेळी ऋतूनुसार फळांचे दान आवश्यक नव्हते. त्यांना बाळं व्हावे अशी इच्छा असेल त्यांनी गरजवंतांना रसपान करावे. फळांचे दान करतेवेळी या गोष्टीची काळजी घ्यावी की, फळ कापून दान करू नयेत.

-सत्तूचे दान
सत्तूचे दान खासकरून उन्हाळ्यात करावे. कारण उन्हाळ्यात सत्तूचे सेवन करणे उत्तम मानले जाते. सत्तू पोटासाठी थंड ठेवण्यास फायदेशीर मानले जाते. सत्तूचे दान केल्याने केवळ व्यक्तीचे आरोग्य उत्तमच राहत नाही तर आशीर्वाद ही मिळतात. एखाद्या व्यक्तीच्या कुंडतील गुरुची स्थिती कमजोर असेल तर त्याने सत्तूचे गुप्त दान आवश्यक करावे.

-गुळाचे दान
गुळाचे दान करणे हिंदू धर्मात सर्वाधिक महत्त्वाचे मानले आहे. गुळाचे दान केल्याने सुर्याची स्थिती उत्तम राहते. जर व्यक्तीला आपल्यावर सुर्य देवाची कृपावृष्टी व्हावी असे वाटत असेल तर त्याने गुळाचे दान करावे. असे केल्याने व्यक्तीचा मान-सन्मान वाढला जातो. (Gupta Daan)

हेही वाचा- चारही युगांचे रक्षण करणारे ‘हे’ मंदिर

-अन्नदान
एखाद्या गरजवंताचे पोट भरणे अत्यंत पुण्याचे काम मानले जाते. मंदिर किंवा अन्य ठिकाणी गरीबांना तुम्ही अन्नदान करू शकता. उपाशी असलेल्या व्यक्तीचे पोट भरल्याने देवी देवता प्रसन्न होतात. अन्नदान केल्यान खासकरून देवी लक्ष्मीचे आशीर्वाद मिळतात. गुप्त दान केल्याने देवी देवताच नव्हे तर पितरांचे ही आशीर्वाद मिळतात.

(टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये) 


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.