माणसाने सुरुवातीला दगडाला आकार देऊन शिकारीसाठी शस्त्र बनवले असतील. पण हळूहळू या शस्त्रांचा वापर त्याने माणसांच्याच विरोधात सुरू केला असेल. सुरुवातीला युद्धात तलवार,भाले, धनुष्यबाण या शस्त्रांचा वापर केला जायचा. आज अनेक अत्याधुनिक शस्त्र प्रत्येक देशाकडे आहेत. आता तर अणू बॉम्ब पेक्षा जास्त विनाशक बॉम्ब सुद्धा बनवले गेले आहेत. पण युद्धावर, युद्धपद्धतीवर प्रभाव टाकणारं एक शस्त्र आहे. या शस्त्रा इतका प्रभाव दुसऱ्या कोणत्याही शस्त्राने टाकला नसेल. आज अट्टल गुन्हेगारांपासून किरकोळ चोरांपर्यंत हे शस्त्र वापरतात, ते म्हणजे बंदूक. एके काळी फक्त जागतिक सैन्यदलच बंदुका वापरायचे. आता तर अमेरिकेत बंदूक बाळगणं सामान्य नागरिकाचा हक्क मानला जातो. तर अशी ही बंदूक कशी तयार झाली? या बंदूकीचा इतिहास काय, जाणून घेऊया. (Gun)
कंपास, कागद आणि छपाईसारख्या महत्त्वाच्या शोधांसारखाच आणखी एक महत्त्वाचा शोध चीनमध्येच लागला, तो शोध म्हणजे बारूद. ९ व्या १० व्या शतकात चीनमध्ये गनपावडर, म्हणजेच बारूदचा शोध लागला. गनपावडर म्हणजे सल्फर, कार्बन आणि पोटॅशियम नायट्रेट यांचं मिश्रण होतं, जे एक प्रकारचं स्फोटक होतं. या स्फोटकाचा उपयोग सुरुवातीला दिवाळीत, जे आपण फटाके फोडतो, ते फटाके तयार करण्यासाठी झाला. मग पुढे दहाव्या शतकात या गन पावडरचा वापर युद्धात करण्यात आला. भाल्याच्या पुढच्या टोकाला रॉकेट सारखी गोष्ट बांधली जायची, जी पेटवून शत्रूवर सोडली जायची. याला आपण बंदुकीच पहिलं रूप म्हणू शकतो. पण ज्याला आपण पहिली बंदूक म्हणू शकतो, ते म्हणजे हँड कॅनन ज्याचा शोध १३ व्या शतकाच्या अखेरीस लागला. हॅंड कॅनन एक साधी पोकळ ट्यूब होती, जी पितळ किंवा लोखंडापासून बनवलेली असायची. त्याला पकडण्यासाठी एक हँडल सुद्धा होतं. जसं एखादी तोफ गोळा फेकण्याचं काम करते, तसंच काम हे हँड कॅनन करायचं. ज्याचा वापर चीनमध्ये 1287-88 दरम्यान झालेल्या युद्धात झाला. त्यानंतर अशाच प्रकारे एक एक गोळी सुटणाऱ्या बंदूका तयार झाल्या आणि त्यांचा वापर होतं गेला. (Social News)
16 व्या शतकात, जर्मन रिव्हॉल्व्हरचा वापर वाढला होता. ज्यामध्ये फक्त एक बॅरल होतं आणि फक्त एकदाच गोळीबार करता येत होता. आता जसं साऊथ मूवीजमध्ये धडाधड गोळीबार होतो तरी बंदुकीतल्या गोळ्या संपत नाहीत, तशा बंदुका तेव्हा नव्हत्या. पण एकाच वेळेस ५ ते ६ गोळ्या फायर करता येतील अशी रिव्हॉल्व्हर बनवली ती सैमुएल कोल्ट याने. १८३० मध्ये तो एका जहाजातून प्रवास करत होता. त्यावेळी त्याचं लक्ष जहाज चलवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या स्टेरिंग कडे गेलं, जिथून त्याला आयडिया आली की या सिस्टमचा वापर बंदुकीत सुद्धा केला जाऊ शकतो. त्याच प्रवासादरम्यान त्याने एक लाकडी रिव्हॉल्वरचा मॉडेल तयार केलं. (Gun)
मग जेव्हा तो प्रवासातून घरी परतला, त्याने पैसे जमवायला सुरुवात केली. त्याच्या डोक्यातली बंदूक बनवण्यासाठी त्याने जॉन पैटरसन या लोहारा सोबत मैत्री केली. पैटरसनसोबत त्याने नवीन प्रयोग सुरू केले. तो एक असे रिव्हॉल्वर बनवू इच्छित होता, ज्यामध्ये फिरणारा सिलेंडर असेल जे जास्त वेळा लोड न करता अनेक राऊंड फायर करू शकेल. अनेक प्रयोग केल्यानंतर त्यांनी अशी रिव्हॉल्वर बनवली सुद्धा. पण रिव्हॉल्व्हर बनवायला त्याला जेवढे प्रयत्न करावे लागले नाहीत तेवढे प्रयत्न त्याला रिव्हॉल्व्हरला पेटंट मिळवण्यासाठी करावे लागेल. त्याने अमेरिकेत पेटंटसाठी अर्ज केला, पण त्याला सांगितले गेले की त्याला ब्रिटनमधून एक परदेशी पेटंट मिळवावं लागेल. (Social News)
====
हे देखील वाचा : बायकोला वाचवण्यासाठी मार्शल लॉ !
========
१८३५ मध्ये तो इंग्लंड गेला. सुरुवातीला ब्रिटिश अधिकारी त्याच्याशी सहमत होत नव्हते. पण या बंदूक मध्ये कोणतीही दोष नव्हता आणि त्याने बनवेलेली रिव्हॉल्वर एक महत्त्वाचा शोध होता म्हणून त्याला पेटंट मिळालं. अमेरिकेत परतल्यावर त्याने पुन्हा पेटंटसाठी अर्ज केला आणि त्याला त्याच्या रिव्हॉल्व्हिंग गनसाठी पेटंट मिळालं. त्याला कोल्ट आणि त्याच्या मित्र पैटरसन यांच्या नावावर “कोल्ट-पैटरसन” असं नाव देण्यात आलं. आज जगात लांब असणाऱ्या शत्रूला मारण्यासाठी Sniper पासून धाडधाड गोळ्या मारणाऱ्या मशीन गनपर्यंत अनेक बंदुकीचे प्रकार उपलब्ध आहेत. आज वर्षाला ५० ते ६० हजार लोक बंदूकीच्या हल्ल्यात मारले जातात. त्यामुळे हा मानव इतिहासातील महत्त्वाचा शोध आहे की नाही हा प्रश्न आहे. (Gun)